Punavale : शिवनेरी बसची तेलाच्या टॅंकरला धडक; बस चालक गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – मुंबईहून पुण्याला येत असलेल्या शिवनेरी बसची (Punavale )रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या टॅंकरला धडक बसली. यामध्ये बस चालक गंभीर जखमी झाला असून दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (दि. 14) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांनी दिलेल्या माहितीनुसार,(Punavale )मुंबई-पुणे लेनवर पुनावळे येथे तेलाचा एक टॅंकर बंद पडला होता. चालकाने टॅंकर रस्त्याच्या बाजूला थांबवला होता. त्याने मॅकेनिक देखील बोलावला होता.

टॅंकरचे दुरुस्तीचे काम सुरु होते.दुपारी एक वाजताच्या सुमारास मुंबईहून पुण्याला जाणारी एक शिवनेरी बस भरधाव वेगात आली. अचानक टॅंकर समोर आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसची टॅंकरला पाठीमागून जोरात धडक बसली. टॅंकरचे पाठीमागील बंपर तुटले. तर बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.

या अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला. दरम्यान, बसच्या पाठीमागून येणारी एक आलिशान कार देखील बसला धडकली. अपघाताची माहिती मिळताच रावेत पोलीस आणि वाकड वाहतूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिमंडळांची पुनर्रचना

पोलिसांनी जवळच असलेल्या ट्रॅक्टरच्या मदतीने अपघातग्रस्त कार बाजूला काढली. त्यामध्ये चालकाला आणि सहप्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला घेतली.

बसमधून जखमी चालकाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसमधील दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी आहेत. त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.