Chinchwad : विनाकारण दोन तरुणांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – हॉटेल मधून जेवण करून येत असताना काहीही कारण नसताना तिघांनी मिळून दोन तरुणांना बेदम मारहाण केली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री साडेअकराच्या सुमारास साईबाबा मंदिराजवळ शिवनगरी, चिंचवड येथे घडली.

राकेश नवल पाटील (वय 21, रा. अवताडे निवास, साईबाबा मंदिराजवळ, शिवनगरी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चिदानंद कांबळे, विजय जाधव, ऋषिकेश उत्तरेकर (तिघे रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश आणि त्यांचा मित्र संदीप पाटील दोघेजण मिळून रविवारी रात्री हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण करून परत येत असताना शिवनगरी येथील साईबाबा मंदिराजवळ आरोपींनी त्यांना अडविले. तिघांनी मिळून राकेश आणि संदीप या दोघांना लाथाबुक्क्यांनी आणि कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत ‘बघून घेतो’ अशी धमकी दिली. यामध्ये राकेश आणि संदीप हे दोघंही जखमी झाले आहेत. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अनघा शेवाळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.