Pune : आंतरशालेय मैदानी स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूलला सर्वसाधारण विजेतेपद

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने नुकत्याच ( Pune ) आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय मैदानी स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूलने सर्वाधिक पदके मिळवीत सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले.
 सोमवार दि 5 फेब्रुवारी व मंगळवार दि 6 फेब्रुवारी रोजी गुलटेकडी येथील कटारिया हायस्कूलच्या अॅथलेटिक्स ट्रॅकवर या स्पर्धा संपन्न झाल्या. सदर स्पर्धेचे हे 13 वे वर्ष असून यावर्षी 52 शाळांतील 850 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.

Pune : होनहार भारत -लीडरशिप माईंडसेट’ विषयावर तीन दिवसीय परिषद

स्पर्धेअंतर्गत 8 वर्ष वयोगटाखालील विद्यार्थ्यासाठी 50 मी. धावणे, लांब उडी, 50×4 रिले तसेच 10 वर्ष वयोगटाखालील विद्यार्थ्यासाठी 80 मी. धावणे, लांब उडी, 50 रिले तसेच 12 वर्ष वयोगटाखालील विद्यार्थ्यासाठी 100 मी. धावणे, लांब उडी, 80×4 रिले या क्रीडाप्रकारांचा समावेश होता. कॉसमॉस बँक यांनी स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले.

कॉसमॉस बँकेचे संचालक अजित गिजरे यांच्या हस्ते स्पर्धेची सुरुवात झाली. यावेळी महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस रोहन दामले, महाराष्ट्रीय मंडळ शिक्षण विभाग संचालिका नेहा दामले, मुख्याध्यापिका निधि सामंत, आदिती सहत्रबुद्धे, अंजली जोशी, रुची धाकेफाळकर उपस्थित होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आगाशे कॉलेजच्या मैदानावर संपन्न झाला. स्पर्धेच्या संयोजनासाठी महाराष्ट्रीय मंडळच्या सर्व क्रीडा शिक्षकांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना एकूण रु. 1 लक्ष रक्कमेची बक्षीसे, पदक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. पहिल्या तीन विजेत्या रिले संघास मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेमध्ये पदक तालिकेत 26 गुण मिळवून आर्मी पब्लिक स्कूल पुणे संघास सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले. सदर स्पर्धेचे सूत्रसंचालन अमित डांगे व तेजस देसुरकर यांनी केले तर सचिन परदेशी यांनी ( Pune ) आभार मानले.

स्पर्धांचे निकाल खालीलप्रमाणे

50 मी. धावणे स्पर्धा – 8 वयोगटा खालील मुली

राधिका आगरखेडकर – प्रथम (मिलेनियम नॅशनल स्कूल)

रमा पाठक – द्वितीय (अभिनव विद्यालय इंग्लीश मिडीयम स्कूल, एरंडवणे)

माही जगताप – तृतीय (आर्मी पब्लिक स्कूल)

50 मी. धावणे स्पर्धा – 8 वयोगटा खालील मुले

समर्थ कर्वे – प्रथम (दस्तूर प्रायमरी स्कूल)

मंथन कदम – द्वितीय (आर्मी पब्लिक स्कूल)

कश्यप महामुनकर – तृतीय (एनसीएल प्रायमरी इग्लिश मिडीयम स्कूल, पाषाण)

लांब उडी स्पर्धा – 8 वयोगटाखालील मुली

संस्कृती हाणगे- प्रथम (हुजूरपागा स्कूल, लक्ष्मीरस्ता)

श्रद्धा गाढवे – द्वितीय (एनसीएल प्रायमरी स्कूल)

प्रांजल भुजबळ – तृतीय विभागून (आर्मी पब्लिक स्कूल) व नीरवा वाघ – तृतीय विभागून (हचिंग्ज स्कूल)

लांब उडी स्पर्धा – 8 वयोगटाखालील मुले

अहिल शेख – प्रथम (आर्मी पब्लिक स्कूल)

समर्थ कर्वे – द्वितीय (दस्तूर बॉईज स्कूल)

अरफत अन्सारी – तृतीय (विशाल महाराष्ट्र एज्युकेशन उर्दू स्कूल)

50×4 रिले स्पर्धा – 8 वयोगटाखालील मुली

हचिंग्ज स्कूल – प्रथम

सरहद स्कूल – द्वितीय

अभिनव स्कूल (अभिनव विद्यालय इंग्लीश मिडीयम स्कूल, एरंडवणे)

