Scorpio – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – वृश्चिक: खडतर वाटचालीतून प्रगतीकडे नेणारे वर्ष

एमपीसी न्यूज : जाणून घेऊयात वृश्चिक राशीचे वार्षिक (Scorpio : Annual Horoscope 2023-2024) राशिभविष्य 2023-2024 वृश्चिक राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकीत केले आहे ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश यांनी!

सर्वांना दीपावली व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नमस्कार अनेक शतकाच्या इतिहासात ज्योतिष विदयेचा वापर केलेला दिसत आहे. आज एकविसाव्या शतकात ते दिवसें दिवस लोकप्रिय होत आहे. असे दिसते. दैनिक वर्तमान पत्रातील भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता अनेक वर्षापासून राहीलेली आहेच.

आजच्या युगात यू ट्यूब, फेसबुक तसेच इतर सोशल मिडीया मध्ये सुद्धा भविष्य हा टॉपिक अगदी काळजीपूर्वक पाहताना व फाॅलो करताना आम्ही पाहिले आहे. जस जसे युग बदलेल तरीसुद्धा भविष्य पाहण्याची संख्या कमी होत नाही तर ती दिवसेंदिवस वाढतच आहे.

मुळात ज्योतिष विद्या ही क्रियाशील आध्यात्मिक विद्याशी जोडली आहे. त्यामुळे ज्योतिष विद्या व आध्यात्मिक विद्या यांचा प्रसार व प्रचार समाजाला दिल्यास आधुनिक तणाव ग्रस्त जीवनात एक प्रकारचे मानसिक बळ त्या व्यक्तीला व समाजाला प्राप्त होईल. यात शंका नाही.

मला इतर स्वतंत्र गुरू करण्याची गरज भासली नाही.कारण चांगले संस्कार व ज्योतिषाचे बाळकडू लहानपणापासूनच घरातच माझे आजोबा ज्योतिष मार्तंड पंडीत स्वामी यांच्याकडून मिळाले. मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. त्यांना शतशः प्रणाम! जीवनाचे मर्म समजविण्याचे पवित्र कार्य आपोआपच हातुन घडण्याचे भाग्य मला मिळाले.

राशीतील ग्रहाचे होणारे ग्रहयोग व त्यापासून होणारे फलित यावर स्वविचार मांडण्याचे बळ मिळाले. असो, दर वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा बारा राशींचे भविष्याचे लिखाण केले असून, प्रमुख गृहांचा गोचर परिणाम प्रत्येक राशीस कसा राहील ते मांडण्यात आले असून त्याच बरोबर शुभ रंग, दिनांक व या वर्षी येणार्‍या अडचणी व मानसिक बल प्राप्त होण्यासाठी उपासना-उपाय दिलेले आहेत त्याचा उपयोग आपणास नक्कीच होईल असे ग्रहीत धरतो.

ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
(ज्योतिष व वास्तू सल्लागार)
मो. 9922311104

वृश्चिक रास : खडतर वाटचालीतून प्रगतीकडे नेणारे वर्ष

राशीचक्रातील आठवी रास म्हणजे वृश्‍चिक रास आहे. या राशीचा स्वामी मंगळ आहे. जलतत्त्वाची, स्थिरवृत्तीची, स्त्रीस्वभावी अशी रास आहे. या राशीचे चिन्ह विंचू असल्यामुळे या व्यक्तींच्या बोलण्यात, वागण्यात दाहकता नैसर्गिकच असते. उत्तम ग्रहणशक्ती, मुद्देसुद बोलणे, स्वभावात कठोर तर कधी प्रेम, वेगळेपण असते. ताकद, धडाडी व इच्छाशक्ती या व्यक्तीमध्ये चांगली असते. मंगळाप्रमाणे जिद्द व शिस्त हे गुण या व्यक्तींमध्ये ठासून भरलेले असतात.

