Lonavala: कांचन कुल यांच्या ‘रोड शो’ने महायुतीच्या प्रचाराची सांगता

एमपीसी न्यूज- महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराची सांगता लोणावळा शहरात कांचन कुल, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मावळचे आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगढ यांच्या रोड शो ने करण्यात आली.

भांगरवाडी येथिल श्रीराम मंदिरापासून बारणे यांच्या प्रचाराकरिता कांचन कुल यांच्या रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक शादान चौधरी, भाजपाचे शहराध्यक्ष व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील इंगूळकर यांच्यासह दोन्ही पक्षांचे नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी या रोड शो मध्ये सहभागी झाले होते.
  • बाजारपेठेत हा रोड शो करण्यात आला. सकाळच्या सत्रात सदाभाऊ खोत यांनी देखील लोणावळ्यात पदाधिकार्‍यांची भेट घेतली. लोणावळ्यात शिवसेनेपेक्षा भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे. बुथचे नियोजन देखील योग्य प्रकारे करण्यात आल्याने बारणे यांना शहरातून मोठी आघाडी मिळेल असा विश्वास आमदार बाळा भेगडे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.