Aquarius : Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – कुंभ : संयमाने होईल यशप्राप्ती

एमपीसी न्यूज : जाणून घेऊयात कुंभ (Aquarius : Annual Horoscope 2022-2023) राशीचे वार्षिक राशिभविष्य. कुंभ राशीसाठी 2022-2023 हे वर्ष कसे जाईल, याचे भाकीत केले आहे ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश यांनी!

सर्वांना दीपावली व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्योतिष शास्त्राचे सूक्ष्म निरीक्षण केले असता प्रामुख्याने दोन विभागात याचा विचार होऊ शकतो. पहिला म्हणजे आपल्या ऋृषिमुनींनी ग्रह, नक्षत्रे यांची गती व दुसर्‍या विभागात त्याची फलीते राशीवर होणारा विचार फलीत विभागात तर्क अनुमान, निष्कर्ष, अंदाज अशा माध्यमातून वर्तविले जाते.

तसेच फलित हे ठराविक कालावधीनंतर बदल व सुधारणा होत गेली. कोणत्याही शास्त्राची निर्मिती ही मानव कल्याणाकरीता केली आहे, असे मला वाटते. त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्राचा सुद्धा मानवाला येणार्‍या सुख-दु:खाचा मागोवा घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो. हे शास्त्र मानवाला देववादी किंवा कर्तव्यशून्य न बनवता प्रयत्नवादी. बनवेल असो!

प्रस्तुत राशी भविष्यामध्ये आम्ही ह्या वर्षी आगामी म्हणजे या वर्षी प्रमुख ग्रहस्थितीचा अभ्यास करून फलीत दिली आहेत. त्यांचा उपयोग आपणास होईल व येणार्‍या वर्षाचा अंदाज येऊ शकेल. तसेच शुभ रंग, शुभ काळ, उपासना सुद्धा दिली आहे. त्याचा उपयोग आपणास येणार्‍या अडचणीच्या काळात आपली मानसिकता सक्षम होण्यास मदत होईल.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
कासारवाडी, पिंपरी-चिंचवड

कुंभ रास ही राशी चक्रातील अकरावी रास असून स्थिर वृत्तीची, वायुतत्त्वराशी असून पुरुषस्वभावी आहे. या राशीचा स्वामी शनि असून, काहींच्या मते, हर्षल ग्रहाकडे या राशीचे प्रतिनिधित्व आहे. या राशीचे चिन्ह खांद्यावर कुंभ घेतलेला व चालत राहणारा पुरुष असे आहे. उच्च प्रकारची ज्ञान लालसा, सत्याची आवड, कोणतेही काम मनापासून, तळमळीने करणे हा गुण दर्शावितो. ह्या राशीच्या व्यक्तीवर चिंतन, मनन, तत्वज्ञानेचे संस्कार झालेले असतात. त्यामुळे माणसाने माणसाबरोबर माणुसकीने वागल्यास सर्व कामे पूर्ण होतात. असा विचार करणारी ही रास आहे. या राशीच्या व्यक्ती चांगल्या परंपरा, संस्कृती अध्यात्म जपणारी असतात अध्यात्म व विज्ञान यांची उत्तम सांगड घालून एक नवी दिशा समाजाला देणार्‍या या राशीच्या व्यक्ती आढळतात. नवनवीन शोध, मित्रपरिवार मोठा, अनेक व्यक्तीशी संवाद साधून विचारांची देवाण-घेवाण करणार्‍या कुंभ राशीच्या व्यक्ती असतात. या राशीचे व्यक्तिमत्व स्वयंभू, उच्च विचार, दिलेला शब्द पाळणारे असे असते.

कुंभ राशीमध्ये धनिष्ठा, शततारका व पूर्वभाद्रपदा ही तीन नक्षत्रे येतात. कुंभ रास धनिष्ठा नक्षत्राची व्यक्ती अनेक मार्गाने अर्थप्राप्ती होऊन सौख्य संपादन करेल. महत्वाकांक्षी, साहसी, संगीताची आवड, वाक्यचातुर्य, हजरजबाबी, बुद्धीमत्ता प्रचंड असते. व्यसनी, विषयासक्त असतात व लोभाला बळी पडणारे असतात. हे मध, मांस, पशु, पक्षी यांचा व्यापार करणारे असतात तर कुंभ रास पूर्वाभाद्रपदा नक्षत्र असणार्‍या व्यक्ती विद्याव्यासंगी, संशोधक, स्त्रीवश, धुर्त काहीवेळा कठोर अंतकरणाचे असतात.

तर, अशा बुध्दीमान कुंभ राशीच्या व्यक्तीचे चालू वर्ष कसे राहील ते पाहू – Aquarius : Annual Horoscope 2022-2023 

राशीच्या व्ययस्थानातून शनिचे भ्रमण, धनस्थानातून गुरुचे भ्रमण तसेच, तृतीय व भाग्यातून राहूचे भ्रमण व तसेच केतूचे भ्रमण हर्षल, नेपच्यून, प्लूटोचे भ्रमण तृतीय, द्वितीय व व्यवस्थानातून होत असून सध्याचा प्रमुख ग्रहांचा गोचर कालखंड वरीलप्रमाणे असेल. तर कुंभ राशीच्या व्ङ्मक्तींना या वर्षी वेळोवेळी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. कुटुंबातील व्यक्तीवर अधिक खर्च होताना दिसेल. नोकरी व व्यवसायात प्रतिस्पर्धी निर्माण होतील.
तुम्ही डोळे बंद करून कोणावर विश्वास ठेवू नका. वेळोवेळी मान अपमान झाला तरी तुम्हाला तुमच्या जिद्द व महत्वाकांक्षा या जोरावर पुढे जायचे आहे. सध्या साडेसातीच्या कालखंडात आपली रास भ्रमण करत आहे. परंतु धनस्थानी स्व-राशीचा असणारा गुरु शेवटच्या क्षणी मार्ग निघून यश संपादन कराल. थोडक्यात येणार्‍या

