Libra – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य : तूळ – कायदेशीर कामात यशदायक कालखंड

एमपीसी न्यूज : जाणून घेऊयात तूळ राशीचे वार्षिक राशिभविष्य (Libra – Annual Horoscope 2022-2023 2022-2023) तूळ राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकीत केले आहे ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश यांनी!

सर्वांना दीपावली व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्योतिष शास्त्राचे सूक्ष्म निरीक्षण केले असता प्रामुख्याने दोन विभागात याचा विचार होऊ शकतो. पहिला म्हणजे आपल्या ऋृषिमुनींनी ग्रह, नक्षत्रे यांची गती व दुसर्‍या विभागात त्याची फलीते राशीवर होणारा विचार फलीत विभागात तर्क अनुमान, निष्कर्ष, अंदाज अशा माध्यमातून वर्तविले जाते.

तसेच फलित हे ठराविक कालावधीनंतर बदल व सुधारणा होत गेली. कोणत्याही शास्त्राची निर्मिती ही मानव कल्याणाकरीता केली आहे, असे मला वाटते. त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्राचा सुद्धा मानवाला येणार्‍या सुख-दु:खाचा मागोवा घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो. हे शास्त्र मानवाला देववादी किंवा कर्तव्यशून्य न बनवता प्रयत्नवादी. बनवेल असो!

प्रस्तुत राशी भविष्यामध्ये आम्ही ह्या वर्षी आगामी म्हणजे या वर्षी प्रमुख ग्रहस्थितीचा अभ्यास करून फलीत दिली आहेत. त्यांचा उपयोग आपणास होईल व येणार्‍या वर्षाचा अंदाज येऊ शकेल. तसेच शुभ रंग, शुभ काळ, उपासना सुद्धा दिली आहे. त्याचा उपयोग आपणास येणार्‍या अडचणीच्या काळात आपली मानसिकता सक्षम होण्यास मदत होईल.

 

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
कासारवाडी, पिंपरी-चिंचवड

 

तूळ रास : कायदेशीर कामात यशदायक कालखंड

तूळ राशी चक्रातील सातवी रास असून, या राशीचा स्वामी शुक्र आहे. पुरुष स्वभावी, चरवृत्ती, वायू तत्तवाची रास असून या राशीचे चिन्ह तराजू आहे. या राशीच्या व्यक्ती उत्साही, रूप-सौंदर्य, रसिकता यांचा आस्वाद घ्यावयास लागणारी बुद्धी या राशीच्या व्यक्तींना भरपूर असते. बोलण्यात व वागण्यात गोडवा असतो. समाजप्रिय असून आपल्या कार्यक्षेत्रावर या व्यक्तींचा वचक असतो.

स्वतःचे तर्क -वितर्क लावून सत्याला व न्यायाला धरून बर्‍याच  गोष्टी पूर्णत्वास नेतात. त्यामुळे या व्यक्ती लोकप्रियता अधिक मिळवतात. (Libra – Annual Horoscope 2022-2023) लोकशाही वृत्तीला प्राधान्य देणे, समतोल विचार, चुकीच्या गोष्टींची कबुली देणे, सर्वांना समान वागणूक देणे, दुसर्‍याला कायदेशीर मदत करणे हे गुण या राशीतील व्यक्तींमध्ये असतात. कोणतेही कार्य करताना प्रामाणिकपणा, न्यायीपणा, व्यापारी वृत्ती ह्या गोष्टींचा मेळ घालून ते कार्य पूर्ण करण्याची कला यांच्याकडे असते. जीवन कसे असावे, याची कल्पना यांच्याकडे सुंदर असते. सत्याची आवड असते.

तूळ राशीमध्ये चित्रा, स्वाती व विशाखा ही नक्षत्रे येतात. तूळ रास चित्रा नक्षत्रातील व्ङ्मक्ती पराक्रमी, साहसी, बलवान व उत्साही, आर्थिकबाबतीत ज्यांचा गणित विषय चांगला असतो. (Libra – Annual Horoscope 2022-2023) पारख चांगली असते. गूढशास्त्राची आवड असते तर तूळ रास स्वाती नक्षत्राची व्यक्ती शांत, व्यापारी वृत्तीची, कृपाळू मधुरवचनी, आनंदी, ईश्वरभक्त, संयमी, नीतीमान, सत्यप्रिय असून आत्मसंयमी, विद्वान चंचल व तडजोड करणारी असते. तर तूळ रास विशाखा नक्षत्रातील व्यक्ती चिडखोर, रसिक, काही प्रमाणात उधळ्या व्यवहाराची रुची, आकर्षक, प्रभावशाली व्यक्तिमत्व, काहीवेळा असूरी वृत्ती, बोलण्यात अत्यंत चतुर अशी व्यक्ती असते. तर अशा तूळ राशीचे चालू वर्ष कसे राहील ते पाहू.

राशीच्या षष्ठ स्थानातून गुरुचे भ्रमण, चतुर्थातून शनिचे भ्रमण, अनुकमे सप्तमातून राहूचे, लग्नस्थानातून केतूचे, सप्तमातून हर्षलचे, षष्ठ स्थानांतून नेपच्युनचे व चतुर्थीतून प्लुटोचे सध्या भ्रमण होत आहे. सामान्यतः वर्षांच्या पूर्वार्धात तुम्हाला धनलाभ व स्थावर मालमत्ता प्राप्त होईल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल. काहींना स्थान परिवर्तनाचा योग सुद्धा दर्शवितो. चतुर्थातील शनि कौटुंबिक वादविवाद निर्माण करेल.(Libra – Annual Horoscope 2022-2023) आपल्या वित्तीय खर्चाची विशेष काळजी घ्या. नको असलेले खर्च टाळा. घरातील मोठ्या व्यक्ती जाणकार लोकांचा सल्ला फायदेशीर राहील. नवीन नात्यामध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात. नवीन नोकरीची सुरुवात करत असलेल्या व्यक्तींना अधिक सतर्क व सावधान राहण्याची आवश्यकता असेल. तुमची योग्यता सिद्ध करण्यासाठी वर्षाचा पूर्वार्ध खूप चांगला राहील.

