Sagittarius -Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -धनू रास : अनेक क्षेत्रात संधी मिळेल

एमपीसी न्यूज – जाणून घेऊया धनु राशीचे (Sagittarius-Annual Horoscope 2023-2024)वार्षिक राशिभविष्य 2022-2023.धनु राशीसाठी हे वर्ष कसे जाईल,याचे भाकीत केले आहे ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांनी 

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

नमस्कार अनेक शतकाच्या इतिहासात ज्योतिष विदयेचा वापर केलेला दिसत आहे. आज एकविसाव्या शतकात ते दिवसें दिवस लोकप्रिय होत आहे. असे दिसते. दैनिक वर्तमान पत्रातील भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता अनेक वर्षापासून राहीलेली आहेच. आजच्या युगात यू ट्यूब (र्धेी र्ींीलश), ङ्गेसबुक (ऋ.इ) तसेच इतर सोशल मिडीया मध्ये सुद्धा भविष्य हा टॉपिक अगदी काळजीपूर्वक पाहताना व ङ्गॉलो करताना आम्ही पाहिले आहे.

जस जसे युग बदलेल तरीसुद्धा भविष्य पाहण्याची संख्या कमी होत नाही तर ती दिवसेंदिवस वाढतच आहे. मुळात ज्योतिष विद्या ही क्रियाशील आध्यात्मिक विद्याशी जोडली आहे. त्यामुळे ज्योतिष विद्या व आध्यात्मिक विद्या यांचा प्रसार व प्रचार समाजाला दिल्यास आधुनिक तणाव ग्रस्त जीवनात एक प्रकारचे मानसिक बळ त्या व्यक्तीला व समाजाला प्राप्त होईल. यात शंका नाही.

मला इतर स्वतंत्र गुरू करण्याची गरज भासली नाही. कारण चांगले संस्कार व ज्योतिषाचे बाळकडू लहानपणापासूनच घरातच माझे आजोबा ज्योतिष मार्तंड पंडीत स्वामी यांच्याकडून मिळाले. मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. त्यांना शतशः प्रणाम! जीवनाचे मर्म समजविण्याचे पवित्र कार्य आपोआपच हातुन घडण्याचे भाग्य मला मिळाले.

राशीतील ग्रहाचे होणारे ग्रहयोग व त्यापासून होणारे ङ्गलित यावर स्वविचार मांडण्याचे बळ मिळाले. असो, दर वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा बारा राशींचे भविष्याचे लिखाण केले असून, प्रमुख गृहांचा गोचर परिणाम प्रत्येक राशीस कसा राहील ते मांडण्यात आले असून त्याच बरोबर शुभ रंग, दिनांक व या वर्षी येणार्‍या अडचणी व मानसिक बल प्राप्त होण्यासाठी उपासना-उपाय दिलेले आहेत त्याचा उपयोग आपणास नक्कीच होईल असे ग्रहीत धरतो.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तू सल्लागार

कासारवाडी,पिंपरी चिंचवड

संपर्क 9922311104

 

अनेक क्षेत्रात संधी मिळेल

 

धनू रास –

राशीचक्रातील धनू रास नववी रास असून, राशी स्वामी गुरु आहे. अग्नितत्त्वाची, द्विस्वभावी, पुरुषलक्षी अशी आहे. या राशीचे चिन्ह अश्‍वमानव असे आहे. शौर्य, कष्टाळू, परिश्रम घेणारे, सभ्य, देवधर्म, न्यायी, उमदे व्यक्तिमत्त्व, लढाऊपणा, विजय मिळवणे, दुर्बलांना अभय देणे हे सर्व गुण या राशीतील व्यक्तींमध्ये पहावयास मिळते. एकाच वेळी भिन्न मतेही असतात. कणखरपणा अंगी असल्यामुळे व्यक्तिमत्वही कणखर व समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडणारे असते.

