Pimpri : गणपती गौरी सणांदरम्यान यमुनानगरमध्ये पाणीपुरवठा चालू राहणार

एमपीसी न्यूज – गणपती गौरी सणा दरम्यान यमुनानगर प्रभाग 13 भागाला सुरळीत पाणी पुरवठा करावा अशी मागणी युवा मोर्चा सोशल मीडिया आघाडीचे शहर उपाध्यक्ष आदित्य कुलकर्णी यांनी महापौर राहुल जाधव यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली होती. महापौरांनी संबंधित अधिका-यांना दूरध्वनी करुन त्या दिवशी पाणी कपात रद्द करण्याची सूचना केली.

याबाबत दिलेल्या निवेदनांत कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, पुढील आठवड्यापासून गणपती गौरींचे आगमन होत आहे. शुक्रवारी यमुनानगर साईनाथनगर निगडी भागाला पाणीपुरवठा केला जात नाही. त्या दिवशी गौरी पूजनाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी पाणीपुरवठा चालू ठेवावा अशी मागणी करण्यात आली.

त्याबाबत महापौरांनी संबंधित अधिका-यांना दूरध्वनी करून त्या दिवशी पाणी कपात रद्द करावी अशी सूचना केली. यावेळी युवा मोर्चा सोशल मीडिया आघाडीचे शहर उपाध्यक्ष आदित्य कुलकर्णी, युवती आघाडीच्या शहर चिटणीस मुक्ता गोसावी, युवती आघाडीच्या निगडी चिखली मंडळ अध्यक्षा अंजली पांडे, युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे निगडी चिखली मंडळ अध्यक्ष प्रथमेश आंबेरकर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.