Gemini – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मिथुन : अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल

एमपीसी न्यूज – जाणून घेऊयात मिथुन राशीचे वार्षिक राशी भविष्य (Gemini – Annual Horoscope 2022-2023) मिथुन राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकित केले आहे नामवंत ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांनी.

ज्योतिष शास्त्राचे सूक्ष्म निरीक्षण केले असता प्रामुख्याने दोन विभागात याचा विचार होऊ शकतो. पहिला म्हणजे आपल्या ऋृषिमुनींनी ग्रह, नक्षत्रे यांची गती व दुसर्‍या विभागात त्याची फलीते राशीवर होणारा विचार फलीत विभागात तर्क अनुमान, निष्कर्ष, अंदाज अशा माध्यमातून वर्तविले जाते.

तसेच फलित हे ठराविक कालावधीनंतर बदल व सुधारणा होत गेली. कोणत्याही शास्त्राची निर्मिती ही मानव कल्याणाकरीता केली आहे, असे मला वाटते. त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्राचा सुद्धा मानवाला येणार्‍या सुख-दु:खाचा मागोवा घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

हे शास्त्र मानवाला देववादी किंवा कर्तव्यशून्य न बनवता प्रयत्नवादी. बनवेल असो! प्रस्तुत राशी भविष्यामध्ये आम्ही ह्या वर्षी आगामी म्हणजे या वर्षी प्रमुख ग्रहस्थितीचा अभ्यास करून फलीत दिली आहेत. त्यांचा उपयोग आपणास होईल व येणार्‍या वर्षाचा अंदाज येऊ शकेल. तसेच शुभ रंग, शुभ काळ, उपासना सुद्धा दिली आहे. त्याचा उपयोग आपणास येणार्‍या अडचणीच्या काळात आपली मानसिकता सक्षम होण्यास मदत होईल.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
कासारवाडी, पिंपरी-चिंचवड

संपर्क – 9922311104

मिथुन रास : अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल

मिथुन ही राशीचक्रातील तिसर्‍या क्रमांकाची ही रास आहे. पुरुष स्वभावी अशी रास आहे काम त्रिकोणामधील ही प्रथम क्रमांकाची रास असून या राशीचा स्वामी बुध आहे. मिथुन रास बुद्धीजीवी ती स्मरणशक्ती, सम बैठका यामध्ये चातुर्य, थोडीसी चंचलता, जनसंपर्काचे व्यवसाय, बौद्धिक कौशल्य या क्षेत्रातील व्यक्ती या राशीत जास्त आढळतात. अभ्यासू वृत्ती, बोलण्यावर वर्चस्व साहित्य, काव्य या क्षेत्रात यांचा हातखंडा असतो. कार्यक्षमता उत्तम असून नवनवीन विचारांची बैठक, आयोजन यांच्यात उत्तम असतो.

मिथुन राशीमध्ये मृग, आर्दा, व पुनर्वसू ही नक्षत्रे येतात. मिथुन रास मृग नक्षत्र यामध्ये व्यक्तीचा स्वभाव धार्मिक यात्रा, धनयुक्त, साहसी, विवेकी, वाहन व भूमी यांचा उपभोग प्राप्त करणारी असते. तसेच, हुशार, विद्वान, गतिशील, उत्साही व पराक्रमी असते. (Gemini – Annual Horoscope 2022-2023) तर मिथुन रास आदी नक्षत्रामधील व्यक्ती उग्र स्वभावाची, चंचल मनाची क्रोधी, संशयी असतात. हे लोक हिंसक, स्वभावात कठोरपणा व गूढ विद्येची आवड व बुद्धी तीक्ष्ण, कुशाग्र असते तर मिथुन रास पुनर्वसू नक्षत्रामधील व्यक्ती व्यवहार कुशलता, विज्ञान व कोमल, माणुसकी जाणणारा, साहित्यप्रेमी, सौम्य व संतोषयुक्त मनाचा, कला-कौशल्य संपन्न, लोकसेवा करणारी, ईश्वरभक्त, गायन कलेत पारंगत अशा गुणांनी युक्त असतात. तर अशा मिथुन राशीच्या व्यक्तींचे चालू वर्ष कसे राहील ते पाहू.

राशीच्या दशम व लाभातून गुरुचे प्रभ्रमण, जानेवारी 2023 पर्यंत राशीच्या अष्टम स्थानातून शनिचे भ्रमण राहणार असून त्यानंतर भाग्यस्थानात शनिचे भ्रमण होणार आहे. तसेच, राहू-केतूचे भ्रमण पंचम व लाभ स्थानातून होत असून हर्षलचे भ्रमणसुद्धा लाभातून, नेपच्यूनचे भ्रमण आपल्या दशम स्थानातून व प्लुटोचे भ्रमण आपल्या अष्टम स्थानातून होत आहे, अशी एकंदरीत प्रमुख ग्रहांची सद्यस्थिती राहील. पूर्ण वर्षभर गुरुबल असल्यामुळे तुमचा आत्मविश्वास चांगला राहील. मानसिकता उत्तम राहून उत्साहात भर पडेल.

