Nigadi: हप्ता न दिल्याने दुकानाची तोडफोड; एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – पाच हजारांचा हप्ता न दिल्याने दोघांनी दहशत पसरवत दुकानाची तोडफोड केली. तसेच भाजीविक्रेत्या महिलेची हातगाडी पलटी करून गळ्यातील सोन्याचे पान चोरून नेले. बुधवारी (दि.२७) रात्री साडेसातच्या सुमारास निगडी ओटास्किम येथील राजगृह हौसिंग सोसायटी जवळ ही घटना घडली.

याप्रकरणी दुकानदार देवाराम शेराजी चौधरी (वय ४६, रा. ओटास्किम निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दिपरत्न ऊर्फ गोट्या दिलीप लोखंडे (वय २१, रा. सम्राट सोसायटी, ओटास्कीम निगडी) आणि सचिन जाधव या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत मिळालेली माहिती अशी, दोघे आरोपी बुधवारी रात्री फिर्यादी यांच्या किराणा मालाच्या दुकानात शिरले. “पाच हजारांचा हप्ता दिला नाही तर तुला जीवे मारुन टाकू”, अशी धमकी दिली. आणि दुकानाची तोडफोड करुन नुकसान केले.

तसेच दुकानाशेजारील एका महिलेची भाजीची हातगाडी पलटी करुन तिच्या गळ्यातील सोन्याचे पान जबरदस्ती हिसका मारुन चोरुन नेले. निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आरदवाड याचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.