Scorpio : Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – वृश्चिक: अविस्मरणीय वर्ष

एमपीसी न्यूज : जाणून घेऊयात वृश्चिक राशीचे वार्षिक (Scorpio : Annual Horoscope 2022-2023) राशिभविष्य 2022-2023 वृश्चिक राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकीत केले आहे ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश यांनी!

सर्वांना दीपावली व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्योतिष शास्त्राचे सूक्ष्म निरीक्षण केले असता प्रामुख्याने दोन विभागात याचा विचार होऊ शकतो. पहिला म्हणजे आपल्या ऋृषिमुनींनी ग्रह, नक्षत्रे यांची गती व दुसर्‍या विभागात त्याची फलीते राशीवर होणारा विचार फलीत विभागात तर्क अनुमान, निष्कर्ष, अंदाज अशा माध्यमातून वर्तविले जाते.

तसेच फलित हे ठराविक कालावधीनंतर बदल व सुधारणा होत गेली. कोणत्याही स्त्राची निर्मिती ही मानव कल्याणाकरीता केली आहे, असे मला वाटते. त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्राचा सुद्धा मानवाला येणार्‍या सुख-दु:खाचा मागोवा घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो. हे शास्त्र मानवाला देववादी किंवा कर्तव्यशून्य न बनवता प्रयत्नवादी. बनवेल असो!

प्रस्तुत राशी भविष्यामध्ये आम्ही ह्या वर्षी आगामी म्हणजे या वर्षी प्रमुख ग्रहस्थितीचा अभ्यास करून फलीत दिली आहेत. त्यांचा उपयोग आपणास होईल व येणार्‍या वर्षाचा अंदाज येऊ शकेल. तसेच शुभ रंग, शुभ काळ, उपासना सुद्धा दिली आहे. त्याचा उपयोग आपणास येणार्‍या अडचणीच्या काळात आपली मानसिकता सक्षम होण्यास मदत होईल.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
कासारवाडी, पिंपरी-चिंचवड

संपर्क – 9922311104

वृश्चिक रास ही राशीचक्रातील आठवी रास असून जलतत्तवाची, स्थिर वृत्तीची स्त्री स्वभावी रास आहे. या राशीचा स्वामी मंगळ आहे. राशीचे चिन्ह विंचू असून, उत्तम टीकाकार, आत्मसंयमी, मनोबल आत्मविश्‍वासासाठी लागणारे गुण, यशस्वी होण्यासाठी लागणारे प्रयत्न या राशीतील व्यक्तीमध्ये भरपूर असतात. चिकाटीने, उत्साहाने, निश्चित, दीर्घ उद्योग, यशस्वी कारभार करण्यासाठी इच्छाशक्ती, स्वभावामध्ये आक्रमकता, थोडीशी हुकुमशाहीवृत्ती, मुत्सद्दीपणा, व्यवहारी वृत्ती, कोणत्याही गोष्टीचे मूल्यमापन करण्याची कला, व्यक्तींच्या मनातील ठावठिकाणा चटकन समजण्याची कला या व्यक्तीमध्ये असते.

या व्यक्ती अचूक मर्मावर घाव घालून आपले काम तडीस नेतात. गूढ व संशोधन क्षेत्रात ह्या राशीचे लोक इतर लोकांपेक्षा लवकर यशस्वी होतात. क्षमा न करता योग्य शासन करणारी हा या राशीचा महत्त्वाचा गुण आहे. तर अशी महत्त्वाकांक्षी व धोरणी स्वभाव असणारी वृश्चिक रास आहे वृश्चिक राशीत विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा ही नक्षत्रे येतात . तर वृश्चिक रास विशाखा नक्षत्र असणार्‍या व्यक्ती अल्प क्रोधी, लहान कारणांवरून रागीटपणा करणारे, प्रवासाची आवड असणारे, गुप्तकार्य, हट्टी, सूडपणा, वादविवादप्रिय असतात. तर वृश्चिक रास अनुराधा नक्षत्रामधील व्यक्ती सौंदर्याची आवड, कपडेलत्ते, दागिने, प्रवास यांची लालसा असते. धनवान, संसारिक वृत्तीच्या, गोड बोलणार्‍या, दूर प्रवास करण्यात आनंद मानणार्‍या असतात तर वृश्चिक रास ज्येष्ठा नक्षत्र असणारे लोक संतोषी, घातकी, आपमतलबी, धार्मिक, उपद्रवी, नेहमी संकटातून पळ काढणारे, उत्तम स्मरणशक्ती असणारे असतात. तर अशा गूढ स्वभाव असणार्‍या वृश्चिक राशीचे चालू वर्ष कसे राहील ते पाहू.

राशीच्या पंचम स्थानी गुरु, तृतीय स्थानी शनि, अनुक्रमे व्ययस्थानात राहू व षष्ठस्थानात केतू, हर्षल तसेच, पंचम स्थानात नेपच्युन व तृतीय स्थानात प्लुटो अशी ही सध्या ग्रहस्थिती आहे. 17 जानेवारी 2023 नंतर शनि भ्रमण चतुर्थस्थानातून होईल व एप्रिल 2023 नंतर गुरुचे भ्रमण षष्ठ स्थानातून होईल. (Scorpio : Annual Horoscope 2022-2023) वर्षाच्या पहिल्या तिमाहीत. बरीच चांगली स्थिती राहणार आहे. आपणास पद पुरस्कार सन्मान प्राप्त होईल. खर्चाचे प्रमाण सुद्धा वाढणार आहे. सामाजिक जीवनसुद्धा उत्तम राहील. विद्यार्थीवर्गाला विदेशात शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होईल. नोव्हेंबर ते जानेवारी 2023 पर्यंत तुमच्यासाठी यशस्वी सिद्ध होईल. या कालखंडात तुमच्या आसपास बर्‍याच महत्त्वाची व प्रभावशाली व्यक्ती राहतील.

