Virgo – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – कन्या : संघर्षातून यश प्राप्ती

एमपीसी न्यूज : जाणून घेऊयात कन्या राशीचे वार्षिक (Virgo – Annual Horoscope 2023-2024) राशिभविष्य 2023-2024 कन्या राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकीत केले आहे ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश यांनी!

सर्वांना दीपावली व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नमस्कार अनेक शतकाच्या इतिहासात ज्योतिष विदयेचा वापर केलेला दिसत आहे. आज एकविसाव्या शतकात ते दिवसें दिवस लोकप्रिय होत आहे. असे दिसते. दैनिक वर्तमान पत्रातील भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता अनेक वर्षापासून राहीलेली आहेच.

आजच्या युगात यू ट्यूब, फेसबुक तसेच इतर सोशल मिडीया मध्ये सुद्धा भविष्य हा टॉपिक अगदी काळजीपूर्वक पाहताना व फाॅलो करताना आम्ही पाहिले आहे. जस जसे युग बदलेल तरीसुद्धा भविष्य पाहण्याची संख्या कमी होत नाही तर ती दिवसेंदिवस वाढतच आहे.

मुळात ज्योतिष विद्या ही क्रियाशील आध्यात्मिक विद्याशी जोडली आहे. त्यामुळे ज्योतिष विद्या व आध्यात्मिक विद्या यांचा प्रसार व प्रचार समाजाला दिल्यास आधुनिक तणाव ग्रस्त जीवनात एक प्रकारचे मानसिक बळ त्या व्यक्तीला व समाजाला प्राप्त होईल. यात शंका नाही.

मला इतर स्वतंत्र गुरू करण्याची गरज भासली नाही.कारण चांगले संस्कार व ज्योतिषाचे बाळकडू लहानपणापासूनच घरातच माझे आजोबा ज्योतिष मार्तंड पंडीत स्वामी यांच्याकडून मिळाले. मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. त्यांना शतशः प्रणाम! जीवनाचे मर्म समजविण्याचे पवित्र कार्य आपोआपच हातुन घडण्याचे भाग्य मला मिळाले.

राशीतील ग्रहाचे होणारे ग्रहयोग व त्यापासून होणारे फलित यावर स्वविचार मांडण्याचे बळ मिळाले. असो, दर वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा बारा राशींचे भविष्याचे लिखाण केले असून, प्रमुख गृहांचा गोचर परिणाम प्रत्येक राशीस कसा राहील ते मांडण्यात आले असून त्याच बरोबर शुभ रंग, दिनांक व या वर्षी येणार्‍या अडचणी व मानसिक बल प्राप्त होण्यासाठी उपासना-उपाय दिलेले आहेत त्याचा उपयोग आपणास नक्कीच होईल असे ग्रहीत धरतो.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
कासारवाडी, पिंपरी-चिंचवड

संपर्क – 9922311104

कन्या रास : संघर्षातून यश प्राप्ती
राशीचक्रातील ही रास सहावी असून, राशी स्वामी बुध आहे. पृथ्वीतत्वाची, द्विस्वभावी अशी रास आहे. कामामध्ये सूत्रबद्धता, नियोजन करणे, निरीक्षण करण्याची सवय, चिकीत्सक, व्यवहारदक्ष, बुद्धीशी निगडीत कामे या राशीतील व्यक्तींना फार आवडतात.

विचारात द्विधा मन:स्थिती असते. चालणे, बोलणे, तोलून मापून असते. लाजाळू, भावनाशील, विचारांचा थांगपत्ता लागून न देणे असे गुण या राशीतील व्यक्तींमध्ये असतात. थोडी आतल्या गाठीची, गूढ विद्येची आवड या राशीतील व्यक्तींना असते. दुसर्‍याच्या मनातील गोष्टी पटकन ओळखतात. लीडरशीप करणे यांना फारसे आवडत नाही.

