Diwali lighting at alandi : आळंदी मधील इंद्रायणी घाट हजारो पणत्यांनी उजाळला

एमपीसी न्युज : कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष शासन नियम अटी निर्बंधा मुळे दिवाळी अतिशय साध्या पद्धतीने साजरी झाली.यंदा मात्र कुठलेही त्याबाबतचे निर्बंध नसल्याने सर्वत्र मोठ्या उत्साहात दिवाळी  साजरी होत आहे.
दिवाळीनिमित्त शनिवारी रात्री, धनत्रयोदशीच्या दिवशी आळंदीतील इंद्रायणी घाटावरती हजारो पणती दीप लावण्याचे कार्य लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत करताना  दिसत होते. या इंद्रायणी घाटावरती  लावण्यात आलेल्या हजारो पणत्यांच्या प्रकाशाने  हा घाट परिसर उजळून निघाला होता. हे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  त्या घाटावरती लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत  तेथे विविध स्वरूपाच्या फटाक्यांची अतिषबाजी करत त्याचा आनंद ते लुटत होते.गावात दारोदारी मोठ्या प्रमाणात पणत्या लावल्याने गाव पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले होते. काहींनी इमारती दुकानांवरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली आहे.तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली आहे.

यंदाच्या पावसाळी वातावरणामुळे गावात मातीचे किल्ले बनवण्याचे प्रमाण काहीश्या प्रमाण कमी असले तरी त्यातल्या त्यात कोरोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षानंतर यंदाची दिवाळी उत्साहात साजरी करण्यास मिळत असल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.