Taurus: Annual Horoscope 2022-23- वार्षिक राशी भविष्य – वृषभ : परदेशगमन व प्रवासाचा योग

एमपीसी न्यूज : जाणून घेऊयात वृषभ (Taurus: Annual Horoscope 2022-23) राशीचे वार्षिक राशिभविष्य 2022-2023. वृषभ राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकीत केले आहे ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश यांनी!

सर्वांना दीपावली व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्योतिष शास्त्राचे सूक्ष्म निरीक्षण केले असता प्रामुख्याने दोन विभागात याचा विचार होऊ शकतो. पहिला म्हणजे आपल्या ऋृषिमुनींनी ग्रह, नक्षत्रे यांची गती व दुसर्‍या विभागात त्याची फलीते राशीवर होणारा विचार फलीत विभागात तर्क अनुमान, निष्कर्ष, अंदाज अशा माध्यमातून वर्तविले जाते. तसेच फलित हे ठराविक कालावधीनंतर बदल व सुधारणा होत गेली. कोणत्याही शास्त्राची निर्मिती ही मानव कल्याणाकरीता केली आहे, असे मला वाटते. त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्राचा सुद्धा मानवाला येणार्‍या सुख-दु:खाचा मागोवा घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो. हे शास्त्र मानवाला देववादी किंवा कर्तव्यशून्य न बनवता प्रयत्नवादी. बनवेल असो! प्रस्तुत राशी भविष्यामध्ये आम्ही ह्या वर्षी आगामी म्हणजे या वर्षी प्रमुख ग्रहस्थितीचा अभ्यास करून फलीत दिली आहेत. त्यांचा उपयोग आपणास होईल व येणार्‍या वर्षाचा अंदाज येऊ शकेल. तसेच शुभ रंग, शुभ काळ, उपासना सुद्धा दिली आहे. त्याचा उपयोग आपणास येणार्‍या अडचणीच्या काळात आपली मानसिकता सक्षम होण्यास मदत होईल.

ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
कासारवाडी, पिंपरी-चिंचवड

संपर्क – 9922311104

वृषभ रास : परदेशगमन व प्रवास

वृषभ राशी चक्रातील दुसरी रास असून राशीचा स्वामी शुक्र आहे. पृथ्वीतत्वाची व स्थिर प्रवृत्तीची स्त्री स्वभावाची अशी ही रास आहे. साधारणतः प्रसन्न वृत्तीची, मधुर बोलणे शांत, धीम्ङ्मा वृत्तीची, आनंदी स्वभावाची, कामाविषयी आवड असणारी मित्र-मैत्रिणीच्या संगतीमध्ये रमणारी अशी रास आहे. प्रेम व सौंदर्य ह्यांमधून आनंद मिळवणारी, गोड बोलून आपले काम साध्य करून घेणारी, कला, नाट्य यांची आवड असणारी, जुन्या परंपरा, तडजोडीची भूमिका घेणारी प्रवासाची आवड असणारी, खर्चिक, संसार-प्रिय , मित्रमंडळीमध्ये प्रिय असते.

वृषभ राशीमध्ये कृत्तिका, रोहिणी व मृग ही नक्षत्रे येतात. वृषभ रास कृत्तिका नक्षत्रातील जातक अर्थिक सुबकता असणारा, चतुर, विद्यागुणयुक्त, स्वाभिमानी, राजेशाहीची आवड असणारा असतो. तसेच साहसी, दुसर्‍यांचे कौतुक करणारी व गर्विष्ठ व हट्टी अशी व्यक्ती असते तर वृषभ रास रोहिणी नक्षत्रातील व्यक्ती मधुर वचनी, पवित्र आचरण, खरे बोलणारी, शांत, सत्वगुणी, स्थिर बुद्धी, सौंदर्य व आकर्षक व्यक्तिमत्व असलेली असते. ही माणसे विलासी, श्रीमंत, व्यापारी व प्रेमळ असतात. काही व्यक्ती कलावंत असतात. वृषभ रास मृग नक्षत्राच्या व्यक्ती चंचल, उत्साही, भित्र्या, भूमी, वाहन यांचे सुख भोगणार्‍या असतात. या नक्षत्राच्या व्यक्तींना काही वेळा शेती खूप आवडते. तर वृषभ राशीचे चालू वर्ष कसे राहील पाहू. (Taurus: Annual Horoscope 2022-23)

राशीच्या लाभ व व्यय स्थानातून गुरुचे भ्रमण व भाग्य व दशमातून शनिचे भ्रमण व षष्ठ व व्यय स्थानातून राहू-केतूचे भ्रमण होत असून त्याचबरोबर भाग्यस्थानात प्लूटो लाभस्थानात नेपच्यून व षष्ठातून हर्षल अशी एकंदरीत प्रमुख ग्रहांची ग्रहस्थिती या वर्षी राहील. एकंदरीत वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला सर्व गोष्टी अनुकूल घडतील.

