Pisces-Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -मीन : यश मिळवताना अधिक कष्ट घ्यावे लागतील

एमपीसी न्यूज – जाणून घेऊया मीन राशीचे (Pisces-Annual Horoscope 2023-2024)वार्षिक राशिभविष्य 2022-2023. मीन राशीसाठी हे वर्ष कसे जाईल,याचे भाकीत केले आहे ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांनी

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
नमस्कार अनेक शतकाच्या इतिहासात ज्योतिष विदयेचा वापर केलेला दिसत आहे. आज एकविसाव्या शतकात ते दिवसें दिवस लोकप्रिय होत आहे. असे दिसते. दैनिक वर्तमान पत्रातील भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता अनेक वर्षापासून राहीलेली आहेच. आजच्या युगात यू ट्यूब (र्धेी र्ींीलश), ङ्गेसबुक (ऋ.इ) तसेच इतर सोशल मिडीया मध्ये सुद्धा भविष्य हा टॉपिक अगदी काळजीपूर्वक पाहताना व ङ्गॉलो करताना आम्ही पाहिले आहे.

जस जसे युग बदलेल तरीसुद्धा भविष्य पाहण्याची संख्या कमी होत नाही तर ती दिवसेंदिवस वाढतच आहे. मुळात ज्योतिष विद्या ही क्रियाशील आध्यात्मिक विद्याशी जोडली आहे. त्यामुळे ज्योतिष विद्या व आध्यात्मिक विद्या यांचा प्रसार व प्रचार समाजाला दिल्यास आधुनिक तणाव ग्रस्त जीवनात एक प्रकारचे मानसिक बळ त्या व्यक्तीला व समाजाला प्राप्त होईल. यात शंका नाही.

मला इतर स्वतंत्र गुरू करण्याची गरज भासली नाही. कारण चांगले संस्कार व ज्योतिषाचे बाळकडू लहानपणापासूनच घरातच माझे आजोबा ज्योतिष मार्तंड पंडीत स्वामी यांच्याकडून मिळाले. मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. त्यांना शतशः प्रणाम! जीवनाचे मर्म समजविण्याचे पवित्र कार्य आपोआपच हातुन घडण्याचे भाग्य मला मिळाले.

राशीतील ग्रहाचे होणारे ग्रहयोग व त्यापासून होणारे ङ्गलित यावर स्वविचार मांडण्याचे बळ मिळाले. असो, दर वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा बारा राशींचे भविष्याचे लिखाण केले असून, प्रमुख गृहांचा गोचर परिणाम प्रत्येक राशीस कसा राहील ते मांडण्यात आले असून त्याच बरोबर शुभ रंग, दिनांक व या वर्षी येणार्‍या अडचणी व मानसिक बल प्राप्त होण्यासाठी उपासना-उपाय दिलेले आहेत त्याचा उपयोग आपणास नक्कीच होईल असे ग्रहीत धरतो.

 

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
कासारवाडी, पिंपरी-चिंचवड

संपर्क – 9922311104

यश मिळवताना अधिक कष्ट घ्यावे लागतील

मीन रास

राशीचक्रातील मीन रास बारावी रास आहे. या राशीचे स्वामी गुरु महाराज आहेत. मीन राशी( Pisces-Annual Horoscope 2023-2024 )सौम्य व स्त्री राशी आहे. जलतत्वाची, द्विस्वभावी राशी आहे. दोन उलटसुलट माशाच्या आकृती म्हणजे मीन रास होय. या व्यक्ती कामापेक्षा भावनेला, उपदेशाला महत्व देतात. कारण मदत करणे, हळवे, भित्रे, दानी, प्रामाणिक व परोपकारी असे गुण अंगी असतात. क्षमाशील, विचारी, विसरभोळेपणा, तरल कल्पनाशक्ती। समजूतदार, सत्यवादी, ममताळू ’निरुपद्रवी असा स्वभाव असतो. जलप्रवासाची आवड असते. गुरु-ईश्वरांवर नितांत श्रद्धा, धार्मिक वृत्ती असते.

