Pimple Saudagar : ऊस तोडणीचे पैसे दिले नाहीत म्हणून केले मुलाचे अपहरण

एमपीसी न्यूज – ऊस तोडणीसाठी घेतलेले पैसे दिले(Pimple Saudagar )नाहीत म्हणून चक्क मुलाचे अपहरण केले आहे. ही धक्कादायक प्रकार पिंपळे सौदागर परिसरात सोमवारी (दि.5) घडली.

याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली (Pimple Saudagar)आहे. यावरून संदिपान फड ऊर्फ फड आबा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : होनहार भारत -लीडरशिप माईंडसेट’ विषयावर तीन दिवसीय परिषद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीने आरोपीकडून ऊस तोडणीचे पैसे दिले नाहीत म्हणून फिर्यादीच्या 20 वर्षीय मुलाचे आरोपीने अपहरण करून डांबून ठेवले होते. फिर्यादी यांचे पती कॅब चालक आहेत ते कामावरती गेले असता आरोपीने फिर्यादीकडे पैशांची मागणी करत मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.