वृश्‍चिक राशीच्या व्यक्तींना आपल्या खाण्यावर अजिबात नियंत्रण नसते. या व्यक्तींना तळलेले, तिखट पदार्थ आवडतात, स्वभावात तापट, तिखटपणा असतो. कारस्थाने, गुप्त प्रकरणे, दुर्बलावर हुकुमशाही ही स्वभाव वैशिष्टये या राशीच्या लोकांमध्ये प्रकर्षाने बघण्यास मिळतात. मात्र नवचैतन्य व प्रसन्नता हे गुणही राशीमध्ये दिसून येतात.

कामामध्ये गुंतवून स्वत:ला ठेवणे या व्यक्तींना फार आवडते. झालेला अपमान ही माणसे कधीच विसरत नाहीत. सूड घेणे, विषारी, मत्सरी, संतापी, अतिरेक, अविचारी, ऐहिक असे काही दुर्गुण या व्यक्तींमध्ये असतात. प्रेम व राग दोन्ही टोकाचे असल्यामुळे वागण्यात चढ-उतार असतात. भावनांवर मात्र या व्यक्ती कमालीचे नियंत्रण ठेवतात.

अत्यंत महत्त्वाकांक्षी, स्वतंत्र विचारसरणी या सगुणांचा जर या व्यक्तींनी उपयोग केला तर ते दुर्गुंणावर विजय मिळवतील. डिटेक्टिव्ह, गुप्तहेर खाते, स्मगलिंग, संरक्षण दल, शास्त्रज्ञ, गूढ विद्या, शल्य चिकित्सक, सफाई खाते या क्षेत्रामध्ये या व्यक्ती दिसून येतात. विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा ही नक्षत्रे या राशीत येतात.

विशाखा नक्षत्रातील व्यक्ती गुप्त काम करणारी हट्टी वादविवाद प्रिय असते. अनुराधा नक्षत्रातील व्यक्ती विचारांवर ठाम असणारी, लोकसंग्रह करणारी, कलाकौशल्य यांची आवड असणारी, तर ज्येष्ठा नक्षत्राची व्यक्ती शत्रूवर मागून वार करणारी खुणशी धुर्त आपला स्वार्थ साधणारी असते तर चालु वर्षे कसे राहील ते पाहू.

वृश्चिक रास : राशीच्या षष्ठस्थानी गुरुचे भ्रमण व मे 2024 नंतर सप्तम स्थानी होणार आहे. गुप्तशत्रूंच्या कारवाया वाढतील. नोकरीमध्ये आळशीपणा वाढेल. मित्रपरिवार मदतीला धावून येतील. ज्या व्यक्तींचा आपल्याबद्दल गैरसमज झाला असेल, तर त्या व्यक्ती दिलगिरी व्यक्त करुन मदतीचा हात देतील. आरोग्याची काळजी घ्यावी.

औषधाचा वापर करताना डॉक्टरी सल्ला घेऊन घेतल्यास उत्तम. कर्ज काढून नको तिथे गुंतवणूक करु नका. फाजील आत्मविश्‍वास महागात पडेल. कौटुंबिक समाधान मे 2024 नंतर उत्तम राहील. नोकरीमध्ये अचानक बदल-बदली घडतील. वाहन सौख्याची इच्छा पुर्ण होईल. नेतृत्व गुण उत्तमरीत्या सांभाळाल.

कलाक्षेत्रात असणार्‍यांना कलेतून उत्तम पैसा मिळेल. आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार वाढेल. एखादी अडकलेली ऑर्डर हातामध्ये परत येईल. उष्णतेचे विकार बळावतील. शनिचे भ्रमण आपल्या चतुर्थ स्थानातून होत असून शेती विषयक कामे पूर्ण होतील. वरिष्ठ अधिकारी व्यक्तींशी वादविवाद टाळावा.

जुने वादविवाद, कोर्टकचेरीची कामे मे 2024 पर्यंत पुढे ढकलता येतील असे पहावे. सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपली मते मांडताना बोलण्यातून गैरसमज होणार नाही याची दक्षता घ्यावी. परदेशी संबंधीत व्यवहार करताना योग्य त्या कागदपत्राची तपासणी करुन सत्यता पडताळून आर्थिक व्यवहार करावे. यशाचा मार्ग अवलंब करताना शॉर्टकट टाळावा. विवाह इच्छुकांचे विवाह वर्षाच्या उत्तरार्धात उत्तमरीत्या पार पडतील.

