Libra – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य : तूळ – इच्छापूर्तीचा कालखंड

एमपीसी न्यूज : जाणून घेऊयात तूळ राशीचे वार्षिक राशिभविष्य (Libra – Annual Horoscope 2023-2024) . तूळ राशीसाठी हे 2023-2024 वर्ष कसे जाईल, याचे भाकीत केले आहे ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश यांनी!

सर्वांना दीपावली व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नमस्कार अनेक शतकाच्या इतिहासात ज्योतिष विदयेचा वापर केलेला दिसत आहे. आज एकविसाव्या शतकात ते दिवसें दिवस लोकप्रिय होत आहे. असे दिसते. दैनिक वर्तमान पत्रातील भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता अनेक वर्षापासून राहीलेली आहेच.

आजच्या युगात यू ट्यूब,, फेसबुक तसेच इतर सोशल मिडीया मध्ये सुद्धा भविष्य हा टॉपिक अगदी काळजीपूर्वक पाहताना व फाॅलो करताना आम्ही पाहिले आहे. जस जसे युग बदलेल तरीसुद्धा भविष्य पाहण्याची संख्या कमी होत नाही तर ती दिवसेंदिवस वाढतच आहे.

मुळात ज्योतिष विद्या ही क्रियाशील आध्यात्मिक विद्याशी जोडली आहे. त्यामुळे ज्योतिष विद्या व आध्यात्मिक विद्या यांचा प्रसार व प्रचार समाजाला दिल्यास आधुनिक तणाव ग्रस्त जीवनात एक प्रकारचे मानसिक बळ त्या व्यक्तीला व समाजाला प्राप्त होईल. यात शंका नाही.

मला इतर स्वतंत्र गुरू करण्याची गरज भासली नाही.कारण चांगले संस्कार व ज्योतिषाचे बाळकडू लहानपणापासूनच घरातच माझे आजोबा ज्योतिष मार्तंड पंडीत स्वामी यांच्याकडून मिळाले. मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. त्यांना शतशः प्रणाम! जीवनाचे मर्म समजविण्याचे पवित्र कार्य आपोआपच हातुन घडण्याचे भाग्य मला मिळाले.

राशीतील ग्रहाचे होणारे ग्रहयोग व त्यापासून होणारे फलित यावर स्वविचार मांडण्याचे बळ मिळाले. असो, दर वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा बारा राशींचे भविष्याचे लिखाण केले असून, प्रमुख गृहांचा गोचर परिणाम प्रत्येक राशीस कसा राहील ते मांडण्यात आले असून त्याच बरोबर शुभ रंग, दिनांक व या वर्षी येणार्‍या अडचणी व मानसिक बल प्राप्त होण्यासाठी उपासना-उपाय दिलेले आहेत त्याचा उपयोग आपणास नक्कीच होईल असे ग्रहीत धरतो.

 

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
कासारवाडी, पिंपरी-चिंचवड

मो. 9922311104

तूळ रास : इच्छापूर्तीचा कालखंड

राशीचक्रातील तूळ रास सातवी रास असून राशीचा स्वामी शुक्र आहे. पुरुष स्वभावी, चरवृत्ती व वायुतत्त्वाची रास असून या राशीचे चिन्ह दोन समान तराजू आहे, त्यामुळे मनावर परिणाम करणार्‍या इंद्रिय, मन व शरीर यांचा समतोल या राशीतील व्यक्ती उत्तम साधतात. न्यायप्रिय, वेळ पडल्यास राजालाही फाशी देण्यास मागे पुढे न पाहणारी अशी ही रास आहे.

आपल्याकडे लोकांना आकर्षित करुन घेणे, बोलण्यातून दुसर्‍यांवर छाप पाडणे हे या राशीतील व्यक्तींना चांगले जमते. थट्टा मस्करी, मौजमजा, वेळी गंभीर, बुद्धिमान, काटकसरी, हिशेबी वृत्ती असते. एक नाही तर अनेक क्षेत्रातील ज्ञान यांना अवगत करणे आवडते. काहीशा संवेदनशील, रसिक, सौंदर्यांची अत्यंत आवड असते. आपली मर्यादा न सोडता, तडका-फडकी कोणतेच निर्णय घेत नाहीत.

