Pimpri : मतदार राजा जागा हो…ssss; वल्लभनगर आगारात पथनाट्यातून मतदान जनजागृती

एमपीसी न्यूज – जात, वर्ण, भाषा तुम्ही बाजूला ठेवा, आबुराव-बाबुराव मतदारन करा, असा संदेश देत एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांनी वल्लभनगर स्थानकात पथनाट्यातून प्रवाशांना मतदान करण्याचे आवाहन केले.

याविषयी माहिती देताना गायक आणि कवी कुमार आहेर म्हणाले, “राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाच्या वतीने विभाग नियंत्रक यामिनी जोशी व विभागीय वाहतूक अधिकारी सुनील भोकरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम तयार केला. या पथनाट्यांद्वारे पुणे विभागातील सर्व एसटी बसस्थानकांवर प्रवाशांसाठी मतदार जागृती अभियनाचे कार्यक्रम आणि पथनाट्य सादर करण्यात येत आहेत”

  • वल्लभनगर स्थानकात सादर केलेल्या पथनाट्यात कवी व गायक कुमार आहेर यांनी तयार केलेले पथनाट्य पहाडी आवाजात सादर केले. त्यांना सहगायक गौतम मोरे आणि संतोष बोरगावकर यांनी साथ केली. तर संगीत व वाद्याची साथ शंकर कांबळे यांनी दिली.

यावेळी स्थानकप्रमुख एस. एन. भोसले या उपक्रमाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, “मतदानाच्या दिवशी सुटी असल्याने अनेक सुशिक्षित मतदारसुध्दा मतदान न करता सुटी साजरी करण्यासाठी बाहेरगावी निघून जातात. मात्र, त्यांनी मतदान हे आद्य कर्तव्य समजून मतदान करुन लोकशाहीप्रती निष्ठा दाखवावी”

  • “मतदार राजा जागा हो…. ” या पथनाट्याची संकल्पना आणि मार्गदर्शन विभाग नियंत्रक यामिनी जोशी आणि सुनील भोकरे, लेखक दिग्दर्शक कुमार आहेर, यांना साथसंगत शंकर कांबळे, संतोष बोरगावकर, गौतम मोरे, वल्लभनगर आगार व्यवस्थापक एस. एन. भोसले, आर. टी. जाधव यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.