त्यामुळे उत्तम लेखक, निर्माता, चिकित्सक या क्षेत्रात ह्या व्यक्ती दिसून येतात. संशोधनाची आवड, कोणत्याही गोष्टीच्या तळापर्यंत पोहचणे हे या राशीतील व्यक्तींना फार आवडते. कायम, सतत विचारात मग्न, दुसर्‍या व्यक्तींचा विचार करुन निर्णय घेणे, शारीरीक कष्टाची आवड कमी व बौद्धिक कामामध्ये रुची असते.

विद्वान, कुशाग्र बुद्धी यांचा योग्य वेळी समतोल ठेवल्यास बौद्धिक क्षेत्रात चांगले यश संपादन होईल. स्वयंपाक व खाण्याची आवड असते. व्यवहारकुशल, बुद्धिमान, काटकसरी, मनकवडे, थंड प्रवृत्ती, चौकस बुद्धी, अचूक निर्णयक्षमता हे गुण प्रकर्षाने या राशीच्या व्यक्तीमध्ये असतात.

उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या व्यक्ती मधुर वाणी, आत्मस्तुती, मानसन्मान करणारी, बोलघेवडे तर हस्त नक्षत्राची व्यक्ती हिशोबी, संसारप्रिय, हेकेखोर, दोष दाखविण्यात चतुर, भाग्यवान, कलाप्रेमी, तरुण दिसणारी असतात. तर चित्रा नक्षत्रातील व्यक्ती अप्पलपोटी, टिकाकार, मानी असतात. तर या व्यक्तींचे चालू वर्ष कसे राहील ते पाहू.

कन्या रास : राशीच्या अष्टम स्थानी गुरुचे भ्रमण व मे 2024 नंतर भाग्यस्थानी भ्रमण होणार आहे. यामुळे तुम्हाला वर्षाच्या उत्तरार्धात धर्मकार्याच्या गोष्टीमध्ये मन रमेल. धार्मिक यात्रा होतील. पुर्वार्धात अष्टमात असणारा गुरु अनपेक्षित उत्पन्न वाढवेल. प्रवासामध्ये दगदग कष्ट राहिले तरी त्याचे परिणाम आपल्यावरती दिसणार नाही.

मध्यम वयाच्या व्यक्तींना आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहतील. तुमच्या कौशल्याला व गुणांना मे 2024 नंतर संधी मिळेल. प्रॉपर्टीची अर्धवट राहिलेली कामे पुर्ण होतील. आपल्या वारसा हक्कासाठी कायदेशीर लढा द्यावा लागेल. शिक्षक, वकील, प्राध्यापक या क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना मनाप्रमाणे यश मिळेल.

पत्रव्यवहारामुळे लहान भाऊ यांस आपल्याकडून मदत मिळेल. हस्तकलाा-कौशल्य क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना हे वर्ष आपणास प्रसिद्धी व स्थैर्य प्राप्त करुन देणारे राहील. आपली महत्त्वकांक्षा दृढ होऊन आलेल्या संकटाला तुम्ही उत्तमरीत्या हाताळाल. राशीच्या षष्ठस्थानी शनिचे भ्रमण, सप्तमस्थानी राहूचे भ्रमण व आपल्याच राशीतून केतूचे भ्रमण होत असून अधून मधून स्वास्थ संबंधी समस्या वाढू शकतात.

वर्षांच्या पुर्वार्धात गुप्तशत्रूंचा त्रास, समस्या उद्भवतील. भागीदारीतील व्यवसायामध्ये सलोख्याने प्रश्‍न सोडवा. आरोग्याच्या बाबतीत जुने आजार, विकार डोके वर काढतील. रेंगाळलेली कामे पूर्ण करण्यासाठी आपणाला आपल्या नातेवाईकांची मदत घ्यावी लागेल. मात्र अधिक विश्‍वास ठेवणे सुद्धा महागात पडेल.

आर्थिक बाबतीत वर्षाच्या उत्तरार्धात म्हणजे मे 2024 नंतर मोठी गुंतवणूक आपणास फायदेशीर राहील. शेअर्स व्यवसायात फायदा होईल. नोकरीमध्ये उन्नतीचा काळ राहून आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हा कालखंड उत्तम राहून प्रगतीकारक राहील.

