Virgo – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – कन्या: जीवनात चढ-उतार

एमपीसी न्यूज : जाणून घेऊयात कन्या राशीचे वार्षिक (Virgo – Annual Horoscope 2022-2023) राशिभविष्य 2022-2023 कन्या राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकीत केले आहे ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश यांनी!

सर्वांना दीपावली व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्योतिष शास्त्राचे सूक्ष्म निरीक्षण केले असता प्रामुख्याने दोन विभागात याचा विचार होऊ शकतो. पहिला म्हणजे आपल्या ऋृषिमुनींनी ग्रह, नक्षत्रे यांची गती व दुसर्‍या विभागात त्याची फलीते राशीवर होणारा विचार फलीत विभागात तर्क अनुमान, निष्कर्ष, अंदाज अशा माध्यमातून वर्तविले जाते.

तसेच फलित हे ठराविक कालावधीनंतर बदल व सुधारणा होत गेली. कोणत्याही शास्त्राची निर्मिती ही मानव कल्याणाकरीता केली आहे, असे मला वाटते. त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्राचा सुद्धा मानवाला येणार्‍या सुख-दु:खाचा मागोवा घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो. हे शास्त्र मानवाला देववादी किंवा कर्तव्यशून्य न बनवता प्रयत्नवादी. बनवेल असो!

प्रस्तुत राशी भविष्यामध्ये आम्ही ह्या वर्षी आगामी म्हणजे या वर्षी प्रमुख ग्रहस्थितीचा अभ्यास करून फलीत दिली आहेत. त्यांचा उपयोग आपणास होईल व येणार्‍या वर्षाचा अंदाज येऊ शकेल. तसेच शुभ रंग, शुभ काळ, उपासना सुद्धा दिली आहे. त्याचा उपयोग आपणास येणार्‍या अडचणीच्या काळात आपली मानसिकता सक्षम होण्यास मदत होईल.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
कासारवाडी, पिंपरी-चिंचवड

संपर्क – 9922311104

कन्या रास : जीवनात चढ-उतार

कन्या ही रास राशीचक्रातील सहाव्या क्रमांकाची रास असून, पृथ्वी तत्त्वाची, द्विस्वभावी, स्त्री राशी आहे. अर्थ त्रिकोणातील ही द्वितीय रास असून बुध ग्रहाच्या अधिपत्याखाली ही राशी येते. बुध म्हणजे बुद्धीवान म्हणून या राशीच्या व्यक्तींची आकलनशक्ती उत्तम असते. (Virgo – Annual Horoscope 2022-2023) या राशीच्या व्यक्ती बौद्धिक क्षेत्रात लवकर प्रगती करतात. विविध विचार करण्यासाठी उत्तम बुद्धीमत्ता, चातुर्य हजरजबाबीपणा, चांगली निरीक्षण शक्ती असून प्रतिकूल परिस्थितीवर त्या उत्तम मार्ग काढतात.

दुसर्‍याकडून माहिती काढून घेण्यात या व्यक्ती पटाईत असतात. कोणतेही काम, गोष्टी गुप्त ठेवण्याची वृत्ती व स्वभावात मन-मोकळेपणा कमी हे गुण या राशीतील व्यक्तीमध्ये आढळतात. त्यांचे बोलणे मार्मिक व स्वतःचे हित लक्षात घेऊन त्यास अनुसरून असते. तर संयम, सूचकता, विवेकी असलेल्या व्यक्ती या राशीत असतात. कन्या राशीमध्ये उत्तरा, हस्त व चित्रा ही नक्षत्रे येतात. तर कन्या रास उत्तरा नक्षत्र असणार्‍या व्यक्तींची वैशिष्ट्ये म्हणजे तेजस्वी, स्वाभिमानी, कलेच्या क्षेत्रामध्ये कुशल, आत्मविश्वास तसेच समानतेचे व्यवहार करणारी असतात.

कन्या रास हस्त नक्षत्र अत्यंत उत्साही, गूढशास्त्राची आवड, शांतप्रिय, विनम्र, विद्वान, धनिक, प्रभावशाली व्ङ्मक्तिमत्व असणारे, सुंदर कपडे व दागिन्यांची हौस असते. चैनीसाठी हे लोक निर्लज्ज असतात. तर चित्रा नक्षत्रातील व्यक्तींना विविध वस्त्रे वापरण्याची आवड असते. या व्यक्तींचे डोळे तजेलदार व बोलके असतात. स्वभावात चतुरस्त्र भाव असतो. तर अशा कन्या राशीच्या व्यक्तींचे चालू वर्ष कसे जाईल ते पाहू.

राशीच्या सप्तम स्थानातून गुरू व एप्रिल 2023 नंतर अष्टम स्थानातून गुरुभ्रमण होणार आहे. त्याचबरोबर पंचमस्थानी शनि गोचर करत असून जानेवारी 2023 नंतर तो पष्ठस्थानी गोचर करणार आहे. त्याचबरोबर अनुकमे राहूचे भ्रमण धनस्थानी केतूचे भ्रमण अष्ठम स्थानी हर्षलचे भ्रमण अष्ठम स्थानी नेपच्यूनचे भ्रमण सप्तम स्थानी व प्लुटोचे भ्रमण पंचम स्थानी होत असून याप्रमाणे यावर्षी प्रमुख ग्रहांची ग्रहस्थिती आपल्या राशीला राहील. वर्षांच्या पूर्वार्धात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे परिणाम प्राप्त होतील. जर तुम्ही कामात निराश होत असाल तर त्याचे एकमेव कारण मेहनत असू शकेल.