आपल्या हितशत्रूंना हरविण्याची हिमंत नक्कीच या कालखंडात राहील. करिअरमध्ये यश. आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा सहयोग भरपूर मिळेल.  राशीच्या व्यक्ती कन्स्ट्रक्शन व्यवसाय, तेल कंपन्यांचे व्ङ्मवसाय त्ङ्माचबरोबर समुद्रातील क्षेत्राच्या संबंधीत असणार्‍या व्यक्तींना वर्षाचा पूर्वार्ध कौटुंबीक जीवनात शुभदायक राहील. आरोग्याच्या बाबतीत जोडीदाराच्या आरोग्याची चिंता दर्शविते. प्रेमिकांना एप्रिल 2023 पर्यंतचा कालखंड अत्यंत शुभदायक असून आपल्या पार्टनरसोबत विवाहबंधनात अडकतील. नोकरीमध्ये विशेष करून कार्पोरेट क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्ती उत्तम प्रशासन व नेतृत्व करून इतरांची मने जिंकतील. पदोन्नतीचाही योग आहे.

राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या व्ङ्मक्तींना विविध मार्गांनी पैसा मिळेल. एकंदरीत वर्षाचे पहिले तिमाही म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी (2022-23) या महिन्यांमध्ये आर्थिक, व्यवसायिक व शैक्षणिक उन्नती होईल. एप्रिल 2023 नंतर होणारा गुरु, शनि बदल तुम्हाला खूप मेहनत करावी लावेल. ही मेहनत येणार्‍या कालखंडात खूप फायदेशीर राहील. एप्रिल ते ऑगस्ट 2023 तुमच्या करिअरमध्ये चढ-उतार येऊ शकतात. ऑक्टोबर 2023 नंतर तुम्ही कामानिमित्त बाहेर जाण्याची शक्यता राहील. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांमध्ये तुम्हाला मेहनतीचे फळ प्राप्त होईल. विद्यार्थीवर्गाला एप्रिल 2023 च्या आधीचा कालखंड खूप उत्कृष्ठ यश देऊन जाईल. तुम्हाला तुमचे ज्ञान वाढविण्याची संधी प्राप्त होईल. फेलोशीप, स्कॉलरशीप इत्यादी बाबतीत असलेले व्यवहार, कायदेशीर कामे एप्रिल 2023 च्या आत उरकून घ्यावीत. मे ते ऑगस्ट दरम्यान अभ्यासात जास्त लक्ष द्यावे.

विशेषकरून उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना वर्षाच्या सुरुवातीला चांगले परिणाम मिळतील. पण वर्षाचा उत्तरार्ध तुलनेने कमकुवत राहील. कौटुंबीक जीवनात ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीत चढ-उतार जाणवतील. कामांचा व्ङ्माप वाढल्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल. (Scorpio : Annual Horoscope 2022-2023) तथापि तुमचे भाऊ-बहीण यांचे सहकार्य मिळाल्याने काही प्रमाणात समस्या कमी होतील. एकंदरीत 22 जानेवारी 2023 ते मार्च 2023 हा कालखंड वाहन खरेदी, अर्थिक उन्नती, स्थावर मालमत्ता यातून नफा मिळण्यासाठी उत्तम कालखंड, आरोग्याच्या बाबतीत मोठ्या आतड्यांशी संबंधीत समस्या अशा दुखण्यांना सामोरे जावे लागेल. वृश्चिक राशीच्या लोकांना पूर्वार्ध चांगले दिवस दाखवील. जीवनात अनेक बदल घडतील. वृश्चिक राशीची कमजोरी म्हणजे त्यांचे धैर्य. ते उत्तम ठेवल्यास येणारा उत्तरार्ध सुखकारक राहील. खेळाडूंना हे वर्ष उत्कर्ष देणारे राहील.

शुभरंग : गुलाबी, लालसर, मरुन, क्रिम कलर इ.
शुभदिनांक : 18, 21, 27 इ.
शुभकारक वयोवर्ष : 20, 24, 34, 42, 47, 56 इ.
शुभरत्न : पुष्कराज, माणिक, मुनस्टोन आणि
गोलाकार प्रवाळ इ.

उपासना : आपण ‘हनुमान चालीसा’ चा पाठ करणे फायदेशीर राहील. हनुमान मंदिरामध्ये शेंदुर, चमेलीचे तेल अर्पण करावे. शनिवारी मुंग्याना पिंपळाच्या झाडाखाली पीठ अर्पण करावे. दर संकष्टीला मुगाचे बनविलेले पदार्थ गणपती मंदिरात अर्पण करावे. तुम्हाला काही आरोग्याच्या समस्या, अडचणी जास्त येत असतील तर ‘संकटमोचन’ स्तोत्राचे यांचे पाठ करावेत, तेे तुम्हाला फायदेशीर राहील.

Aries – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मेष : करिअर व आर्थिक स्थिती सुधारणा

Taurus: Annual Horoscope 2022-23- वार्षिक राशी भविष्य – वृषभ : परदेशगमन व प्रवासाचा योग

Gemini – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मिथुन : अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल

Cancer- Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – कर्क – संघर्षातून यशप्राप्ती

Leo- Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य : सिंह – हळूहळू पण नक्कीच यशप्राप्ती

Libra – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य : तूळ – कायदेशीर कामात यशदायक कालखंड

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.