Lonavala : तुंगार्ली धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मित्रांसोबत तुंगार्ली गेलेल्या एका तरुणाचा(Lonavala ) पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 5) सायंकाळी घडली. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.

अभिषेक सिंह रावत (वय 23, रा. उत्तराखंड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अभिषेक हा गोविंदसिंग त्रिलोकसिंग महर, अखिलेशसिंग (Lonavala )वीरेंद्रसिंग ने, रमेशसिंग बालाकसिंग कोशियारी (सर्व रा. उत्तराखंड) यांच्यासोबत सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास तुंगार्ली धरणावर फिरायला गेला होता.

 

त्या ठिकाणी अभिषेक हा धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला. दरम्यान त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.

 

Pune : कोथरूड परिसरात शरद पवारांच्या समर्थनात झळकले बॅनर्स

अभिषेक आणि त्याचे सर्व मित्र खंडाळा येथील झारा रिसॉर्ट येथे काम करत होते. सर्वांनी सोमवारी तुंगार्ली धरणावर फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता. धरणात एकजण बुडाल्याची माहिती शिवदुर्ग रेस्क्यू टीमला मिळाली असता शिवदुर्गचे बचाव पथक आणि लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोमवारी रात्री शोधकार्य थांबवण्यात आले. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध सुरू केला असता सकाळी अकरा वाजता अभिषेक याचा मृतदेह मिळून आला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.