या व्यक्ती जीवनामध्ये कला, काव्य, नाटक, अध्यात्मिकता यांचा सुरेख संगम साधत असतात. समोरच्या व्यक्तीला अगदी उत्तम पद्धतीने समजून घेण्याची कला या राशीच्या लोकांना अवगत असते. शास्त्रीय ज्ञान व धार्मिकता यामुळे देवमाणसाची रास अशी ओळख आहे. प्रत्येक गोष्ट तोलून-मापून बोलणे, करणे हा या राशीचा स्वाभाविक गुण आहे.
चित्रा, स्वाती, विशाखा ही नक्षत्रे येतात. चित्र नक्षत्र साहसी, बलवान, पराक्रमी असते. स्वाती हे नक्षत्र बुद्धीमान, चाणाक्ष, डावपेच ओळखणारे, वात्सल्यप्रेमी सहज वश न होणारे असे असते. चालू वर्ष कसे राहील ते पाहु.

तुळ रास – राशीच्या सप्तम स्थानी गुरु व मे 2024 नंतर अष्टम स्थानातून गोचर करणार आहे. पंचम स्थानी शनि वर्षभर राहणार असून नुकतेच राशीबदल करुन आलेले राहू षष्ठ स्थानी व केतू व्ययस्थानी होत असून, सप्तमस्थानी हर्षल, षष्ठस्थानी नेपच्यून व चतुर्थात प्लुटोचे भ्रमण चालू आहे. तर ह्या वर्षी प्रमुख ग्रहाची स्थिती अशी असून सप्तमातला गुरु आपला आत्मविश्‍वास वाढविणारा आहे.

आर्थिक स्थिती अपेक्षेपेक्षा चांगली सुधारेल. प्रवासाचे योग उत्तम येईल. काहींच्या परदेशगमनाच्या इच्छा पूर्ण होतील. घरातील वातावरण सौख्यकारक राहील. उपासनेमध्ये मन रमेल. चांगल्या गोष्टीतून आपणास वरिष्ठांची मर्जी संपादन होईल. नोकरीमध्ये पूर्वी केलेल्या कामाचे फळव लाभ मिळेल.

वरिष्ठांची मर्जी संपादन होईल. नोकरीमध्ये पूर्वी केलेल्या कामाचे फख व लाभ मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करुन आपल्या कामाबद्दल योग्य बक्षिस मिळवाल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. समाधानकारक घर अथवा शेती, वाहन यांची खरेदीची इच्छा पूर्ण होईल. अभिनय, नाट्य कला क्षेत्रात असणार्‍या व्यक्तींना चांगले यश मिळेल.

बौद्धिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, प्रकाशन-साहित्य क्षेत्रात असणार्‍या व्यक्तींना मानाचे पद-प्रतिष्ठा मिळण्याचे योग दर्शवितात. मात्र सरकारी क्षेत्रात असणार्‍या व्यक्तींना हे वर्ष आपल्या हातून चुका होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल. फाजील आत्मविश्‍वास नको. पंचमातील शनि तुम्हाला कष्ट तर करावयास लावणारच आहे, त्याचबरोबर तो ह्यावर्षी एखादे स्वप्नसुद्धा पुर्ण करुन जाणार आहे.

