Pimpri: पिंपरीच्या युवासेनेने साधला चहा विक्रेत्यांशी संवाद 

एमपीसी  न्यूज – शिवसेना- भाजप – आरपीआय – रासप – शिवसंग्राम – रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे  यांच्या प्रचारार्थ  पिंपरी युवा सेनेच्या वतीने पिंपरी विधानसभेतील चहासाठी प्रसिद्ध असलेल्या विविध हॉटेलात जाऊन प्रचार केला. 

अशोका हाॅटेल, जायका चहा, येवले चहा, सायबा चहा, माऊली चहा अशा नामांकित ठिकाणी कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद साधून श्रीरंग बारणे यांना प्रचंड बहुमताने विजय करा असे आवाहन केले.
  • यावेळी  युवतीसेना अधिकारी प्रतीक्षा घुले, पिंपरी विधानसभा संघटक निलेश हाके, युवासेना विभाग अधिकारी रविभाऊ नगरकर, सनी कड, अजय पिल्ले, गोरख मामा मेमाने आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.