Leo- Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य : सिंह – हळूहळू पण नक्कीच यशप्राप्ती

एमपीसी न्यूज : जाणून घेऊयात सिंह राशीचे वार्षिक (Leo- Annual Horoscope 2022-2023) राशिभविष्य 2022-2023 सिंह राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकीत केले आहे ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश यांनी!

सर्वांना दीपावली व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्योतिष शास्त्राचे सूक्ष्म निरीक्षण केले असता प्रामुख्याने दोन विभागात याचा विचार होऊ शकतो. पहिला म्हणजे आपल्या ऋृषिमुनींनी ग्रह, नक्षत्रे यांची गती व दुसर्‍या विभागात त्याची फलीते राशीवर होणारा विचार फलीत विभागात तर्क अनुमान, निष्कर्ष, अंदाज अशा माध्यमातून वर्तविले जाते.

तसेच फलित हे ठराविक कालावधीनंतर बदल व सुधारणा होत गेली. कोणत्याही शास्त्राची निर्मिती ही मानव कल्याणाकरीता केली आहे, असे मला वाटते. त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्राचा सुद्धा मानवाला येणार्‍या सुख-दु:खाचा मागोवा घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो. हे शास्त्र मानवाला देववादी किंवा कर्तव्यशून्य न बनवता प्रयत्नवादी. बनवेल असो!

प्रस्तुत राशी भविष्यामध्ये आम्ही ह्या वर्षी आगामी म्हणजे या वर्षी प्रमुख ग्रहस्थितीचा अभ्यास करून फलीत दिली आहेत. त्यांचा उपयोग आपणास होईल व येणार्‍या वर्षाचा अंदाज येऊ शकेल. तसेच शुभ रंग, शुभ काळ, उपासना सुद्धा दिली आहे. त्याचा उपयोग आपणास येणार्‍या अडचणीच्या काळात आपली मानसिकता सक्षम होण्यास मदत होईल.

 

 

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
कासारवाडी, पिंपरी-चिंचवड

संपर्क – 9922311104

सिंह रास : हळूहळू पण यश नक्कीच

सिंह रास राशी चक्रातील पाचव्या क्रमांकाची असलेली अग्नितत्वाशी निगडीत असून स्थिर वृत्तीची रास आहे. पुरुष स्वभावाची रास, या राशीचे चिन्ह सिंह हे आहे. ही रास कालपुरुषांच्या कुंडलीमध्ये पंचमस्थानाचे प्रतिनिधित्व करणारी आहे. भव्यता, अधिकार गाजवण्याची लालसा, अतिशय आत्मविश्वास, वेळप्रसंगी साम-दंड-भेद वापरून यश गाठण्याची कला अवगत असते. खिलाडू वृत्तीने संघर्षपूर्ण विजय मिळवतात. नेतृत्व करण्याची आवड. चालण्या-बोलण्यात एक प्रकाराची झाक असते.

सतत आशावादी, आनंदी, गौरव कीर्ती, मान-सन्मान, अधिकाराची आवड असणार्‍या व्यक्ती या राशीत असतात. सिंह राशीमध्ये मघा, पूर्वा व उत्तरा ही तीन नक्षत्रे येतात. सिंह रास मघा नक्षत्र असणार्‍या व्ङ्मक्ती मानी, उद्योगी, सेवासंपन्न, अत्याधुनिक, उतावळे, कोणत्याही गाष्टीची पटकन उकल कर्तृत्ववान, नोकर-चाकर खूप ठेवणार्‍या, धनवान, उद्योगशील, बलवान, गर्विष्ठ, विलक्षण साहसी, जगप्रसिद्ध असतात. यांचे शरीर मजबूत व हे लोक देशभक्त व पितृभक्त असतात. सिंह रास पूर्वा नक्षत्र असणारा मनुष्य दानशूर, प्रिय भाषी, चपळ, कीर्तीवान, श्रद्धावान, राजसेवक, तालीमबाज व सत्वगुणी असती. प्रवासाची आवड, नाट्यकलांची व ऐश्वर्याची आवड असते. या नक्षत्रातील व्यक्ती धनाढ्य व्यापारी आढळतात तर सिंह रास उत्तरा नक्षत्र हे मानी व मेहनती आहे.

परिवार व वाहन सौख्य मिळवणार्‍या, कला-कौशल्य यांमध्ये आवड असणार्‍या व्यक्ती या नक्षत्रातील असतात. तर अशा सिंह राशीचे चालू वर्ष कसे राहील ते पाहू.(Leo- Annual Horoscope 2022-2023)राशीच्या अष्टमातून सध्या गुरुचे भ्रमण व षष्ठातून शनिचे भ्रमण होत आहे. त्याचबरोबर अनुकमे भाग्यातून राहूचे व तृतीय स्थानातून केतूचे भ्रमण होत आहे. तसेच, नवम स्थानातून हर्षल, षष्ठ स्थानातून प्लुटो व अष्टम स्थानी नेपच्युन गोचर आरतींना अधिक सतर्क राह आहेत. सध्या सिंह राशीच्या लागणार आहे. याचबरोबर आरोग्याच्या प्रति कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा न करण्याचा सल्ला. आपल्या कामाबरोबर नियमित रूपात आराम केल्यास वर्षाच्या पूर्वार्ध आरोग्याच्या दृष्टीने ठीक राहील. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीच्या आरोग्याच्या बाबतीत सुद्धा दक्ष रहावे लागेल.

