Chinchwad : किरकोळ कारणावरून मुलाने वडिलांच्या डोक्यात मारला मोबाईल फोन

एमपीसी न्यूज – घरगुती किरकोळ कारणांवरून चिडलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यात मोबाईल फोन फेकून मारला. यामध्ये वडील गंभीर जखमी झाले. ही घटना छत्रपती शिवाजी पार्क, चिंचवड येथे घडली.

दिगंबर शंकर राळे (वय 52, रा. छत्रपती शिवाजी पार्क, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुलगा सुरज दिगंबर राळे (वय 25) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिगंबर यांचे मागील काही दिवसांपासून घरातील किरकोळ कारणावरून त्यांचा मुलगा सुरज याच्यासोबत भांडण होत होते. रविवारी (दि. 9) रात्री नऊच्या सुमारास त्यांचे पुन्हा भांडण झाले. त्यावेळी आरोपीने वडिलांना शिवीगाळ करत पलंगावर ठेवलेला मोबाईल फोन फेकून मारला. यामध्ये दिगंबर जखमी झाले. तसेच आरोपीने दिगंबर यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून घाबरलेल्या वडिलांनी सोमवारी (दि. 17) रात्री चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलीस हवालदार सुभाष पिंगळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.