Pimpri: जबरी चोरीतील फरार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – जबरी चोरीच्या गुन्ह्यात एका वर्षांपासून फरार असणाऱ्या आरोपीला सापळा रचून अटक केली. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने निगडीतील एकता चौकात ही कारवाई केली.

अजय उर्फ जहरीला रामउजागीर चौधरी (वय १९, रा.ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीतील सराईत गुन्हेगार चौधरी हा निगडीतील एकता चौकात असल्याची माहिती पोलीस नाईक जमीर तांबोळी यांना मिळाली. त्यानुसार युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.

त्याला पुढील कारवाईसाठी चिखली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, सहायक निरीक्षक सतीश कांबळे आणि त्यांच्या पथकाने कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.