तुम्ही जी कामे करत होता ती विस्कळीत होत होती किंवा अपूर्ण राहत होती, ती पूर्ण होऊ लागतील. तुमचा मानसिक ताणही बर्‍याच अंशी कमी होईल. निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. तुमचे नशीब तुमच्या पाठीशी उभे राहील. नशिबाची शक्ती अनेक अडचणी सुलभ करेल तुमच्यासाठी अनेक बाबतीत चांगल्या नव्या सक्षम विचारांची देवाण-घेवाण होईल.
वर्षाच्या सुरुवातीला राशीच्या अष्टम स्थानातून शनिचे भ्रमण असल्यामुळे सभोवतालची परिस्थिती विस्कळीत झाली होती ती जानेवारीनंतर हळू हळू बदलत जाईल.

लांबच्या प्रवासाची शक्यता राहील. काही व्ङ्मक्तींना परदेशगमनाची इच्छा असल्यास पूर्ण होईल. तुमचे मन धार्मिक कार्यात रुची वाढवेल. सभोवतालची परिस्थिती हळू हळू बदलत राहिल्यामुळे तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल काहींना परदेशगमनांची, स्थलांतरांची, कंपनीच्या कामानिमित्त संधी प्राप्त होईल. तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये बदल-बदली मिळू शकते. हे फायदेशीर राहील. वर्षाच्या सुरुवातीला आरोग्याच्या तक्रारी उद्भवल्या तरी त्यातून सौम्य औषधोपचार मिळाल्यामुळे अडचण राहणार नाही.

नोकरीमध्ये समाधान मिळेल तसेच नवीन नोकरी असेल तर ती दीर्घकाळ टिकेल. वर्षाच्या सुरुवातीला मुलांबद्दल चिंता व प्रेम या संबंधामध्ये समस्या येत राहतील, (Gemini – Annual Horoscope 2022-2023) परंतु अर्थिकदृष्टीने हा पूर्वार्ध चांगला राहील. तुम्हाला तुमच्या महत्वांकाक्षांना पंख फुटतील तुमच्या आजुबाजूचे वातावरण धार्मिक व आनंदी राहील. उत्तरार्धात तुमच्या उत्पादनात वाढ होईल. नोकरीसाठी अर्ज करत असणार्‍या व्यक्तींना त्यात यश मिळेल. वरिष्ठांचा तुमच्यावर विश्वास वाढल्यामुळे तुम्ही कंपनीत मजबूत स्थितीत याल. तुमचे बोलणे अत्यंत लाघवी स्वरुपाचे राहील.

स्थावर मालमत्तेविषयी तुम्हाला थोडासा त्रास जाणवेल, परंतु आत्मविश्वासाच्या जोरावर ती कामे तडीस न्याल. महिलावर्गाला वर्षाचा पूर्वार्ध अडचणीने भरलेला असला तरी सुद्धा तुम्ही त्यावर पर्यायी मार्ग काढण्यास सफल व्हाल. एप्रिल 2023 ङ्मा महिन्यानंतर तुमच्या प्रेमसंबंधात अधिक रसिकता वाढवेल. तुम्ही तुमच्या प्रियकराला तुमच्या लग्नाचा प्रस्ताव देऊ शकता.
तुम्हाला त्यात यश मिळण्याची शक्यता राहून तुमचा विवाह निश्चित होईल. विद्यार्थीवर्गाला काही शिक्षणासाठी तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागेल. ही परिस्थिती वर्षाच्या पूर्वार्धात राहील. मात्र एप्रिल 2023 नंतर गुरुबदलामुळे तुम्हाला तुमच्या शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती राहील.

स्पर्धा परीक्षाकरीता मे, जून, जुलै, ऑगस्ट हे चार महिने उत्तम राहतील. मे दरम्यानच्या मदतीने तुमची कामे पूर्ण होतील.
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी पहिल्या तिमाहीनंतर चांगले दिवस येतील. 2023 हे वर्ष मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी अंधारातून प्रकाशाकडे नेणारे राहील.(Gemini – Annual Horoscope 2022-2023)मिथुन राशीच्या लोकांमध्ये दृढनिश्चितता कमी असते त्यामुळे कामे अर्धवट सोडतात. यात निश्चितता आणल्यास फायदेशीर राहील.या वर्षी तुम्हाला प्रेमात यश मिळेल.

शुभरंग : चमकदार पोपटी, फिकट गुलाबी व पांढरा.
शुभदिनांक : कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23.
शुभकारक वर्ष : 17, 26, 35, 44, 53, 62
शुभकारक रत्न : पाचू 1 पांढरा पुष्कराज व ग्रीनझेड.

उपासना : ‘विष्णु सहस्त्रनाम स्तोत्र पठण केल्यास फायदेशीर आहे. गोशाळेत गाईला अन्नदान केल्यास उत्तम राहील. दर बुधवारी लिखा पालक किंवा हिरवी भाजी, हिखा चारा, आष्ये मुग भाईला ’आपला प्यावे. कोणतीही कठीण समस्या येत असल्यास पक्षांना ’जवस’ हे धान्य द्यावे. त्याचबरोबर ‘गजेंद्र मोक्ष’ स्तोत्राचे वो रामरक्षा स्तोत्राचे पठण तुम्हाला फायदेशीर राहील.

Aries – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मेष : करिअर व आर्थिक स्थिती सुधारणा

Taurus: Annual Horoscope 2022-23- वार्षिक राशी भविष्य – वृषभ : परदेशगमन व प्रवासाचा योग

Cancer- Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – कर्क – संघर्षातून यशप्राप्ती

Leo- Annual Horoscope 2022-2023 : सिंह राशीच्या व्यक्तींना हळूहळू पण यश नक्कीच मिळेल

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.