राहूचे भ्रमण सप्तम स्थानातून होत असल्यामुळे व केतुचे भ्रमण आपल्याच राशीत असल्यामुळे आपल्या जोडीदाराशी होणारे गैरसमज टोकाशी जाणार नाही याची दक्षता घ्यावी. कौटुंबिक दृष्ट्या वैद्यकीय खर्च घरातील व्यक्तीसाठी वाढू शकतो. अपचन, अ‍ॅसिडीटी, त्वचा विकार अशा गोष्टींतून त्रास होईल. विवाहइच्छुकांना यावर्षी विवाह करताना जोडीदाराची सखोल चौकशी करुन विवाह ठरवावा.

अन्यथा मनस्तापाचे प्रसंग उद्भवतील. फसवणूक सुद्धा होऊ शकते. महिला वर्गांना नोकरीच्या ठिकाणी असलेले प्रश्‍न सुटतील. संततीच्या दृष्टीने वर्षाचा उत्तरार्ध उत्तम राहील. त्यांच्याबद्दल असलेले गैरसमज दूर होतील किंवा त्यांना असणार्‍या अडचणीवर समाधानकारक उत्तर आपणास मिळतील.

नोकरी-व्यवसाय, सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना संघर्ष करुन यश मिळवावे लागेल. आपल्याला इच्छित यशप्राप्ती करण्यासाठी इतर व्यक्तींनी मध्यस्ती केल्यास होणारे वादविवाद टाळून आपली विनाअडथळे कामे पूर्ण होतील. मे 2024 नंतर अभ्यासामध्ये मन रमेल, बँकिंग क्षेत्रातील परीक्षा, स्पर्धापरीक्षा, कला, गायन, चित्र, नाट्य यामध्ये आपल्याला यश प्राप्ती होईल. प्रवासात मुख्य हेतु सफल होऊन नवीन ओळखी वाढतील. त्याचा फायदा आपणास नक्कीच होईल.

उपासना : आपण श्रीकृष्ण उपासना, विठ्ठल-रुक्मिणी उपासना केल्यास अनुकूल राहील. विशेष करुन यावर्षी काळे तीळ व केळी दान केल्यास ठीक राहील. पिवळ्या मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळ वृक्षाखाली प्रज्वलीत करावा. (बुधवार, शनिवार या दिवशी)गोशाळेमध्ये, अन्नछत्रामध्ये दान द्यावे.

शुभरंग : पिवळा, पांढरा, चमकदार बॉॅटल ग्रीन या रंगाचा वापर अधिक करावा.
शुभरत्न : पांढरा पुष्कराज, पाचू या रत्नांचा वापर केल्यास उत्तम व यावर्षी केुश्रळींश याचे ब्रेसलेट किंवा पँडेल वापरावे.
शुभदिनांक : 5, 14, 23.
भाग्यकारक  वयोवर्षे : 15, 25, 36, 42, 51, 60.

Aries – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – मेष : प्रबल निर्णयक्षमतेतून यशप्राप्ती

Taurus – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – वृषभ : व्यवसायामध्ये स्थैर्य व उन्नती

Gemini – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – मिथुन : कार्यक्षेत्रात प्रगती होईल

Leo- Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य : सिंह –कर्माला भाग्याची साथ मिळेल

Virgo – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – कन्या : संघर्षातून यश प्राप्ती

Capricon- Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -मकर : यश व प्रगतीचा मार्ग सुकर होईल

Cancer – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – कर्क : आर्थिक स्थिती सुधारुन किर्ती प्रसिद्धीचे योग

 Scorpio – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – वृश्चिक: खडतर वाटचालीतून प्रगतीकडे नेणारे वर्ष

Sagittarius -Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -धनू रास : अनेक क्षेत्रात संधी मिळेल

Aquarius-Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -कुंभ : बुद्धीच्या जोरावर संकटांवर मात कराल

Libra – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य : तूळ – इच्छापूर्तीचा कालखंड

Pisces-Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -मीन : यश मिळवताना अधिक कष्ट घ्यावे लागतील

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.