Sagittarius – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – धनु : पदवी व पुरस्कार प्राप्तीचे योग

एमपीसी न्यूज : जाणून घेऊयात धनु राशीचे वार्षिक राशिभविष्य 2022-2023 (Sagittarius – Annual Horoscope 2022-2023). धनु राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकीत केले आहे ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांनी!

सर्वांना दीपावली व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्योतिष शास्त्राचे सूक्ष्म निरीक्षण केले असता प्रामुख्याने दोन विभागात याचा विचार होऊ शकतो. पहिला म्हणजे आपल्या ऋृषिमुनींनी ग्रह, नक्षत्रे यांची गती व दुसर्‍या विभागात त्याची फलीते राशीवर होणारा विचार फलीत विभागात तर्क अनुमान, निष्कर्ष, अंदाज अशा माध्यमातून वर्तविले जाते.

तसेच फलित हे ठराविक कालावधीनंतर बदल व सुधारणा होत गेली. कोणत्याही शास्त्राची निर्मिती ही मानव कल्याणाकरीता केली आहे, असे मला वाटते. त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्राचा सुद्धा मानवाला येणार्‍या सुख-दु:खाचा मागोवा घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो. हे शास्त्र मानवाला देववादी किंवा कर्तव्यशून्य न बनवता प्रयत्नवादी. बनवेल असो!

प्रस्तुत राशी भविष्यामध्ये आम्ही ह्या वर्षी आगामी म्हणजे या वर्षी प्रमुख ग्रहस्थितीचा अभ्यास करून फलीत दिली आहेत. त्यांचा उपयोग आपणास होईल व येणार्‍या वर्षाचा अंदाज येऊ शकेल. तसेच शुभ रंग, शुभ काळ, उपासना सुद्धा दिली आहे. त्याचा उपयोग आपणास येणार्‍या अडचणीच्या काळात आपली मानसिकता सक्षम होण्यास मदत होईल.

ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
कासारवाडी, पिंपरी-चिंचवड

संपर्क – 9922311104

धनु रास : पदवी व पुरस्कार प्राप्तीचे योग

धनु रास ही राशीचक्रातील नववी रास असून अग्नितत्तवाची, द्विस्वभावी, पुरुष राशी आहे. ह्या राशीचा स्वामी गुरु असून राशीचे चिन्ह धनुष्यबाण असे आहे. अत्यंत सात्विक, न्यायी, परोपकारी, आशावादी व धर्मउपदेशी अशा या राशीच्या व्ङ्मक्ती असतात. मात्र पराक्रम, एकाग्रता, शौर्य असून संकटे, दुःख दूर करून यश मिळवणे हा गुण प्रामुख्याने सापडतो. भारदस्त व्यक्तिमत्व, सुसंस्कृतपणा,समाजावर चटकन छाप पाडणार्‍या व्यक्ती असतात. प्रांजळ व मोकळा स्वभाव. एखाद्या संस्थेची मनापासून सेवा करणे. सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची कला असते. योग्य मार्गदर्शन, कायदा व सुव्यवस्था यांची उत्तम सांगड घालून काम करण्याची कला यांच्याकडे असते. आदर्शवादी व्यक्तिमत्व असते.

धनु राशीमध्ये मूळ, पूर्वाषाढा व उत्तराषाढा ही नक्षत्रे येतात. धनु रास मूळ नक्षत्राच्ङ्मा व्यक्ती सशक्त, दणकट, बलवान, धाडसी, काही प्रमाणात चंचल स्वभावाची व एकांतप्रिय असतात. यांना मूळात श्रेष्ठत्त्व गाजविण्यास आवडतो. धनुरास पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती गर्विष्ठ, मैत्री कायम टिकवणार्‍या, बलवान, धनवान, सामान्य बुद्धीमत्ता, पैशांचा लोभ असणार्‍या अशा असतात. यांना आनंदी व सुस्वभावाची प्राप्ती होते. नोकरीची आवड असणारे, तर लबाडीच्या व्यवहारात फसगत होणारे असतात. तर धनु रास उत्तराषाढा नक्षत्र असणार्‍या व्यक्तीचा स्वभाव आशावादी, महत्वाकांक्षी, शिक्षणाची आवड असणारे तीव्र इच्छाशक्ती, शांत स्वभाव, धार्मिक व नम्र असतात. तर धार्मिकता जपणारी व विचारांची ताळमेळ साधून, समाजात वावरणार्‍या धनु राशीच्या व्यक्तींचे चालू वर्ष कसे राहील ते पाहू. (Sagittarius – Annual Horoscope 2022-2023)

