Pimpri : बंद घराचा कडी कोयंडा तोडून हजारोंचा ऐवज लंपास
एमपीसी न्यूज – दरवाजाची कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी 65 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना पिंपरी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली.
सचिन रामचंद्र वाईकर (वय 29, रा. मोनिका टीचर्स हाऊसिंग सोसायटी, भैरवनाथ नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री एक ते रविवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान वाईकर यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातील दोन तोळे सोन्याचे दागिने आणि रोख दहा हजार रुपये असा एकूण 65 हजारांचा ऐवज चोरी करून नेला. पोलिस उपनिरीक्षक डोलारे तपास करीत आहेत.