Pimpri : पिंपरी चिंचवड येथील जैन सोशल ग्रुप, डायमंडचे अध्यक्ष सुनील शहा यांना सर्वोत्तम अध्यक्ष पुरस्कार

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड येथील जैन सोशल ग्रुप, डायमंडचे अध्यक्ष सुनील शहा यांना जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन महाराष्ट्र रिजनतर्फे सर्वोत्तम अध्यक्षाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच या ग्रुपला कल्चरल प्रोग्रॅम, कमिटी मेंबर स्क्रॅप बुक व एज्युकॉन चेअरमन असे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन महाराष्ट्र रिजनतर्फे आयोजित करण्यात आलेला हा विविध पुरस्कार वितरणाचा सोहळा नुकताच पुण्यातील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात पार पडला. त्यावेळी डायमंड ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष सुनील शहा यांना सर्वोत्तम अध्यक्ष हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच जैन सोशल ग्रुपच्या महाराष्ट्र रिजनच्या अध्यक्षपदी राजेंद्र धोका यांची 2019-21 या वर्षांसाठी निवड करण्यात आली. डायमंड ग्रुपमधून अध्यक्ष सुनील शहा, पूर्वाध्यक्ष कामेश शहा, दीपक डागा यांची महाराष्ट्र रिजन कमिटी चेअरमन म्हणून नियुक्ती झाली.

तसेच त्याआधी इंदूर येथे जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सुनील शहा यांना भारतातील सर्वोत्तम अध्यक्ष म्हणून जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष अजित ललवानी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या वर्षी डायमंड ग्रुपने सामाजिक, साहसी क्रीडा, धार्मिक व मनोरंजन विभागात विविध उपक्रम राबविले. त्याला सर्व सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.