त्यामुळे मन प्रसन्न व आनंदी राहील. त्यामुळे प्रवास, छोटे- मोठे पत्रव्यवहार, बंधू व बहीण यांच्याबाबत शुभ घटना घडतील. संततीबद्दलच्या चिंता मिटतील. पदवी, स्पर्धा परीक्षा यामध्ये सुयश लाभेल. लेखन-कला क्षेत्रातील व्यक्तींना यश संपादन होईल.

तुमच्या व्यवसायाची गोळाबेरीज मजबूत होईल. अर्थिक बळ प्राप्त करू शकाल. कौटुंबिक जीवन तणावमुक्त असेल. अविवाहित लोकांसाठी सुंदर विवाह योग दर्शवितो. कुटुंबाचे समर्थन पूर्णपणे तुमच्या बाजूने राहील. त्याचबरोबर तुम्ही सुनियोजन करून व्यवसायवाढीसाठी नवनवीन योजना आखाल.

मार्च-एप्रिल 2023 नंतर परदेशगमनाची शक्यता जास्त राहील. नोकरदारांना घरापासून दूर रहावे लागेल. नोकरीतील समज गैरसमज वाढणार नाही याची दक्षता घ्ङ्मावी. महिला वर्गाला नोकरीच्या ठिकाणी दक्ष रहावे लागेल. महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तींना विभागीय बदल आणि बदल्या यांना सामोरे जावे लागेल. तुम्हाला उत्तरार्धात आरोग्याच्या बाबतीत जागरुक राहण्याचा सल्ला, तुम्ही तुमची प्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी शारीरिक क्रोध टाळा. डिसेंबर महिन्यात नाते-संबंधामध्ये ताण-तणाव वाढू शकतो. ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यात खर्चाचे प्रमाण वाढते राहील. विद्यार्थी वर्गाला शिक्षणासाठी परदेशात जावयाचे असल्यास एप्रिल – मे महिन्याच्या आत व्हिसा व शिक्षण, संदर्भात लागणारी कागदपत्रे पूर्ण केल्यास उत्तम राहील. तसेच, तुमच्या वर्षभराचे नियोजन केल्यास येणार्‍या अडचणी कमी होतील. महिला वर्गाला नोव्हेंबर ते ङ्खेब्रुवारी या काळात नाते संबंधात काही तरी कमतरता निर्माण होईल.
एकमेकांना समजून घेण्यास अडचणी येतील.

काहीसा तणाव निर्माण झाल्यास वाद निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. वर्षाच्या उत्तरार्धात जोडीदाराचे आरोग्य व भावना, लक्षात घेऊन वागणे चांगले राहील. व्यापारी वर्गाला जानेवारीनंतर होणारा शनिबदल तुम्हाला व्यवसायात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे.

तुमचा व्यवसाय परदेशी कंपन्यांशी संपर्क होऊन तुम्हाला यश प्राप्त होईल व वाढ होण्याची शक्यता राहील. कामात व्यस्त असल्यामुळे कौटुंबीक जीवनापासून दूर जाल.

व्यवसायाच्या प्रगतीसाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांशी करार अथवा कायदेशीर कामे एप्रिल 2023 नंतर चांगले यश देईल. मे ते जुलै या काळात तुम्ही स्थावर मालमत्ता व वाहन खेदर करण्याची शक्यता राहील. आर्थिक परिस्थितीही चांगली राहील. मे ते जुलै हा काल उत्तम दर्शवितो, आरोग्याच्या दृष्टीने पुर्वार्धात जास्त अडचणी नसल्या तरी वर्षामध्ये जुन-जुलै-ऑगस्ट या दरम्यान वैद्यकिय उपचारांचा अवलंब करावा.

वृषभ राशीच्या व्यक्तींना पूर्वार्धात खूप चांगले यश प्राप्त होईल. ज्या व्यक्तींची वयोवर्ष 25, 28, 36 आणि 42 यांना हे वर्ष उत्तम राहील. राजकीय क्षेत्रातील भक्तींना चांगल्या संधी प्राप्त होतील.

उपासना : आपण दर शुक्रवारी ‘महालक्ष्मी’ची उपासना केल्यास उत्तम राहील. ‘श्री सुक्त’। पाठ, पठण केल्यास उत्तम. गुलाबी व चमकदार, पांढरे रंग वापर केल्यास उत्तम घरामध्ये ‘श्री यंत्र’ के स्थापित करून त्याची पुजा केल्यास आत्मिक बल वाढेल. दर गुरुवारी हरभरा डाळ पिवळे पदार्थ, केली मंदिरात दान केल्यास उत्तम राहील.

शुभ रंग : हिरवा, पांढरा, गुलाबी
शुभ दिनांक : 6, 15, 24
शुभ वर्ष (भाग्यकारक) : 17, 28, 35, 44, 53.
शुभ रत्न : ‘पाचू डायमंड’, नीलमणी

Aries – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मेष : करिअर व आर्थिक स्थिती सुधारणा

Gemini – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मिथुन : अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल

Cancer- Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – कर्क – संघर्षातून यशप्राप्ती

Leo- Annual Horoscope 2022-2023 : सिंह राशीच्या व्यक्तींना हळूहळू पण यश नक्कीच मिळेल

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.