Cancer- Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – कर्क – संघर्षातून यशप्राप्ती

एमपीसी न्यूज – जाणून घेऊयात कर्क राशीचे वार्षिक (Cancer- Annual Horoscope 2022-2023) राशी भविष्य 2022-2023. कर्क राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकित केले आहे नामवंत ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांनी.

ज्योतिष शास्त्राचे सूक्ष्म निरीक्षण केले असता प्रामुख्याने दोन विभागात याचा विचार होऊ शकतो. पहिला म्हणजे आपल्या ऋृषिमुनींनी ग्रह, नक्षत्रे यांची गती व दुसर्‍या विभागात त्याची फलीते राशीवर होणारा विचार फलीत विभागात तर्क अनुमान, निष्कर्ष, अंदाज अशा माध्यमातून वर्तविले जाते.

तसेच फलित हे ठराविक कालावधीनंतर बदल व सुधारणा होत गेली. कोणत्याही शास्त्राची निर्मिती ही मानव कल्याणा करीता केली आहे, असे मला वाटते. त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्राचा सुद्धा मानवाला येणार्‍या सुख-दु:खाचा मागोवा घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

हे शास्त्र मानवाला देववादी किंवा कर्तव्यशून्य न बनवता प्रयत्नवादी. बनवेल असो! प्रस्तुत राशी भविष्यामध्ये आम्ही ह्या वर्षी आगामी म्हणजे या वर्षी प्रमुख ग्रहस्थितीचा अभ्यास करून फलीत दिली आहेत. त्यांचा उपयोग आपणास होईल व येणार्‍या वर्षाचा अंदाज येऊ शकेल. तसेच शुभ रंग, शुभ काळ, उपासना सुद्धा दिली आहे. त्याचा उपयोग आपणास येणार्‍या अडचणीच्या काळात आपली मानसिकता सक्षम होण्यास मदत होईल.

 

ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
कासारवाडी, पिंपरी-चिंचवड

संपर्क – 9922311104

कर्क रास : संघर्षातून यशप्राप्ती

कर्क रास राशीचक्रामधील चौथी रास असून जलतत्वाची, स्त्री स्वभावी आहे. या राशीचा स्वामी चंद्र आहे. प्रसन्नता व संवेदनशीलता हे गुण आढळतात. सतत विचारांची अदलाबदल होते, त्यामुळे अत्यंत भावनाप्रधान या राशीच्या व्यक्ती असतात. या राशीचे चिन्ह खेकडा आहे. (Cancer- Annual Horoscope 2022-2023) त्यामुळे आपल्या उद्दिष्ट व विचाराला चिकटून असतात त्यामुळे सर्वांशी संबंध चांगले व मधुर असतात. संस्थेत, कार्यालयात, सामाजिक क्षेत्रात पूर्णपणे समर्पित होऊन काम करतात. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाची छाप दुसरया लोकांवर सहज पाडतात.

लोकप्रियता, लोकसंग्रह करण्याची उत्तम कला यांना अवगत असते. क्षमाशीलता हा गुण असल्यामुळे सहसा शत्रू या राशींना कमी असतात. नेतृत्व व अधिकारपद हे उत्तमरित्या सांभाळतात तर अशा सोज्वळ व्यक्तिमत्व असणार्‍या कर्क राशीच्या व्ङ्मक्ती असतात. कर्क राशीमध्ये पुनर्वसू, पुष्य व आश्‍लेषा ही नक्षत्रे येतात. कर्क रास पुनर्वसू नक्षत्र असणार्‍या व्यक्तीचा स्वभाव ईश्वरावर श्रद्धा असणारा, स्वतःचे विचार मांडणारा. धर्मशील, कायदेपंडीत, या व्यक्तीचा आत्मविश्वास ही चांगला असतो.

कर्क रास पुष्य नक्षत्र असणार्‍या व्यक्ती पाठ करणारे, बुद्धीमान, भाऊ-बहिणीमध्ये लाडके, राजप्रिय, घरामध्ये एकमत्र कुटुंबात राहणार्‍या व्यक्ती असतात तर कर्क रास आश्‍लेषा या नक्षत्रातील व्ङ्मक्ती परिणामांची चिंता न करणार्‍या काही वेळा विश्वास नसणार्‍या, क्रोधी कृतघ्न, अनेक भाषांचे ज्ञान असणार्‍या, वैभवाची इच्छा करणार्‍या राजकारणी, साहसी, अभिमानी, स्वातंत्र्यप्रिय असतात तर अशा कर्क राशीच्या व्यक्तींचे चालू वर्ष कसे राहील? राशीच्या भाग्य स्थानातून होणारे गुरुचे भ्रमण व पाहू एप्रिल 2023 नंतर येणारया दशमातून गुरुचे भ्रमण तसेच राशीच्या सप्तम स्थानातून होणारे शनिचे भ्रमण व जानेवारी 2023 नंतर अष्टङ्कातून शनिचे भ्रमण होणार आहे.

त्याचबरोबर चतुर्थातून व दशमातून राहू-केतूचे भ्रमण होत असून हर्षल, नेपच्यून, प्लूटो अनुक्रमे दशम, सप्तम, भाग्यातून भ्रमण करणार आहेत. अशी एकंदरीत प्रमुख ग्रहांची परिस्थिती राहील. तर वर्षाच्या प्रारंभी गुरूची अनिष्टता असल्यामुळे व प्रमुख ग्रहांची गोचर भ्रमण अनिष्ट असल्यामुळे आपल्याला अस्वस्थता जाणवेल. रेंगाळलेली कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. करिअरमध्ये सुद्धा घढ-उतार पाहवयास मिळेल कुटुंबाबद्दल गैरसमज वाढतील. तुम्ही ज्यांच्या भरवश्यावर जे निर्णय घेतले होते, त्याच व्यक्ती विश्वासास अपात्र ठरतील. तुमच्या व्यवसायाकडे अधिक लक्ष देण्याची गरज राहील.