कौटुंबिक समुदायात चांगला अनुभव येईल. आपल्या परिवाराला आनंदित ठेवण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलाल. त्यामुळे परिवारातील व्यक्ती तुमच्याकडे जास्त आकर्षित होतील. आरोग्याच्या बाबतीत पचन, व्हायरल संक्रमण या संबंधी तुम्हाला तक्रारी जाणवतील. त्यामुळे व्यायाम व शरीराचा फिटनेस त्याचबरोबर वजनावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. ताण-तणावापासून बचाव करण्यासाठी आवडत्या गोष्टींना आपल्या जीवनात सामील करा. विवाहेइच्छुकांना एप्रिल 2023 नंतरच विवाहयोग दर्शवितात. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांबरोबर संबंध बिघडवू देऊ नका. सहकारी वर्गाला विश्‍वासात घेऊन काम करा. एकंदरीत वर्षाच्या पूर्वार्धात आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला. वर्षांच्या उत्तरार्धात म्हणजे एप्रिल 2023 नंतर तुम्हाला जीवनात अनेक प्रकारचे यश येईल.

मानसन्मान वाढेलच, त्याचबरोबर व्यवसायात प्रगती होईल. तुमच्या जोडीदाराच्या बरोबरचे मतभेदही कमी होतील. तुम्ही चांगले निर्णय घेऊन तुमच्या आयुष्यात प्रगती साधाल.व्यवसाय करणार्‍या व्यक्तींना भागीदारी करताना कायदेशीर बाबी पूर्ण करूनच पुढील निर्णय घ्यावेत. येणार्‍या नवीन आव्हांनामुळे थोडेसे अस्वस्थ राहून शारीरिक त्रास होण्याची शक्यता राहील. तुम्हाला परदेश प्रवासाची शक्यता ङ्मावर्षी राहील. शक्यतो जानेवारी 2023 अर्थिकदृष्टया चांगला राहील. काही चढ-उतार जाणवतील, तरीसुद्धा तुमच्या व्यक्तिमत्व मजबुतीमुळे परिस्थितीवर मात कराल. वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये तीर्थक्षेत्राला भेटी द्याल. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात तुम्हाला तुमची क्षमता दाखवण्याची पूर्ण संधी मिळेल.

एप्रिल, मे, जून या महिन्यात वाहन चालवताना दक्षता घ्यावी. या वर्षी कोणतीही गुंतवणूक करताना हानीकारक व धोकादायक मुद्दे लक्षात घेऊनच गुंतवणूक करावी. राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना या वर्षी संघर्षाने व आपल्या समतोल विचारसरणीने यश मिळवावे लागेल. (Libra – Annual Horoscope 2022-2023) विद्यार्थीवर्गाला या वर्षी शिस्तबद्ध व आळस झटकून यश मिळवावे लागेल. कोर्ट कचेरीच्या कामातील व्ङ्मक्तींना प्रवास सुखकारक व लाभदायक होतील. एकंदरीत वर्षाचा उत्तरार्ध तुम्हाला आत्मविश्वास व नवीन चांगल्या घटना जीवनात प्राप्त होतील. जुलै 2023 नंतर शुभदायी घटना घडण्याची दाट शक्यता आहे. तुळ राशीच्या व्यक्तींना साधारणपणे हे वर्ष सरासरी राहील. तुळ राशीच्या व्यक्तींना संगीत, नृत्य, कला, डिझाइनिंग, वास्तु-विशारद, जनसंपर्काचे व्यवसाय या क्षेत्रात नवीन संधी प्राप्त करून देणारे असेल.

शुभरंग : जांभळा, पांढरा, गुलाबी (लाइट) इ.
शुभदिनांक : 6, 15, 24 इ.
शुभकारक वयोवर्ष : 16, 25, 28, 32, 40, 47, 62 इ.
शुभरत्न : डायमंड, पाचू, ओपल इ.

उपासना : आपण ‘कुलदेवी’ उपासना, ‘महालक्ष्मी’ उपासना निरंतर ठेवावी. शुक्रवारी उपवास करावा. ‘शुक्र ग्रहाचा’ बीज मंत्राचा जप करावा. कोणत्याही महिन्याच्या शुक्रवारी देवीच्या मंदिरात शृंगाराचे साहित्य अर्पण करावे. सप्त धान्याचे दान करावे. तुम्हाला कोणती जर कठीण समस्या असेल तर ‘श्रीसूक्त’ किंवा ‘गजेंद्रमोक्ष’ स्तोत्राचे पठण केल्यास फायदेशीर ठरेल.

Aries – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मेष : करिअर व आर्थिक स्थिती सुधारणा

Taurus: Annual Horoscope 2022-23- वार्षिक राशी भविष्य – वृषभ : परदेशगमन व प्रवासाचा योग

Gemini – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मिथुन : अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल

Cancer- Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – कर्क – संघर्षातून यशप्राप्ती

Leo- Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य : सिंह – हळूहळू पण नक्कीच यशप्राप्ती

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.