Pune : भोर तालुक्यातील गुहिनी गावातील विठ्ठल मंदिरात महिलांनी गिरवले मासिक पाळी समुपदेशनाचे धडे

एमपीसी न्यूज- शबरीमाला प्रवेशावरून मासिक पाळीसंदर्भात देशात तणावाचे वातावरण असताना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील गुहिनी गावातील विठ्ठल मंदिरात गावातील महिलांनी मासिक पाळी व्यवस्थापन समुपदेशनाचे धडे गिरवले. यासाठी पुढाकार घेतला तो समाजबंध या संस्थेच्या सचिन आशा सुभाष या तरुणाने. निमित्त होते सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या एनएसएसच्या कार्यक्रमाचे.

भोर तालुक्यातील गुहिनी हे अतिदुर्गम गावातील मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात अशा प्रकारचा कार्यक्रम होणं ही नक्कीच आशादायक आणि सकारात्मक घटना आहे. याला गावातील महिला किंवा पुरुष कुणीच यासाठी हरकत घेतली नाही हे विशेष. या वेळी उपस्थित असणाऱ्या मुली व महिलांना अपेक्षेप्रमाणे मासिक पाळीतील समस्या होत्याच, त्याविषयी सखोल माहिती सोबतच वापरण्यासाठी ‘आशा पॅड’ चा पर्याय दिल्याने महिला न लाजता कार्यक्रमात सहभागी झाल्या, असे सचिन आशा सुभाष यांनी सांगितले.

सचिन आशा सुभाष या तरुणांची समाजबंध नावाची एक संस्था आहे. या संस्थेत तो वापरलेल्या कपड्यांपासून सॅनिटरी नॅपकिन तयार करून तो ग्रामीण भागातील महिलांना मोफत वाटतो. मागील दोन वर्षांपासून त्याचे हे कार्य सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.