Talegaon Dabhade : शिवणे सडवली ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली माळवदकर

एमपीसी न्यूज- शिवणे सडवली ग्रुपग्रामपंचायत सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या साेनाली माळवदकर यांची गुरुवारी निवड करण्यात आली. मावळत्या सरपंच मंगल भवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर माळवदकर यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भरत शिंदे, मावळ केसरी पै खंडु वाळुंज, माजी सरपंच राधिका वाळुंज,कविता बदर, माजी उपसरपंच दत्ता ओझरकर, उपसरपंच लिंबाजी गायकवाड, सोसायटी संचालक भरत वाळुंज, संतोष शिंदे, माजी सरपंच किसन कुंभार, तंटामुक्ती अध्यक्ष राजु शिवणेकर, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र शिंदे, बाळासाहेब रसाळ, सुरेखा टिळे, बाबुराव नगिने, संजय भवार, भागुजी केंडे, महेश म्हस्के, आबु शिंदे, लक्ष्मण वाळुंज आणि ग्रामस़्थ उपस्थित हाेते. मंडलाधिकारी शेरकर मॅडम, तलाठी निंबाळकर मॅडम यांनी निवडणूक कामकाज पाहिले.

यावेळी गेल्या 4 वर्षातील शिवणे सडवली येथील स्मशानभूमी, गाव वाड्या वस्त्या मधील नवीन पाईपलाईन, ग्रामपंचायत नूतनीकरण, वीजपुरवठा, घरकुल याेजना आदी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यापुढे गावातील अंतर्गत गटारी, रस्ते व आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू असे नवनिर्वाचित सरपंच माळवदकर यांनी यावेळी सांगितले. ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजीत नवनिर्वाचित सरपंच यांचे स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.