वर्षाच्या पूर्वार्धात तुम्हाला बर्‍याच संधी उपलब्ध असतील. धनसंपत्ती, प्रसिद्धी तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्याजवळ बरेच कार्य करण्यासारख्या गोष्टी हातात असतील. त्याचे अंतिम रूप देण्याचे अपेक्षाही तुमच्यावर असेल. संशोधन क्षेत्रात काम करणार्‍या व्ङ्मक्तींना बर्‍याच संधी प्राप्त होतील. (Virgo – Annual Horoscope 2022-2023) जानेवारी,  फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे महिने धनलाभासाठी प्रेरणेचे एक उत्तम स्रोत सिद्ध होईल. लहान प्रवासाचे अथवा कौटुंबीक प्रवासाचे प्लॅनिंग कराल. आरोग्याच्या स्थितीमध्ये तुमच्या दिनचार्येबरोबर व्यायाम व योग करणे तुम्हास उत्तम विकल्प सिद्ध होऊ शकतात. यावर्षी तुम्हाला पूर्वार्धात मानसिक अशांतता वाटणार नाही. सध्या गुरुभ्रमण शुभ असल्यामुळे महत्वाची कामे मार्गी करून घ्यावी. स्वतःला स्वयंसिद्ध करण्यासाठी आपल्या कार्यस्थळी आपल्या अनुभवाचा उपयोग करावा.

वर्षाच्या उत्तरार्धात मीन राशीतून मेष राशीमध्ये गुरुचे भ्रमण सुरू होईल व कुंभ राशीतून शनिचे भ्रमण सुरू होईल. त्यावेळी धनहानी होण्याची शक्यता दर्शविते. शारीरिक व मानसिक नुकसान देखील होऊ शकते. आरोग्याच्या कुरबुरी वाढतील. मात्र हा काळ तुमची अध्यात्मिक विचारसरणी वाढवेल. धार्मिक कार्यात अधिक रस घ्याल. ऑक्टोबर 2023 पर्यंत राहू बदल होत नाही, तो पर्यंत तुम्हाला सतर्क रहावे लागेल. म्हणजे, मानसिक व शारीरिक आरोग्याबद्दल दक्षता घ्या. सासुरवाडीशी चांगले संबंध राहतील. सन 2023 प्रमुख ग्रहांच्या स्थिती म्हणजे गुरू, शनि आणि राहू-केतू यांसारख्या दीर्घ संक्रमणांच्या ग्रहांची गतीच्ङ्मा फलितांची माहिती मिळाली असून परंतु इतर ग्रहांच्या गतीच्या फलितांचा विचार येतो. यामध्ये सूर्य, मंगळ, बुध, शुक्र इत्यादी प्रभावी ग्रहांचा शुभ-अशुभ परिणाम सुद्धा जाणवेल.

नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हा काळ विवाह इच्छुकांसाठी शुभदायक राहील. विवाह पूर्ण पार पाडतील. जुलै ते सप्टेंबर 2023 तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तरीसुद्धा महिन्याच्या उत्तरार्धात काही खर्च वाढतील. यापुढील कालखंडात तुम्हाला परदेशी प्रवासाचीही शक्यता आहे. विद्यार्थीवर्गाला बेफिकीर राहून चालणार नाही. अन्यथा नुकसान सहन करावे लागेल. एकाग्रता भंग होईल, तुम्हाला यश खेचून आणावे लागेल.

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला कठोर परिश्रम व मेहनत कायम ठेवावी लागेल. योग्य दिशेने पुढे जा. जेणेकरून यश तुमचेच असेल.(Virgo – Annual Horoscope 2022-2023) उच्चशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चढ उताराचे असेल. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये अभ्यासासाठी परदेशी जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आर्थिकबाबतीत शेअर बाजार, सट्टे बाजार, लॉटरी इत्यादी बाबतीत गुंतलेला असाल तर तुम्हाला तोटा सहन करावा लागेल.

मात्र नोव्हेंबर, डिसेंबर 2023 हे महिने तुम्हाला यश मिळवून देतील. कुटुंब एकसंघ ठेवा. स्वतःला शांत ठेवा. कुटुंबातील सदस्यांशी वारंवार बोलून प्रकरणे शांत करा. त्यामुळे कौटुंबिक वातावरण चांगले होऊ शकेल. मे ते ऑक्टोबर दरम्यान कुटुंबात मंगलकार्य होऊ शकते.कन्या राशीसाठी पूर्वार्ध काळ चांगला राहील. या वर्षी चढ-उतार जीवनात संभवतात. ऑक्टोबर 2023 नंतर यशस्वी काळ राहील. मानसिक एकाग्रता टिकवून ठेवावी लागेल. तुमच्या इच्छाशक्तीवर कामे तडीस न्याल.

शुभ रंग : हिरवा, पिवळा, फिरोजी.
शुभ दिनांक : 5, 14, 23.
शुभकारक वयोवर्ष : 15, 25, 36, 42, 51, 60 इ.
शुभ रत्न : पांढरा पुष्कराज, ग्रीनझेड, परीडॉट, पाचू.

उपासना : कन्या राशीच्या लोकांनी ‘विष्णु सहस्र’ नामाचे पाठ केल्यास उत्तम. त्याचबरोबर बुद्धी देवतांच्या ‘बीज’ मंत्रांचा जप करणे तुम्हास फायदेशीर ठरेल. दर बुधवारी मंदिरात काळे तीळ दान करावे. दर बुधवारी ब्राह्मणांना भोजन, पिवळे वस्त्र दान द्यावे. तुम्हाला कोणतीही कठीण समस्या उद्भवत असल्यास रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्यास फायदेशीर ठरेल.

Aries – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मेष : करिअर व आर्थिक स्थिती सुधारणा

Taurus: Annual Horoscope 2022-23- वार्षिक राशी भविष्य – वृषभ : परदेशगमन व प्रवासाचा योग

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.