सिंह राशीतील जातकांना रचनात्मक रूपात व भावनात्मक प्रबंधित करण्यात काही वास्तविक समस्यांचा सामना कार्यस्थळी करावा लागेल. आर्थिक बाबतीत ठीक. स्थावर प्रॉपर्टी, विमा, प्रॉव्हिडंड फंडाचे पैसे अशा गोष्टीतून आर्थिक लाभ होऊन
त्यामध्ये वृद्धी होईल. जानेवारीनंतर होणारा शनिबदल व एप्रिलनंतर होणारा गुरू बदल अचानक लाभ देऊन जाईल. धार्मिक कार्यात रस वाढेल तसेच, समाजात मान-सन्मान प्राप्त होईल. जानेवारीनंतर कोर्टकचेरीची कामे असतील तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. त्यामुळे तुम्ही आनंदी व निसंकोच रहाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. तुमच्या पराक्रमात वाढ होईल. व्यवसायात जोखीम घेऊन काम कराल. छोटा-मोठा प्रवास होण्याची शक्यता आहे. जुलै ते नोव्हेंबर या महिन्यांमध्ये तुम्ही नवीन प्रॉपर्टी, वाहन खरेदी करण्याचा योग दर्शवितो.

सरकारी कामे तसेच, सरकारी कार्यालयात काम करणान्या व्यक्तींना बढ़ती मिळेल. परंतु त्याचे फळ डिसेंबर 2023 नंतरच प्राप्त होईल. विवाहीत लोकांना हे वर्ष थोडेसे ‘कभी खुशी कभी गम’ असे राहू शकते. विद्यार्थी वर्गाला तुम्ही तुमचा अभ्यास व करिअरसाठी लागणार्‍या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. जास्त एकाग्रता होऊन काम पूर्ण करावे लागेल. नवीन विवाहेइच्छुकांना एप्रिल 2023 नंतर जास्त शुभकारक राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करू शकाल करिअरच्या दृष्टीने वर्षाचा उत्तरार्ध मजबूत व उत्तम दर्शवितो वर्षाच्या सुरुवातीला आरोग्याच्या समस्या सतावतील, त्यामुळे तुमच्या करिअरवर परिणाम होण्याची शक्यता राहील. व्ङ्मसायिकांना वर्षांच्या शेवटचे तीन महिने व्यवसाय विस्ताराची फळे मिळतील.

त्या आधी त्या संबंधीत कोणतेही अतिरिक्त कोर्स व व्यवहारी बाबी करताना दक्ष राहून करावे. आरोग्याच्या बाबतीत आपणास हे वर्ष थोडेसे नरम-गरम राहील. हाडाची दुखणी, डोळ्यासंबंधीत समस्या अशा गोष्टींमुळे त्रास जाणवेल. कौटुंबिक सावधगिरी बाळगली पाहिजे. तुमचे वागणे सौम्य ठेवा.(Leo- Annual Horoscope 2022-2023)शब्दांचा वापर शहानपणाने केल्यास उत्तम राहील. महिलावर्गाला हे वर्ष संमिश्र फलदायी राहील. धार्मिक कार्यात या वर्षी अधिक रुची वाढेल. साधुसंतांचा आशीर्वाद प्राप्त होईल. भाग्याच्या दृष्टीने हे वर्ष सामान्य राहील. तुम्ही चांगल्या खाण्यापिण्याच्या सवयी व जीवनशैलीत बदल करून तुम्ही निरोगी व मानसिक स्वास्थ जपण्यास मदत होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबावर, घर, जमीन या साठी अनाठायी खर्च दर्शवितो.

तुम्ही अनेक क्षेत्रात नवनवीन गोष्टी शिकू शकता. तुम्ही तुमची जीवनशैली अपग्रेड ठेवण्यासाठी पैसे खर्च कराल. सिंह राशीच्या लोकांना वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात जीवनसाथीची साथ उत्तम मिळेल. हे वर्ष संततीच्या दृष्टीने वर्षाच्या उत्तरार्धात चांगले आहे. सिंह राशीच्या व्यक्तींना हे वर्ष सर्वबाजूंनी चढ-उताराचे जाईल.

शुभरंग : नारंगी, गुलाबी, पिवळा, सोनेरी, केशरयुक्त लाल.
शुभदिनांक : 1,10,19, 28 इ.
शुभकारक वयोवर्ष : 25, 31, 35, 39, 45, 54 इ
शुभरत्न : ‘प्रवाळ’- त्रिकोणी वापरावा तसेच डायमंड रेड जाप्सर व माणिक वापरावे.

उपासना : ‘सूर्य’ उपासना कोणत्याही रविवारपासून सुर्याला अध्य देण्यास सुरूवात करावी. दररोज ‘सूर्याष्टक’ चे पाठ तुम्हाला लाभकारक राहतील. कोणत्याही, बुधवारी व शनिवारी मंदिरामध्ये काळे तीळ व केळी यांचे दान दिल्यास बैलाला शुभकारक राहील. तसेच, बेलाला गुळ व डाळ दिल्यास येणार्‍या अडचणींचा परिहार होईल. तुम्ही जर एखादया कठीण समस्येतून जात असाल तर ‘आदित्य स्तोत्राचे’ पाठ करावे, ते फायदेशीर राहतील.

Aries – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मेष : करिअर व आर्थिक स्थिती सुधारणा

Taurus: Annual Horoscope 2022-23- वार्षिक राशी भविष्य – वृषभ : परदेशगमन व प्रवासाचा योग

Gemini – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मिथुन : अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल

Cancer- Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – कर्क – संघर्षातून यशप्राप्ती

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.