Pimpri : महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यावे – स्मिता म्हसकर

एमपीसी न्यूज – कौटुंबिक जबाबदा-या संभाळत असताना वेळ काढून (Pimpri )महिलांनी स्वत: च्या तसेच मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या स्मिता म्हसकर यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने संत तुकारामनगर (Pimpri )येथे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीराचे आयोजन जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा सुलभा यादव व राजमाता जिजाऊ जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आले होते.

 

 

Chinchwad : यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा  लौकीक वाढवला – काशिनाथ नखाते

सदर शिबीर डॉ.डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर च्या सहकार्याने घेण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव, वधूवर कक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मोहन जगताप,शिव व्याख्याता दर्शना पवार,मराठा सेवा संघ शहराध्यक्ष अॅड लक्ष्मण रानवडे,जिजाऊ ब्रिगेड पुणे विभाग अध्यक्षा सुनिता शिंदे, कार्याध्यक्षा माणिक शिंदे,माजी नगरसेविका मुक्ता पडवळ,वैभव जाधव,झुंबर जगताप, डॉ.सोनाली दळवी उपस्थित होते.

या आरोग्य शिबिराचा लाभ एकूण एकशे दहा जणांनी घेतला.यासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.डी.शर्मा,डॉ. सोनाली दळवी,डॉ.शुभांकर वाघेरे व त्यांच्या सहकारी डॉक्टरांचे विशेष सहकार्य लाभले.

सूत्रसंचालन दिलीप गावडे यांनी केले.आभार सुरेश इंगळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुलभा यादव,रत्नप्रभा सातपुते,रेखा गुळवे,ज्योती वाघ,विजय शिंदे,पांडुरंग पोमण,चंद्रकांत शिंदे,दिलीप गावडे,अशोक सातपुते यांनी विशेष सहकार्य केले.

https://www.youtube.com/watch?v=tnaCrgfh7Qc&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.