50×4 रिले स्पर्धा – 8 वयोगटाखालील मुले

दस्तूर इंग्लीश स्कूल- प्रथम

डीईएस प्रायमरी स्कूल – द्वितीय

कलमाडी हायस्कूल – तृतीय

80 मी. धावणे स्पर्धा – 10 वयोगटाखालील मुली

माही रासकर – प्रथम (आर्मी पब्लिक स्कूल)

राधा निजामपूरकर – द्वितीय (डीईएस प्रायमरी स्कूल)

रिधी भोसले – तृतीय (महाराष्ट्रीय मंडळ इंग्लीश मिडीयम स्कूल, टिळक रस्ता)

80 मी. धावणे स्पर्धा – 10 वयोगटाखालील मुले

विहान काशीकर – प्रथम (मिलेनियम स्कूल)

शौर्यशील सत्यजित – द्वितीय (सरहद स्कूल)

वरद जाधव – तृतीय (महाराष्ट्रीय मंडळ इंग्लीश मिडीयम स्कूल, टिळक रस्ता)

लांब उडी स्पर्धा – 10 वयोगटाखालील मुली

गुंजन यादव – प्रथम (आर्मी पब्लिक स्कूल)

ओवी मुरकुटे – द्वितीय (एनसीएल प्रायमरी इग्लिश मिडीयम स्कूल, पाषाण)

प्रज्ञा कडाळे – तृतीय (एनसीएल प्रायमरी इग्लिश मिडीयम स्कूल, पाषाण)

लांब उडी स्पर्धा – 10 वयोगटाखालील मुले

कौस्तुभ कदम – प्रथम (महाराष्ट्रीय मंडळ इंग्लीश मिडीयम स्कूल, टिळक रस्ता)

वरद जाधव – द्वितीय (महाराष्ट्रीय मंडळ इंग्लीश मिडीयम स्कूल, टिळक रस्ता)

अनुज बरवे – तृतीय (आर्मी पब्लिक स्कूल)

50×4 रिले स्पर्धा – 10 वयोगटाखालील मुली

कलमाडी हायस्कूल – प्रथम

एनसीएल प्रायमरी इंग्लीश मिडीयम स्कूल – द्वितीय

आर्मी पब्लिक स्कूल – तृतीय

50×4 रिले स्पर्धा – 10 वयोगटाखालील मुले

सरहद इंग्लीश मिडीयम स्कूल – प्रथम

महाराष्ट्रीय मंडळ इंग्लीश मिडीयम स्कूल – द्वितीय

हचिंग्ज हायस्कूल – तृतीय

100 मी. धावणे स्पर्धा – 12 वयोगटाखालील मुली

अनुषा फडतरे – प्रथम (अभिनव विद्यालय स्कूल, एरंडवणे)

साक्षी हुंडलकर – द्वितीय (बालशिक्षण मंदिर स्कूल)

गार्गी जेधे – तृतीय (अभिनव विद्यालय स्कूल, एरंडवणे)

100 मी. धावणे स्पर्धा – 12 वयोगटाखालील मुले

सूर्यवर्धन पाथेरकर – प्रथम (मुक्तांगण इंग्लिश मिडीयम स्कूल)

कार्तिक जोशी – द्वितीय (विखे पाटील मेमोरियल स्कूल)

केतन गलांडे – तृतीय (नगरवाला डे स्कूल)

लांब उडी स्पर्धा – 12 वयोगटाखालील मुली

गार्गी जेधे – प्रथम (अभिनव विद्यालय स्कूल, एरंडवणे)

अनुषा फडतरे – द्वितीय (अभिनव विद्यालय स्कूल, एरंडवणे)

अस्मी जोग – तृतीय (बालशिक्षण मंदिर स्कूल)

लांब उडी स्पर्धा – 12 वयोगटाखालील मुले

यासीन शेख – प्रथम (विशाल महाराष्ट्र स्कूल)

राजवीर बरड – द्वितीय (युरेका इंटरनॅशनल स्कूल)

समर्थ जाधव – तृतीय (आर्मी पब्लिक स्कूल)

80×4 रिले स्पर्धा – 12 वयोगटाखालील मुली

अभिनव इंग्लीश मिडीयम स्कूल – प्रथम

बालशिक्षण मंदिर स्कूल – द्वितीय

आर्मी पब्लिक स्कूल – तृतीय

80×4 रिले स्पर्धा – 12 वयोगटाखालील मुले

नगरवाला इंग्लीश मिडीयम स्कूल – प्रथम

मुक्तांगण इंग्लीश मिडीयम स्कूल – द्वितीय

आर्मी पब्लिक स्कूल – तृतीय

https://www.youtube.com/watch?v=x_6bVP8etdA

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.