उच्च ध्येय व जबरदस्त महत्त्वकांक्षा हे लोक अंगी बाळगून असतात. जबरदस्त आशावाद असल्यामुळे कामामध्ये प्रचंड अडथळे आले तरीही ते बाजूला सारुन पुढे जाण्याची धमक या व्यक्तीमध्ये असते. यांच्यामध्ये मानवी बुद्धी, भरपूर शक्ती व क्षत्रियाचे तेज यांचा सुरेख संगम असतो. प्रत्येक गोष्टीला शोधक वृत्तीने पाहतात. साधे, सात्विक व रुचकर आहार घेणे ते पसंत करतात. तर शक्तिमान, सदैव उत्साही, मानवतावादी, धडाडी, बळकट, काटक, धर्माभिमानी, लढाऊ, शौर्य, दानप्रिय, उमदा, स्वामीनिष्ठा, कर्तव्य तत्परता, साहसी, खेळांची आवड, तत्त्वनिष्ठ, ईश्‍वरनिष्ठा, न्यायी, अध्यात्मकल, संशोधनप्रिय, आत्मविश्‍वासाने परिपूर्ण असे गुण धनू राशीच्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने बघावयास मिळतात.

या राशीतील आपल्या बुद्धिचा, शक्तीचा अहंकार खूप असतो यांचा अतिआत्मविश्‍वासामुळे स्वभाव करारी, घातक व हेकट बनतो. नोकरी, भव्य प्रकल्प, आयुर्वेदिक औषधे, वाङमय,शस्त्रास्त्र निर्मिती, अध्यात्मिक संबंधित ग्रंथ, व्यवसाय करुन ह्या व्यक्ती आयुष्याला अर्थ प्राप्त करुन देऊ शकतात.राशीमध्ये मुळ, पुर्वाषाढा, उत्तराषाढा ही नक्षत्रे येतात. मुळ हे नक्षत्र स्वाभीमानी, मुडी, चंचल, त्यागी असे असते.

पुर्वाषाढा नक्षत्र दयाळु, क्षमाशील, फॅशनची आवड असणारी, गायन-वादन यात निपुण असणारी, तर उत्तराषाढातीलव्यक्ती दिर्घउद्योगी, काटकसरी तेजस्वी, मनकवडी असते. तर चालु वर्षे कसे राहील ते पाहु –

धनू रास
राशीच्या पंचम स्थानी गुरुचे भ्रमण होत असून, मे 2024 नंतर षष्ठ स्थानातून भ्रमण होणार आहे. साडेसाती ( Sagittarius – Annual Horoscope 2023-2024)संपली तरीसुद्धा मला स्थैर्य का मिळेना याचा विचार करत असाल तर यावर्षी धडाकेबाज सुरुवात नक्कीच होईल. गेली काही वर्षे मानसिक अस्थैर्य मिळाल्यामुळे मनाची जी घालमेल झाली होती ती बंद होऊन सुखाचे दिवस सुरु होतील.
जीवनाच्या सर्वच आघाडीवरती यशस्वी व्हाल. घरात मंगलकार्य पार पडतील. दिर्घकालीन रेंगाळलेली कामे सहजरीत्या पूर्ण होतील. तुम्ही उत्तम सल्लागार, दिशादर्शक असल्यामुळे लोककल्याणाची केलेली काम यामुळे आपली समाजामध्ये किर्ती व नावलौकिक वाढेल. नशीबाची साथ उत्तम राहील. एखादा मोठा गुणगौरव प्राप्त होण्याचे संकेत दर्शवतात. आलेल्या संधीचा आपण लाभ घ्यावा.

तुमच्या वत्कृत्वामुळे समाजावरती तुमची छाप पडेल. सर्व कामामध्ये लाभ मिळून मित्र-मैत्रिण यांच्या भेटीगाठी होऊन आनंदी व उत्साही वातावरण राहील. परदेशगमनाच्या इच्छा करणार्‍या व्यक्तीना यावर्षी नक्कीच परदेशवारी घडेल. वर्षाच्या उत्तरार्धात बँकेची, कर्जाची कामे सहजरीत्या पूर्ण होतील. आरोग्याच्या तक्रारी मात्र अधूनमधून उद्भवण्याची शक्यता राहील. मन चंगा तो कटोतीमध्ये मे गंगा या म्हणीचा प्रत्यय यावर्षी आपणास नक्कीच येईल धाडस, साहस, अंगात जोश असल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये कार्य करण्यास उत्सुक असाल.

