Pune: भारतीय मजदूर संघ व ओंकारेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे ‘बीडी’ कामगारांना मदतीचा हात

Pune: BMS and Omkareshwar Mandir Trust lend a helping hand to 'Bidi' workers

एमपीसी न्यूज – लाॅकडाऊन कालावधीत बीडी कामगारांची आर्थिक वाताहत झाली, त्यामुळे या कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. या कामगारांना भारतीय मजदूर संघ व ओंकारेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे मदत करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

लाॅकडाऊनमुळे बीडी कामगारांचे काम बंद होते. या कामगारांचे हातावर पोट असल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता. या  कामगारांची समस्या लक्षात घेऊन भारतीय मजदूर संघ व ओंकारेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे गरजू कामगारांना धान्याचे किट व आर्थिक मदत करण्यात आली.

दरम्यान, याप्रसंगी उपस्थित असणारे खासदार गिरीश बापट यांच्याकडे बीडी कामगारांचे काम पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी खासदार गिरीश बापट यांच्यासह भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत धुमाळ, उपाध्यक्ष सुभाष सावजी, अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाचे सरचिटणीस उमेश विस्वाद, जिल्हा सचिव अर्जुन चव्हाण, ट्रस्टी अरूण जोशी, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सेक्रेटरी सचिन मेंगाळे हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.