मीन राशीचे लोक फारच भावनाप्रधान असून स्वभावात गुंतागुंत अधिक दिसून येते. त्याग करणे, दया दाखविणे, परोपकार करणे, मदत करणे. हे या लोकांचं नेहमीचच काम असतं. झोप आणि कामाची वेळ सोडल्यास हे लोक इतर वेळ देवधर्म करण्यात मन गुंतवून ठेवतात. मीन राशीचे लोक सूड घेणे, मान अपमान यामध्ये आपला वेळ वाया घालवत नाहीत. खाण्या पिण्याच्या वेळा काटेकोरपणे पाळतात, तेलकट व ङ्गार तिखट पदार्थ हे लोक खात नाहीत. द्विस्वभावी राशी असल्यामुळे मनात कायम गोंधळ सुरू असतो. भावना व व्यवहार यांची सांगड घालणे या व्यक्तींना ङ्गारच कठीण जाते. परिस्थितीला वळण देणे,धैर्याने तोंड देणे यांना जमत नाही. त्यामुळे जगताना नेहमी आधार शोधतात.

आत्मविश्वास कमी असतो. तर मासेमारी, मीठ, वृद्धाश्रम, हॉटेल, बँका पशुपालन, योग, धर्मदाय संस्था, ध्यानधारणा, आयात-निर्यात इत्यादी क्षेत्रामध्ये मीन राशीचे लोक उत्तमपणे काम करू शकतात. मीन राशीमध्ये पूर्वभाद्रपदा ‘उत्तरभाद्रपदा व रेवती नक्षत्रे येतात. पूर्वभाद्रपदा नक्षत्रातील व्यक्ती आळशी, काळानुसार मत बदलणारी, धार्मिक असते. तर उत्तरभाद्रपदा नक्षत्रातील व्यक्ती धाडसी, पराक्रमी, मेहनती, कार्यक्षम, सज्जन असते. तर रेवती नक्षत्रातील व्यक्ती उत्तम स्मरणशक्ती, जनकल्याण करणारी, परिवारावरती प्रेम असणारी, आदरणीय असते. तर चालु वर्षे कसे राहील ते पाहु.

मीन रास : राशीच्या धन स्थानातून गुरुचे भ्रमण व मे 2024 नंतर तृतीयातून होणार आहे. व्ययस्थानी शनिचे भ्रमण वर्षभर राहणार आहे. व राहू-केतूचे भ्रमण आपल्याच राशीतून राहुचे भ्रमण व केतूचे भ्रमण सप्तमस्थानातून होत आहे. साडेसातीच्या ङ्गेर्‍यात आपण आला आहात. मात्र गुरुची अनुकुलता असल्यामुळे प्रतिकुलता कमी राहील. येणार्‍या समस्यांना मार्ग काढता आल्यामुळे आपणास समाधान मिळेल आगामी काळात तब्बेती कडे लक्ष दयावे लागेल. नोकरी व्यवसायात बरीच उलाढाल करावी लागेल. वाढत्या खर्चामुळे यावर्षी बचतीची ङ्गारशी अपेक्षा करता येणार नाही प्रखर कसोटीचा काळ म्हणता येईल.

कार्यक्षेत्राच्या प्रगतीसाठी कौटुंबिक वातावरण गढूळ होऊ देऊ नका. गुंतवणूक करताना सतर्क रहावे लागेल. जुनी येणी, नवीन कर्जमंजुरी यांपासून त्रास दर्शवितो महत्वाची कामे मे 2024 पुर्वीच उरकावी. व्यवसाय वृद्धीसाठी नवीन कल्पना असतील तर मे पूर्वीच राबवाव्यात. राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना आपला मुत्सद्दीपणा दाखवावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पाठदुखी, पायदुखी अशा प्रकारचे आजार संभवतात. जोडीदाराशी सलोख्याने राहून असलेले वाद संपुष्टात आणावेत. शनिचे भ्रमण आपल्या व्यथस्थानातून असल्यामुळे या काळात खर्‍या व्यक्तींची ओळख होईल. साडेसातीच्या काळात आपण पूर्वी केलेल्या कामाचे ऑडीट दिसते.

