Pune: पुणे लोकसभा मतदारसंघातून मोहोळांना भाजपचं तिकीट, जगदीश मुळीक यांनी केली फेसबुक पोस्ट 

एमपीसी न्यूज – पुणे लोकसभा मतदारसंघातून(Pune) माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर माजी आमदार जगदीश मुळीक यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून 2019मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पक्षाकडून कोणाला संधी मिळणार, याची मोठी चर्चा होती. 

 

भाजपकडून जगदीश मुळीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Pune)प्रचारक सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा होती. मोहोळ हे सुरुवातीपासून आघाडीवर होते. त्यांना पक्षाने संधी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून मोहोळ यांची ओळख आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर असे विविध पदे मोहोळ यांनी भूषविले आहेत.

जनतेच्या सेवेत कायमच! कोणतेही पद नसतानाही माझ्या साठी जनतेने कार्यकर्त्यांने दाखवलेले प्रेम पाहून मी कायमच कृतज्ञ आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक, स्वच्छ काम असेच कायम ठेवणे ही माझी जबाबदारी आहे जी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे. पुन्हा एकदा तमाम जनता आणि कार्यकर्त्यां,पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद.
आपलाच
जगदीश मुळीक अशा प्रकारे फेसबुकवर पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.