संततीकडून अपेक्षित यश मिळेल. संशोधनक्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना तुमचे तात्विक व बौद्धिक विचारांची प्रगल्भता मिळेल. तरुण वर्गाला अथवा प्रेमी-प्रेमीकांना प्रेमाचा होकार मिळेल. अध्यात्मिक संस्था किंवा धार्मिक क्षेत्रातील संस्था यामधील ट्रस्टी, विश्‍वस्थ असणार्‍या व्यक्तींना हे वर्ष समाजासाठी केलेल्या कामामुळे आपण

पुजनीय व आदर्श व्यक्तिमत्वामध्ये गणला जाऊ शकता. षष्ठातील राहूमुळे आपल्या हितशत्रूचा बिमोड होईल. नोकरीत येणार्‍या अडचणी दुर होऊन प्रमोशन अथवा आर्थिक स्थैर्य वाढवणारे राहील. व्यवस्थापनातील केतू धार्मिक बनवून तीर्थयात्रा, परदेशगमन यासारख्या घटना घडतील. कौटुंबिक बाबतीत मे 2024 चा कालखंड उत्तम राहील.

महत्त्वाचे कामात यशस्वी व्हाल. व्यापारात कुटुंबाकडून सहयोग उत्तम राहील. भावाबहिणीसाठी आपण प्रेरणादायी बनाल. त्यामुळे तुम्ही आनंदीत रहाल. आरोग्याच्या बाबतीत डोळ्यासंबंधी समस्या, पोटदुखी, पचनतंत्र या गोष्टींचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. प्रेमी-प्रेमीकांचे विवाह संपन्न होतील.

मार्च, एप्रिल, मे हे महिने खुपच रोमँटिक राहतील. विद्यार्थी वर्गाला मनासारखे यश मिळवण्यासाठी कष्टाची पराकाष्टा करावी लागेल फक्त अंदाज बांधून काही उपयोग होणार नाही. कौटुंबिक महिला वर्ग गेले वर्षभरातील पती-पत्नीतील वाद संपुष्टात येतील.

एकमेकांबद्दल आकर्षण प्रेम वाढून हम साथ साथ है याची प्रचिती येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना अचानक यश मिळेल. एकंदरीत हे तुळ राशीला वर्ष ग्रहसौख्य चांगले मिळेल. ज्ञानात आपल्या भर पडेल. हितशत्रुंचा बिमोड होऊन आपली वचक व अंकुश ठेवण्यात यशस्वी व्हाल.

उपासना : आपण कुलदेवी उपासना, दुर्गादेवी उपासना, महालक्ष्मी देवी उपासन केल्यास उत्तम राहिल. त्याचबरोबर दर शनिवारी शनिमहात्म्य किंवा शनिस्तोत्र यांचे वाचन, पठण करावे. गाईला चारा दान करावा.
शुभरंग : जांभळा, पांढरा, नेवी ब्लु.
भाग्यकारक रत्न : ऑनेक्स, डायमंड या वर्षी टायगर आय चे ब्रेसलेट किंवा पँडेल केल्यास ठिक राहील.
शुभ दिनांक : कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24.
भाग्यकारक वयोवर्षे : 16, 25, 28, 32, 40, 47, 62.

Aries – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – मेष : प्रबल निर्णयक्षमतेतून यशप्राप्ती

Taurus – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – वृषभ : व्यवसायामध्ये स्थैर्य व उन्नती

Gemini – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – मिथुन : कार्यक्षेत्रात प्रगती होईल

Leo- Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य : सिंह –कर्माला भाग्याची साथ मिळेल

Virgo – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – कन्या : संघर्षातून यश प्राप्ती

Capricon- Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -मकर : यश व प्रगतीचा मार्ग सुकर होईल

Cancer – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – कर्क : आर्थिक स्थिती सुधारुन किर्ती प्रसिद्धीचे योग

 Scorpio – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – वृश्चिक: खडतर वाटचालीतून प्रगतीकडे नेणारे वर्ष

Sagittarius -Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -धनू रास : अनेक क्षेत्रात संधी मिळेल

Aquarius-Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -कुंभ : बुद्धीच्या जोरावर संकटांवर मात कराल

Libra – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य : तूळ – इच्छापूर्तीचा कालखंड

Pisces-Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -मीन : यश मिळवताना अधिक कष्ट घ्यावे लागतील

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.