 

पूवा अध्यात्मिक प्रगतीला उत्तम काळ साडेसातीचा असतो. राहू-केतूचे भ्रमण राहूचे आपल्याच व केतूचे सप्तमातून असल्यामुळे विरोधकांच्या कारवाया वेळीच ओळखून त्यावर उपाय योजना करावी, नाहीतर तुम्हाला बदनाम करून ीलरशि सेरीं ची उपमा मिळेल. नवीन गुंतवणूक टाळावी. मन हाळवे व भावनाप्रधान, स्वप्नाळूपणा झाल्यास कर्मक्षेत्रावरती चांगलाच प्रभाव राहील. तुम्ही मांडलेली मते दुस-यांना पटवून देण्यासाठी जास्त स्पष्टीकरण द्यावे लागेल. आरोग्याच्या बाबतीत वात व कङ्ग विकार होऊ शकतात. एखादी वडिलार्जित प्रॉपर्टी ह्यापासून भावाबहिणींचे वादविवाद, मतभेद दर्शवितान कोर्टकचेरीची कामे मे नंतर मार्गस्थ होतील. महिलावर्गांना हे वर्ष आपल्याला संयमावरती बर्‍याच गोष्टी अनुकूल होणार आहेत.

कौटुंबिक जबाबदार्‍या पूर्ण करताना ओढाताण होईल. नोकरी-व्यवसाय क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना होणारे ङ्गेर बदल आपणास त्रासदायक राहतील. यावर्षी अपेक्षा कमी करून सातत्य टिकवावे लागेल. आपल्या शब्दाला आदर व महत्व कमी राहील. एकंदरीत नोकरीव्यवसायामध्ये राग-रंग ओळखून निर्णय घ्यावा. अर्थिक बाबतीत हे वर्ष ठिकठाक राहील. बँकेत पैसे शिल्लक राहीले नाही तरी गरजेपुरता पैसा मिळेल. एकंदरीत हे वर्ष आपणास सर्व क्षेत्रात संमिश्र ङ्गल देणारे राहिल.

उपासना : आपण ‘गणपती’ उपासना बरोबर ‘महालक्ष्मी’ उपासना केल्यास उत्तम राहील. देवी मंदिरात पांढर्‍या व गोड- पांढर्‍या पदार्थाचे दान करावे. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा दिवा लावावा. केळी व शहाळे हे दान प्यावे.

शुभरंग : गुलाबी, निळसर, पोपटी.

शुभ रत्न : प्रवाळ (पांढरा) मोनी, पुष्कराज या रत्नांचा वापर केल्यास ठिक राहील. त्याचबरोबर यावर्षी ‘स्मोकी क्वार्टझ’ या रत्नाचे पॅडल किंवा ब्रेसलेट चा वापर केल्यास उत्तम राहील.

शुभदिनांक : कोणत्याही महिन्याच्या 3,12 21.

भाग्यकारक वयोवर्षे : 9, 18, 26, 36, 44, 45.

Aries – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – मेष : प्रबल निर्णयक्षमतेतून यशप्राप्ती

Taurus – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – वृषभ : व्यवसायामध्ये स्थैर्य व उन्नती

Gemini – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – मिथुन : कार्यक्षेत्रात प्रगती होईल

Leo- Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य : सिंह –कर्माला भाग्याची साथ मिळेल

Virgo – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – कन्या : संघर्षातून यश प्राप्ती

Capricon- Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -मकर : यश व प्रगतीचा मार्ग सुकर होईल

Cancer – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – कर्क : आर्थिक स्थिती सुधारुन किर्ती प्रसिद्धीचे योग

 Scorpio – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – वृश्चिक: खडतर वाटचालीतून प्रगतीकडे नेणारे वर्ष

Sagittarius -Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -धनू रास : अनेक क्षेत्रात संधी मिळेल

Aquarius-Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -कुंभ : बुद्धीच्या जोरावर संकटांवर मात कराल

Libra – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य : तूळ – इच्छापूर्तीचा कालखंड

Pisces-Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -मीन : यश मिळवताना अधिक कष्ट घ्यावे लागतील

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.