Today’s Horoscope 23 October 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 23 October 2022

वार – रविवार.

तारीख- 23-10-2022

शुभाशुभ विचार- वर्ज्य दिवस

आज विशेष – शिवरात्री

राहू काळ – संध्याकाळी 04.30 ते 06.00

दिशा शूल- पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र- उत्तरा फाल्गुनी 14.34 पर्यंत नंतर हस्त.

आजचे राशिभविष्य

मेष – शुभ रंग- राखाडी

आज तुम्ही काही आरोग्याच्या तक्रारीने त्रस्त असाल डॉक्टरांचा सल्ला वेळीच घ्यायला हवा आज वैवाहिक जीवनात संध्याकाळ नंतर एकमत होईल. आज शब्द मात्र जपून वापरा.

वृषभ- शुभ रंग- पांढरा

आज दुकानदारांची उधारी वसूल होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनात काही जुन्या आठवणी मनाला आनंद देतील.

मिथुन- शुभ रंग- निळा 

हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा व वेळ खर्च करतील. आज रोहिणी घर सजावटीवर भर देतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

 कर्क- शुभ रंग- पिस्ता

वास्तु किंवा वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळले तर चांगले. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल. विद्यार्थी आज अभ्यासाचा कंटाळा करतील. मित्र चुकीचे सल्ले देतील.

 सिंह -शुभ रंग- भगवा.

आज तुम्ही गोड बोलून विरोधकांची ही मने जिंकाल. एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज काही दुरावलेली नाती जवळ येतील.

 कन्या- शुभ रंग- गुलाबी.

आज आपल्याच मनाप्रमाणे वागाल. थोडी अहंकाराची बाधा होऊ शकते. कठोर बोलल्याने तुमचे काही हितचिंतक दुरावण्याची शक्यता आहे. आज कुणाला मागितल्या शिवाय सल्ले देऊ नका.

तूळ- शुभरंग- सोनेरी.

काही जणांना आज तातडीचे प्रवास घडतील. घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल. एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर परत शोधल्यास सापडेल. सरकारी नियमांचे उल्लंघन नको.

वृश्चिक- शुभ रंग- डाळिंबी 

कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदी होईल. लांबच्या प्रवासात बेसावध राहू नका. आपले मौल्यवान सांभाळा.

 धनु- शुभ रंग- स्ट्रॉबेरी

आज तुम्ही आपल्याच मर्जीप्रमाणे वागाल. थोडी अहंकाराची बाधा होईल. कठोर बोलण्याने काही आपलीच माणसे दुखावण्याची शक्यता आहे कुणाला आज मोफत सल्ले वाटप करू नका.

 मकर- शुभरंग- मरुन

तुमच्या कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी राहील. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मात्र मुरड घालावी लागेल. महत्त्वाच्या चर्चेत सुसंवाद साधा.

कुंभ- शुभरंग- आकाशी

कामाच्या ठिकाणी विरोधक चुका काढण्यासाठी टपूनच बसलेले आहेत. वरिष्ठांचे काही केले तरी समाधान होणार नाही. आज संध्याकाळी सत्संगाकडे पावले आपोआपच वळतील.

मीन- शुभरंग- भगवा

केवळ मोठेपणासाठी आज न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला थोडी विश्रांतीचीही गरज आहे.

एमपीसी न्यूज च्या सर्व वाचकांना आमच्याकडून दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा.

 शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी

(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

फोन 9689165424

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.