Moshi : सव्वा लाख रुपयांचे दारु निर्मितीचे रसायन तरुणाकडून जप्त

एमपीसी न्यूज – सव्वा लाख रुपयांचे (Moshi) देशी दारु निर्मीचीचे रसायन मोशी येथून एका तरुणाकडून जप्त केले आहे. ही कारवाई एमआयडीसी भोसरी पोलिसांनी मंगळवारी (दि.6) इंद्रायणी नदीच्या काठी करण्यात आली.

याप्रकरणी भिमा लिंबा कंजारभाट (वय 37 रा. मोशी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई नितीन खेसे यांनी फिर्याद दिली होती.

Pune : आंतरशालेय मैदानी स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूलला सर्वसाधारण विजेतेपद

पोलिसांनी (Moshi) दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मोशी येथील सस्ते वस्ती येथे इंद्रायणी नदीच्या काठी दारु निर्मिती सुरु असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत घटनास्थळावरून 1 लाख 32 हजार रुपयांचे 5 हजार 600 लीटर गावठी हातभट्टी दारु निर्मीतीचे रसायन जप्त केले. मात्र आरोपी तेथून फरार झाला. एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.