Charholi : शिलालेखातून उलगडला वाघेश्वर मंदिराचा इतिहास

एमपीसी  न्यूज – च-होलीच्या श्री वाघेश्वर मंदिराच्या बांधकामात असलेला प्राकृत  भाषेतील शिलालेख सापडला. इतिहासप्रेमी तरुणांनी इतिहास संशोधक प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांच्यामार्फत या शिलालेखाचा अर्थ शोधला. त्या शिलालेखातून वाघेश्वर मंदिराच्या बांधकामाचा इतिहास उलगडण्यास मदत झाली आहे.
च-होलीतील श्री वाघेश्वर मंदिरात मुख्य प्रवेशद्वाराच्या गणेशपट्टीवर हा शिलालेख उपलब्ध आहे. परिसरातील इतिहासप्रेमी तरुणांनी हा शिलालेखाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली. इतिहास संशोधक प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांच्यामार्फत शिलालेखाचे वाचन करण्यात आले. त्यामध्ये हा शिलालेख मूळ प्राकृत भाषेतील व देवनागिरी लिपीमधील आहे.

  • त्याचा मराठीतील अर्थबोध असा आहे की, पुणे जिल्ह्यातील च-होलीमध्ये श्री वाघेश्वर मंदिरास महान स्थळ म्हणून  संबोधले जाते. दाभाडे घराण्यातील मूळ पुरुष बजापाटील याचा मुलगा सोमाजी याचा मुलगा कृष्णाजी दाभाडे याने श्री वाघेश्वर महानस्थळ हे मंदिर बांधले. इ.स. १७२५ मध्ये या मंदिराची उभारणी गावातील टेकडीवर झाली, असा उल्लेख आढळला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.