राशीच्या तृतीय स्थानातून शनिचे भ्रमण असून आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणारे राहील.संतती बाबतीत चे प्रश्न विचारपूर्वक सोडवावे लागतील. नवीन शिकण्याची संधी मिळेल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरीमध्ये तुमचे सहकारी तुम्हाला, साथ देऊन तुमच्या गोष्टीची साथ देतील. त्यामुळे आपले नेतृत्वगुण उजळून निघेल. राहू-केतूचे भ्रमण आपल्या चतुर्थ व दशम स्थानातून होत असल्यामुळे मेडिकल क्षेत्रात असणार्‍या व्यक्ती, हॉस्पीटलमध्ये काम करणार्‍या व्यक्ती, धर्मप्रसारक, प्रवचनकार किर्तनकार सल्लागार अशा क्षेत्रात काम करणार्‍यांना हे वर्ष उत्कर्ष व उन्नतीचे राहील.

त्याचबरोबर घरामध्ये गरज असली तरच वस्तूंची खरेदी केल्यास उत्तम नाहीतर विनाकारण खर्चाचे प्रमाण वाढेल. आपल्याला ’शनि महाराजांनी सत्याची महानता व परिश्रमाचे ङ्गल हे दाखवून दिलेलेच आहे त्या दृष्टीने तुमची वाटचाल करावी. कौटुंबिक व महिलावर्ग हे वर्ष समाधानकारक व आत्मविश्वास पूर्ण राहील. घरामध्ये पै- पाहुण्यांची रेलचेल वाढेल. कौटुंबिक वादविवाद असतील तर ते थोड्या वेळेपुरतेच असतील.

विवाहइच्छुकांना मे पूर्वीचा कालखंड चांगला आहे त्यानंतरचा कालखंड दिरंगाई किंवा उशीर होऊ शकतो. संततीच्या बाबतीत हे वर्ष गरमगरम राहील. प्रवास उत्तम घडेल. एकंदरीत वर्षारंभी सोन्याचे दिवस येतील.प्रगती व यशाची चाहूल, नवीन संधी प्राप्त होतील. तसेच, विद्यार्थीवर्गाला परदेशाचे शिक्षण घेण्याचे योग दर्शवितात.

उपासना : आपण ‘दत्त उपासना‘ गुरु सांप्रदायातील संतांची उपासना केल्यास योग्य राहील. त्याचबरोबर कालभैरव उपासना, स्तोत्र, मंत्र वाचन यांचे पठण केल्यास उत्तम राहील. विशेषकरून यावर्षी केशर या चा वापर करता येईल.जसे की केशरगंध, केशर -तिलक, केशरदूध .

शुभरंग : चमकदार पिवळा, आईस्क्रिम कलर, ङ्गिकट लाल, डाळिंबी कलर या रंगाचा वापर केल्यास उत्तम

भाग्यवान रत्न : -‘माणिक‘ या रत्नाचा वापर केल्यास उत्तम राहील. त्याचबरोबर या वर्षी ’सिटरीन’ या रत्नाचे ब्रेसलेट अथवा पँडेल याचा वापर केल्यास उत्तम राहील.

शुभ तारीख : कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30.

भाग्यवान : 18, 22, 34, 43, 54 , 63.

Aries – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – मेष : प्रबल निर्णयक्षमतेतून यशप्राप्ती

Taurus – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – वृषभ : व्यवसायामध्ये स्थैर्य व उन्नती

Gemini – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – मिथुन : कार्यक्षेत्रात प्रगती होईल

Leo- Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य : सिंह –कर्माला भाग्याची साथ मिळेल

Virgo – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – कन्या : संघर्षातून यश प्राप्ती

Capricon- Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -मकर : यश व प्रगतीचा मार्ग सुकर होईल

Cancer – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – कर्क : आर्थिक स्थिती सुधारुन किर्ती प्रसिद्धीचे योग

 Scorpio – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – वृश्चिक: खडतर वाटचालीतून प्रगतीकडे नेणारे वर्ष

Sagittarius -Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -धनू रास : अनेक क्षेत्रात संधी मिळेल

Aquarius-Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -कुंभ : बुद्धीच्या जोरावर संकटांवर मात कराल

Libra – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य : तूळ – इच्छापूर्तीचा कालखंड

Pisces-Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -मीन : यश मिळवताना अधिक कष्ट घ्यावे लागतील

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.