Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिमंडळांची पुनर्रचना

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाच्या (Chinchwad) कार्यक्षेत्रात तिसऱ्या परिमंडळात शासनाने मान्यता दिली. त्यानंतर आठ महिन्यांनी या परिमंडळांची पुनर्रचना करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची सुरुवात 15 ऑगस्ट 2018 रोजी झाली आयुक्तालयाच्या सुरुवातीला दोन परिमंडळांची रचना करण्यात आली. सुरुवातीला शहर पोलिसांच्या हद्दीत 14 पोलीस ठाण्यांचा समावेश होता. त्यानंतर चिखली, शिरगाव, महाळुंगे एमआयडीसी, रावेत हे चार पोलीस स्टेशन नव्याने सुरू करण्यात आले.

पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील वाढते नागरिकरण, औद्योगीकरण, शहरीकरण, शैक्षणिक संस्था, वाहनांची संख्या लक्षात घेता आणखी एका परिमंडळाची गरज निर्माण झाली, त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करत तिसरे परिमंडळ मंजूर करून घेतले.

Pune : यशस्वी संस्थेतर्फे आयोजित आईस्क्रीम कार्यशाळा संपन्न

सप्टेंबर 2023 मध्ये तिसऱ्या परिमंडळाला शासनाने मान्यता दिली. (Chinchwad) परिमंडळ तीनचे पहिले पोलीस उपायुक्त म्हणून संदीप डोईफोडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. आठ महिन्यानंतर तीनही परिमंडळांची पुनर्रचना करण्यात आली आहे. रावेत पोलीस ठाणे परिमंडळ दोनच्या वाकड विभागात होते. नव्या रचनेनुसार रावेत पोलीस ठाणे परिमंडळ एकच्या चिंचवड विभागात आणले आहे.

परिमंडळांची सुधारित रचना

परिमंडळ एक
पिंपरी विभाग – पिंपरी पोलीस ठाणे, भोसरी पोलीस ठाणे, सांगवी पोलीस ठाणे
चिंचवड विभाग – चिंचवड पोलीस ठाणे, निगडी पोलीस ठाणे, रावेत पोलीस ठाणे

परिमंडळ दोन
देहूरोड विभाग – तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे, देहूरोड पोलीस ठाणे, शिरगाव परंदवडी पोलीस ठाणे
वाकड विभाग – वाकड पोलीस ठाणे, हिंजवडी पोलीस ठाणे

परिमंडळ तीन
चाकण विभाग – चाकण पोलीस ठाणे, महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे, आळंदी पोलीस ठाणे
भोसरी विभाग – दिघी पोलीस ठाणे, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे, चिखली पोलीस ठाणे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.