शारीरिक स्वास्थ्य व मानसिक स्वास्थ्ङ्म मिळणार नाही. आपल्या पार्टनरसोबत अधिक लक्ष निर्धारीत केल्यास ते तुमच्यासाठी उपयोगी सिद्ध राहील. मातुल घराण्याची मदत मिळेल. आपल्या लहान भाऊ -बहिणींचा पूर्ण सहयोग प्राप्त होईल. गुप्त शत्रूच्या कारवाया वाढतील. मात्र एप्रिल 2023 नंतर होणारा गुरुबदल तुम्हाला तुमच्या दिनचर्येत सुधारणा करणे आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक कालावधी राहील. (Cancer- Annual Horoscope 2022-2023) आपल्या सामाजिक अस्तित्वात शुभ संकेत प्राप्त होतील. नोकरी व्यवसायामध्ये काही संधी समोर येऊ शकतात. परंतु उत्तम व वाईट दोन्ही पैलूंचा विचार करून निर्णय घेतल्यास तो सिद्धीला जाऊ शकतो. काही कौटुंबीक कार्यक्रमावर खर्च करावे लागतील.

मोठी गुंतवणूक करण्यासाठी हे वर्ष अनुकूल राहील. सरकारी कामामध्ये अडथळे आले तरीसुद्धा ते संथगतीने पूर्ण होतील. मोठे प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागेल. विवाहेइच्छुकांचे विवाह ठरलेल्या वेळेत पूर्ण होण्यासाठी अडचणी येतील. महिलावर्गाला वर्षातील पहिली तिमाही चढउताराने भरलेली असेल. तुम्ही तुमची कामे दुसर्‍यांवरती लादल्यामुळे तुम्हास मिळणारी संधी हुकेल. (Cancer- Annual Horoscope 2022-2023) नोकरीमध्ये व राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या महिला वर्गाला मे – जून – जुलै हे महिने उत्तम राहतील. तुमच्या कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. विद्यार्थी वर्गाला या वर्षी अभ्यास लक्षपूर्वक करावा लागेल. कौटुंबीक वातावरण बिघडवू शकते. कुटुंबातील सदस्यांना एकमेकांशी जुळवून घेताना अडचणी निर्माण होतील. ऑगस्ट महिन्यानंतर कौटुंबीक जीवनात सुसंवाद वाढवणारा काळ राहील. सप्टेंबर 2023 नंतर तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगल्या संधी प्राप्त होतील. पूर्वी ज्या समस्या होत्या त्या कमी होतील.

आपण हळूहळू आपला व्यवसाय वाढवू शकाल. ऑक्टोबर 2023 ते डिसेंबर 2023 लांबचे प्रवास योग्य काही नवीन संपर्क व्यवसायासंदर्भात केलेले प्रवास शुभदायक ठरतील. यावर्षी कोणतेही मोठे वाहन खरेदी करणे टाळावे. मात्र 30 ऑक्टोबर 2023 नंतर व नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2023 तो काळ वाहन खरेदी, मालमत्ता खरेदी साठी अत्यंत शुभ कालावधी राहील.

आर्थिकदृष्टया दीर्घकाळाची गुंतवणूक श्रेष्ठ राहील. विशेषतः जानेवारी 2023 ते एप्रिल 2023 हा काळ आर्थिकदृष्टया शुभ राहील. नंतरचे काही महिन्यात चढ-उतार जाणवेल. तथापि वर्षाच्या उत्तरार्धात ऑक्टोबर 2023 नंतरच अर्थिक लाभाच्या घटना घडतील. आरोग्यदृष्टीने सतत लक्ष द्यावे लागेल. ठराविक अंतराने वैद्यकीय तपासणी करावी लागेल.
हे वर्ष तुम्हाला संमिश्र राहील. साधूसंतांचा आर्शीवाद मिळेल. नोकरी व्यवसायामध्ये प्रगती राहील.कौटुंबिक वातावरणामध्ये दक्षता घ्यावी लागेल.विद्यार्थी वर्गाला यावर्षी जास्त मेहनत घ्यावी लागेल.

शुभरंग : पांढरा, आकाशी, दुधी रंग, केसरी, इ.
शुभदिनांक : 2 11, 20, 29
शुभकारक वयोवर्ष : 11,12,13,16, 21, 31, 48, 59, 66
शुभरत्न : मोती , पांढरा पुष्कराज, पांढरा प्रवाळ.

उपासना : आपण ‘पौर्णिमा’ करावे. सोमवारी भगवान शंकराच व्रत ‘चंद्रशेखर’ हे रूप असणार्‍या मंदिरात अथवा मूर्तीचे दर्शन घ्यावे.‘शिवसहस्त्र नाम’, ‘शिवपाठ’ करणे आपणास फायदेशीर ठरेल. तुम्हाला कोणत्याही कठीण समस्येचा करावा लागत असेल तर ‘श्री शिवतांडव स्तोत्र’ चे पठण केल्यास फायदेशीर राहील.

Aries – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मेष : करिअर व आर्थिक स्थिती सुधारणा

Taurus: Annual Horoscope 2022-23- वार्षिक राशी भविष्य – वृषभ : परदेशगमन व प्रवासाचा योग

Gemini – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मिथुन : अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल

Leo- Annual Horoscope 2022-2023 : सिंह राशीच्या व्यक्तींना हळूहळू पण यश नक्कीच मिळेल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.