Pune : आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत 1400 विद्यार्थ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कुलने आयोजित केलेल्या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत पुण्यातील 32 शाळातील 1400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. इयत्ता पहिली ते दहावी गटात या स्पर्धा झाल्या.

स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार रावसाहेब गुरव यांनी केले. यावेळी संस्थेचे सचिव लतीफ मगदूम, मुख्याध्यापक रबाब खान, हेमा जैन, मुमताज सय्यद उपस्थित होते. लतीफ मगदूम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. रुमाना शेख यांनी सूत्रसंचालन केले. झुकिया पटेल यांनी आभार मानले

माझे आवडते खेळणे, माझ्या स्वप्नातील जग, मुलगी वाचवा, सोशल मीडियाचे फायदे, तंत्रज्ञानाचे तोटे असे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.