राशीच्या चतुर्थातून गुरुचे भ्रमण धनस्थानातून शनि प्लुटो, पंचमस्थानी केतू, हर्षल लाभस्थानी राहू, चतुर्थात नेपच्यून अशी एकंदरीत प्रमुख ग्रहांची परिस्थिती आहे. या वर्षाच्या पहिल्या टप्पात आपणास खूप मेहनत घ्यावी लागेल. आर्थिकदृष्ट्या हे वर्ष तुमच्यासाठी सकारात्मक राहील. जर तुम्ही काही नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना करत असाल तर वर्षाचा उत्तरार्ध उत्तम राहील. कौटुंबीक कार्यासाठी आपल्यावर जबाबदारी वाढू शकते. तुम्हाला कुठल्याही अप्रत्यक्ष बदलासाठी तयार रहावे लागेल. आरोग्याच्या बाबतीत वर्षाचा पूर्वार्ध जास्त लक्ष देण्यासारखा राहील. आपल्याला खाण्यापिण्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्याला काहीवेळा पोटासंबंधी तक्रारी उद्भवतील. तसेच, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचीसुद्धा आरोग्याची दक्षता घ्यावी लागेल. वैवाहिक सौख्याच्या बाबतीत हे वर्ष सकारात्मक व अनुकूल सिद्ध होऊ शकते. नोकर, व्यवसायिक व्यक्तींना नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर, जानेवारी 2023 नंतर विचार करावा. तसेच मोठी गुंतवणूक व मध्यस्थी करणे टाळावे. आर्थिक बाबतीत तुम्हाला स्थावर मालमत्ता, पैतृक प्रॉपर्टीचा लाभ होऊ शकतो. करिअरच्या दृष्टीने विचार करत असल्यास आपणास मनासारखी ही मार्च 2023 नंतरच मिळण्याची शक्यता आहे. धनु राशीच्या व्यक्तीना होणारा म्हणजे 17 जानेवारी 2023 नंतर शनि बदल हा तुमच्यासाठी अनुकूल राहील. सर्वच क्षेत्रात यश मिळण्यास सुरुवात होईल. आपण साडेसाती फेऱ्यातून मुक्त होत आहात. गेल्या काही वर्षापासून आपल्या संघर्षाला आता यश मिळेल. अनेकांशी झालेले वाद-विवाद, गैरसमज दूर होतील, जुने कर्ज फिटेल व आर्थिक आवक वाढेल. 22 एप्रिल 2023 नंतर होणारा गुरु बदल ही आपणास अनूकूल राहणार असून आपल्या मानसिक स्थितीमध्ये फरक जाणवेल, आत्मविश्वास वाढत राहील.

शेअर्स, सट्टा व अन्य व्यवसायात लाभ होईल. तुमच्या भावंडाच्या सहकार्याने तुम्हाला यशही मिळेल.  विद्यार्थी वर्गाला शिक्षणातही चांगले यश मिळेल. व तुमचे उत्पन्न ही वाढेल. एप्रिलनंतर होणारा गुरु बदल हा तुम्हास मान-सन्मान देणारच आहे. त्याच बरोबर विवाहेइच्छुकांचे विवाह सुद्धा पार पडतील. नोकरदार व्यक्तींना ऑकटोबर ते डिसेंबर 2023 हा काळ उत्तम राहील. बढती मिळेल. व्यवसाय-उद्योगाच्या व्यक्तींची अडकलेली कामे पूर्ण होतील.

विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी अनुकूल कालखंड राहील. विशेष करून स्पर्धा परीक्षांसाठी कालखंड फेब्रुवारी 2023 मे एप्रिल 2023 व ऑगस्ट 2023 ते सप्टेंबर 2023 हा काळ उत्तङ्क राहील. एकंदरीत साडेसाती या वर्षी संपत असल्यामुळे आपणास येणारा कालखंड सुखदायक व यशदायक राहील. महिला वर्गाला गेलेला आत्मविश्वास परत प्राप्त होईल.

खेळाडू वर्गाला यशदायक वर्ष राहील. जे लोक अनेक दिवसांपासून यशाची वाट पाहत होते, त्यांना ङ्मा वर्षापासून नक्कीच यशदायक  राहील. महत्त्वाचे म्हणजे धनू राशीच्या व्यक्तींना वर्षांचा उत्तरार्थ हा यश, आर्थिक प्रगती व समृद्धी आणणारा असेल. तरुण व्यक्तीला राजकीय क्षेत्रात यश मिळण्यास  उत्तम कालखंड आहे.

या राशीच्या व्यक्तीना शनीच्या साडेसातीपासून मु्नती मिळेल. ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर 2023 हा कालखंड खूप चांगला काळ येईल. धनु राशीच्या लोकांचे वय वर्ष, 22, 24, 28, व 32 आहेत, त्या व्यक्तींना एक नवी दिशा व मोठा भाग्योदय होण्याचा कालखंड.

शुभदिनांक: 3,12, 21, 30,

शुभकारक वयोवर्षे : 18, 22, 34, 43, 54, 63

शुभ रत्न : माणिक, पिवळा पुष्कराज यांचा वापर केल्यास उत्तम राहील.

उपासना: आपण दर गुरुवारी राम चालिसाचे पाठ करावे. पिवळा, केशरी व लाल पदार्थाचे दान द्या. गाईला हिरवा चारा, व थोडा गूळ व डाळ हे खाऊ घाला. दर शनिवारी अथवा मंगळवारी – धान्याचे दान केल्यास उत्तम राहील व रामरक्षा स्तोत्राचा पाठ केल्यास उत्तम.

Aries – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मेष : करिअर व आर्थिक स्थिती सुधारणा

Taurus: Annual Horoscope 2022-23- वार्षिक राशी भविष्य – वृषभ : परदेशगमन व प्रवासाचा योग

Gemini – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मिथुन : अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल

Cancer- Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – कर्क – संघर्षातून यशप्राप्ती

Leo- Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य : सिंह – हळूहळू पण नक्कीच यशप्राप्ती

Virgo – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – कन्या: जीवनात चढ-उतार

Libra – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य : तूळ – कायदेशीर कामात यशदायक कालखंड

Scorpio : Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – वृश्चिक: अविस्मरणीय वर्ष

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.