Alandi: एम आय टी महाविद्यालयात व्यवस्थापन सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा

एमपीसी न्यूज – -आळंदीतील माईर्स एम आय टी (Alandi)महाविद्यालयात व्यवसाय प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागाने विद्यार्थ्यांना उद्योजकीय प्रोत्साहन देणे, त्यांना चिकित्सक बुद्धीने विचार करण्यास प्रेरित करणे आणि विद्यार्थ्यांचे ज्ञान, प्रतिभा, कौशल्ये दाखवण्यासाठी व्यवस्थापन सप्ताहाचे आयोजन केले होते.
दरवर्षी प्रमाणे व्यवस्थापन सप्ताह ‘इप्सिम – 2024,’,2 आणि 3 फेब्रुवारी  रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता.
या स्पर्धांसाठी पुणे शहर व शहराबाहेरील 19 महाविद्यालये, (Alandi)व्यवस्थापन संस्था व विद्यापीठांमधून 436 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. ह्या कार्यक्रममध्ये  बौद्धिक आणि स्पर्धात्मक गोष्टींचे आयोजन करण्यात आले होते.व्यवसाय व्यवस्थापनाच्या विविध स्पर्धा जसे की वादविवाद स्पर्धा, व्यवसाय योजना स्पर्धा, मॉक ट्रेडिंग, फूड आणि इतर स्टॉल्स, वन मिनिट गेम्स, एमआयटी टेड टॉक, टॅलेंट हंट इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे केलेले अथक संघटनात्मक परिश्रम आणि वेगवेगळ्या महाविद्यालयामधून उपस्थित  उत्साही सहभाग हे या कार्यक्रमाचे यश आहे. इप्सम ने केवळ नेटवर्किंगसाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले नाही तर स्पर्धात्मक व्यवसायाच्या लँडस्केपसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी एक महत्त्वाचा बिंदू  म्हणूनही काम केले आहे.
एकंदरीत, ‘इप्सम – 2024’ ने सहकार्य वाढवण्यात आणि व्यावसायिक कौशल्य वाढवण्यात उत्कृष्टता दाखवली.स्टेज मॅनेजमेंट, सूत्र संचालन, मार्केटिंग, टाईम मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट इत्यादी लपलेल्या कलागुणांना बाहेर आणण्याचा हा कार्यक्रम होता.हा कार्यक्रम इव्हेंट मॅनेजमेंटचा एक उत्कृष्ट नमुना होता आणि माईर्स च्या एम आयटी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज आळंदी पुणेच्या व्यवसाय प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागातील विद्यार्थी आणि प्राध्यापक सदस्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे यश होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, उप प्राचार्या डॉ.  मानसी अतितकर, प्रमुख पाहुणे श्री. विजय कोटगोंड, श्री. सुर्यकुमार  माडे, कार्यक्रमाचे प्रायोजक ऋषी सोनावणे, संकेत पाषाणकर, श्रीकांत काकडे, संदीप उपरे , पवन भंडारे तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश भोपळे, समन्वयक डॉ. शैलेंद्र पाटील, डॉ. अमोल माने, डॉ. शरद कदम, डॉ. रितुजा देशपांडे, प्रा. हनुमंत शिंगाडे, प्रा. निर्मल बाबू द्विवेदी, प्रा.किरण नागरे, विदयार्थी समन्वयक सानिया इनामदार, दुर्वेश वर्तक आणि विदयार्थी स्वयंसेवकांचे योगदान लाभले.याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.