समस्या निराकरण होईल. एकंदरीत वर्षाच्या पहिल्या टप्प्यात, दुसर्‍या टप्प्यात तुम्ही धैर्याने काम कराल. उत्तम खाणपान, व्यायाम व आपल्या दिनचर्येत सामील करा. नोकरदारवर्गाना हे वर्ष पहिल्या तिमाहीपेक्षा दुसर्‍या तिमाहीत चांगले राहील. आर्थिक बाबतीत विचार केल्यास तुमची कमाई चांगली होईल. परंतु खर्चही वाढू शकतात, त्यामुळे अपेक्षित धनसंचय होणार नाही. जाने. 2023 नंतर होणारा शनिबदल तुमच्या स्वभावात धीर, गंभीरता आणेल.

निर्णयक्षमता मंदावेल. वेळोवेळी मानसिक चलबिचलता वाढेल. एप्रिलनंतर होणारा गुरुबद्दल तुम्हास आर्थिक नियोजन करण्यास भाग पाडेल. थोडया अंशी मानसिक तणाव दूर करेल. याशिवाय एप्रिल 2023 ते जून 2023 तुम्हाला तुमच्या प्रगतीची गती वाढलेली दिसेल. जून महिन्यात विवाहेइच्छुकांचे विवाह ठरतील. जुलै, महिन्यामध्ये भागीदारीतील असलेले व्यवसाय व करारसंबंधातील असणार्‍या गोष्टी फार संयमाने हाताळाव्यात. ऑगस्ट 2023 नंतर तुमच्या जीवनातील ताणतणाव कमी होऊन सुखद घटना घडण्याचा कालखंड राहील.

सप्टेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर दीर्घ प्रवासाची धार्मिक यात्रा (Aquarius : Annual Horoscope 2022-2023 )कराल. व्यवसायासंबंधीत काही खास शुभदायी घटना घडतील. कौटुंबीक जीवनात आनंदी घटना घडून सदबुद्धी वाढेल. ह्या वर्षी घर जमीन, फ्लॅट वाहन खरेदीही नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2023 व त्या आधी म्हणला, तर ऑगस्ट 2023 ते 3 ऑक्टोबर 2023 मध्ये शुभकाळ दर्शवितो.

विद्यार्थी वर्गाला हे वर्ष इतके काही त्रासदायक जाणार नाही. तरीसुद्धा मे ते सप्टेंबर या कालखंडात जास्त कष्ट घ्यावे लागतील. एकाग्रता वाढून अभ्यासात यश मिळवावे लागेल. सप्टेंबर ते नोव्हेंबर विविध स्पर्धांसाठी कालखंड चांगला दर्शवितो. आरोग्याच्या बाबतीत ब्लडप्रेशर, पित्त, टॉन्सिल्स, घश्याचे विकार या समस्येतून त्रासदायक राहू शकतो. एकंदरीत हे वर्ष मानसिक संयम ठेवून कुणावरही अतिविश्वास न ठेवता आहे, ती परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार काम करायला शिकावे लागेल. हे वर्ष तुमच्यासाठी आव्हान असेल. हे आव्हान जिंकले तर तुम्हाला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या समृद्धी करेल.

कुंभ राशीच्या लोकांना हे वर्ष सकारात्मक व नकारात्मक दोन्ही परिणाम मिळतील. मार्च ते जुलै 2023 पर्यंत अडचणीचा काळ दर्शवितो, राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींनी बदलत्या समीकरणाची दखल घेऊन पुढे जावे.

उपासना : आपणास ‘शिवशंकर’ उपासना फलदायक राहील ’शनिदेवाच्या’ बीज मंत्राचे जप करावे. दर शनिवारी ‘हनुमान मंदिर’ व ‘शनि मंदिर’, गूळ, उडीद दर शनिवारी दान करून दर्शन घ्यावे. काळ्या हरभर्‍याचा प्रसाद बनवून गरिबांना वाटावा अर्थिक बोजा, मानसिक त्रास वाढत असेल तर दर शुक्रवारी ’श्री सुक्त’चा पाठ करून पांढरी मिठाई वाटावी.

शुभ रंग : पांढरा, आकाशी, निळा इ

शुभ दिनांक : 8, 17, 26

शुभकारक वयोवर्ष : 15,24,25, 36, 42, 51,60, 64, 72

शुभरत्न : आपण ‘पांढरा पुष्कराज’, ‘मोसोनाईट’, ग्रीन झेड ओपल इत्यादी वापरावे.

Aries – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मेष : करिअर व आर्थिक स्थिती सुधारणा

Taurus: Annual Horoscope 2022-23- वार्षिक राशी भविष्य – वृषभ : परदेशगमन व प्रवासाचा योग

Cancer- Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – कर्क – संघर्षातून यशप्राप्ती

Leo- Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य : सिंह – हळूहळू पण नक्कीच यशप्राप्ती

Virgo – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – कन्या: जीवनात चढ-उतार

Libra – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य : तूळ – कायदेशीर कामात यशदायक कालखंड

Scorpio : Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – वृश्चिक: अविस्मरणीय वर्ष

Sagittarius – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – धनु : पदवी व पुरस्कार प्राप्तीचे योग

Capricorn : Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य : मकर – नोकरी, व्यापार करणार्‍यांना प्रगतीकारक

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.