Pimpri : अयोध्येतील मंदिर हे फक्त राम मंदिर नसून राष्ट्र मंदिर –  माहेश्वर मराठे

एमपीसी न्यूज – अयोध्येतील मंदिर हे फक्त राम मंदिर नसून राष्ट्र मंदिर (Pimpri )असल्याचे पिंपरी-चिंचवडचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक माहेश्वर मराठे यांनी म्हटले आहे.

विश्व हिंदू परिषद व कलारंग सांस्कृतिक कलासंस्था पिंपरी- चिंचवड(Pimpri )यांच्या संयुक्त विद्यमाने अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या आगमनानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  त्या स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ नुकताच चिंचवड येथे करण्यात आले. या स्पर्धेत शहरातील जवळपास 42 शाळांनी, इयत्ता सहावी ते बारावी मधील 1635 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये रामायणातील प्रसंगा वरील विषय देण्यात आले होते त्यात 1) श्रीराम व शबरी भेट, 2) श्रीराम व केवट भेट, 3)नल नील व प्रभू श्रीराम, 3) रावण वध, 4)आपल्याला आवडणारा ” रामायणा ” मधिल प्रसंग आशा विविध विषयांवर चित्र काढायची स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.

Pimple Saudagar : ऊस तोडणीचे पैसे दिले नाहीत म्हणून केले मुलाचे अपहरण
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप,आमदार  अश्विनी जगताप, सामाजिक कार्यकर्ते सचिन लांडगे, नितीन वाटकर, पुणे ग्रामीण विभाग मंत्री  विश्व हिंदू परिषद तसेच  विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष धनंजय गावडे, माजी नगरसेविका आनुराधा गोरखे, संदेश गादिया यावेळी उपस्थित होते.

माहेश्वर मराठे म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांच्या सारखे देशभक्तीचे प्रेम या चित्रातून दिसून येते. भारत देशाचे भविष्य घडवणारे हे कलाकार आहेत असे त्यांनी संबोधले. एकाच वेळी 1600 पेक्षा जास्त विद्यार्थी श्री रामाच्या जीवनाचा अभ्यास करून चित्र रेखाटतात,हे या स्पर्धेचे मोठे यश आहे, मुला मुलींनी काढलेली चित्र प्रतिभावंत कलाकारांना लाजवतील अशी आहेत.

शहराध्यक्ष शंकर जगताप  म्हणाले की,”एक चित्र मला असे दिसले,ज्यात मोदीजी लहान रामल्लाला श्री राम मंदिरात घेऊन जात आहेत, हे चित्र मला खूप भावले. आयोध्येतील श्री राम मंदिरात प्रभू श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झाली हे पाहुन पुन्हा एकदा रामराज्याचा शुभारंभ झाला असे या लहानग्यानी काढलेल्या चित्रातून वाटले.

आमदार आश्विनी जगताप म्हणाल्या की, या लहान चित्रकारांनी या चित्रकलेतून श्रीरामाचे चित्र काढली हीच मुले उद्याचे देशाची भवितव्य आहेत,ती पुढे जाऊन आशीच सुंदर भारतमाता ही घडवतील हिच अपेक्षा.  नॉवेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांच्या संकल्पनेतून तसेच विश्व हिंदू परिषदेचे पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष  धनंजय गावडे यांच्या सहयोगाने या भव्य चित्रकलेचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक वी.के. माटे स्कूल मधिल  मल्हार नरहरी प्रभुमिराशी याने पटकवला आहे.  तर, द्वितीय क्रमांक एस.एन.बी.पी. स्कूल मधिल कुमारी आर्या सुनिल निंबाळकर हिने पटकवला आहे,तर तृतीय क्रमांक कमल नयन बजाज स्कूल मधिल प्रेरना शिर्के हिने पटकवला आहे, तसेच चतुर्थ क्रमांक सिटी प्राइड स्कूलचा सिद्धांत अगरवाल याने पटकवला आहे,तर पाचवा क्रमांक नोव्हेल स्कूलची पायल नारखेडे हिने पटकवला आहे.

 

स्पर्धेचे परीक्षण पिंपरी-चिंचवड मधील चित्रकार सुनील शेगावकर, प्रसिद्ध फोटोग्राफर देवदत्त कशाळीकर, प्रसिद्ध मूर्तिकार सदानंद टिपूगुडे व सुमित काटकर ,ज्योती कुंभार यांनी केले. सर्व स्पर्धेमध्ये ज्यांनी  सहभाग घेतला,  ज्यांना या स्पर्धेची जबाबदारी दिली होती आशा सर्वांचे त्याच बरोबर परीक्षकांचे, पाहुण्यांचे, कलारंग सांस्कृतिक कलासंस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.