Pimpri: चिंचवड येथील भाजीमंडई बुधवारपासून सुरू

Chinchwad vegetable market to reopen from Wednesday. चिंचवड येथील अखिल मंडई मित्र मंडळाने  महापालिका प्रशासनाकडे अत्यावश्‍यक सेवेअंतर्गत भाजीमंडई पुन्हा सुरु करण्यासाठी पासची मागणी करणारे पत्र दिले होते.

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील गेल्या दीड महिन्यांपासून अन्यत्र स्थलांतरित झालेल्या भाजीमंडईंनी अत्यावश्‍यक सेवेअंतर्गत पास देऊन पुन्हा मूळ जागी व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यास सुरवात झाली आहे.

त्याअंतर्गत चिंचवड येथील भाजीमंडई बुधवार (दि. 3) पासून सुरु होणार असल्याने नागरिकांची मोठी सोय होणार आहे.  महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सोमवारी सायंकाळी आदेश काढला.

चिंचवड येथील अखिल मंडई मित्र मंडळाने  महापालिका प्रशासनाकडे अत्यावश्‍यक सेवेअंतर्गत भाजीमंडई पुन्हा सुरु करण्यासाठी पासची मागणी करणारे पत्र दिले होते. त्यानुसार सर्व बाबींचा विचार करुन प्रशासनाने त्यांना 30 जूनपर्यंत अटी, शर्तींवर भाजी मंडई सुरु करण्यास परवानगी दिली.

पावसाला  सुरवात होऊ लागली आहे. स्थलांतरित झालेली मंडई चित्तराव गणपती मंदिराजवळील मोकळ्या जागेत सुरु होती. मात्र पावसामुळे गेले दोन दिवस ग्राहक फिरकत नव्हते. तसेच तेथे कोणतीही पत्र्याची शेडची व्यवस्था नव्हती.

हे आहेत नियम !

#मंडईत एकूण 48 गाळे आहेत.

#समविषम पद्धतीने गाळे सुरु राहतील.

# प्रवेशद्वारावर ग्राहकांना सॅनिटायझरचा वापर बंधनकारक.

#ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर अत्यावश्‍यक.

#शरीराच्या   तापमानाचे मोजमाप आवश्‍यक

# मंडईच्या एका बाजूने प्रवेश आणि दुसऱ्या बाजूने बाहेर जाता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.