राहू-केतूचे भ्रमण आपल्या पंचम व लाभस्थानातून होत असून, हर्षल, नेपच्युन, प्लुटोचे भ्रमण अनुक्रमे षष्ठ, पंचम व तृतीय स्थानातून होत असून, मनाचा भ्रम वाढेल. संततीबद्दल व आपल्या आरोग्याबद्दल काही समस्या उद्भवतील. महिलावर्गांना आपल्या मित्र व ऑफीसमधील सहकारी यांच्या बोलण्यातून गैरसमज वाढण्याची शक्यता राहील.

नोकरी-व्यवसाय करणार्‍या व्यक्तींना मार्च, एप्रिल, मे या महिन्यामध्ये आनंदी, उत्साही वातावरणामुळे कामाच्या ठिकाणी उत्साह वाढेल व यशस्वी व्हाल. अनेक प्रकारच्या लाभाच्या संधी प्राप्त होतील. महिलावर्गांना (ज्या महिला गर्भवती आहेत) व्यक्तींना विशेष काळजी घ्यावी लागेल.

राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना विरोधकावर मात करुन यशस्वी व्हाल.विद्यार्थी वर्गाला हे वर्ष जेमतेम राहील. प्रवासाच्या दृष्टीने हे वर्ष ऑगस्ट ते ऑक्टोबर हे महिने उत्तम राहतील. शेअर्स व्यवसाय करणार्‍या मोठा लाभ व उतार असे परिणाम दर्शवितात. एकंदरीत हे वर्ष आत्मविश्‍वास व उत्साही राहून कामाची गती वाढवावी लागेल.

उपासना : आपण शिवशंकर उपासना केल्यास उत्तम राहील. दर गुरुवारी विद्यार्थीवर्गाला किंवा ब्राह्मणांना गरजू वस्तुंचे वाटप करावे. मंदिरामध्ये दुध, खीर अर्पण करावे. हे आपणास फायदेशीर राहील.
शुभरंग : गुलाबी, लालसर, मरुन, फिकट पिवळा हे रंग उत्तम राहतील.
भाग्यकारक रत्न : पुष्कराज व माणिक हे रत्न वापरल्यास यशदायक राहील. अ‍ॅमेथिक्स रत्नाचे पँडेल व ब्रेसलेटचा या वर्षी वापर केल्यास उत्तम राहील.
शुभदिनांक : कोणत्याही महिन्याच्या 18, 21, 27.
भाग्यकारक वयोवर्षे : 20, 24, 34, 42, 47, 56.

Aries – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – मेष : प्रबल निर्णयक्षमतेतून यशप्राप्ती

Taurus – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – वृषभ : व्यवसायामध्ये स्थैर्य व उन्नती

Gemini – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – मिथुन : कार्यक्षेत्रात प्रगती होईल

Leo- Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य : सिंह –कर्माला भाग्याची साथ मिळेल

Virgo – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – कन्या : संघर्षातून यश प्राप्ती

Capricon- Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -मकर : यश व प्रगतीचा मार्ग सुकर होईल

Cancer – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य – कर्क : आर्थिक स्थिती सुधारुन किर्ती प्रसिद्धीचे योग

 Scorpio – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – वृश्चिक: खडतर वाटचालीतून प्रगतीकडे नेणारे वर्ष

Sagittarius -Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -धनू रास : अनेक क्षेत्रात संधी मिळेल

Aquarius-Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -कुंभ : बुद्धीच्या जोरावर संकटांवर मात कराल

Libra – Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य : तूळ – इच्छापूर्तीचा कालखंड

Pisces-Annual Horoscope 2023-2024 : वार्षिक राशी भविष्य -मीन : यश मिळवताना अधिक कष्ट घ्यावे लागतील

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.