Capricorn : Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य : मकर – नोकरी, व्यापार करणार्‍यांना प्रगतीकारक

एमपीसी न्यूज : जाणून घेऊयात मकर (Capricorn : Annual Horoscope 2022-2023) राशीचे वार्षिक राशिभविष्य. 2022-2023  मकर राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकीत केले आहे ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश यांनी!

सर्वांना दीपावली व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्योतिष शास्त्राचे सूक्ष्म निरीक्षण केले असता प्रामुख्याने दोन विभागात याचा विचार होऊ शकतो. पहिला म्हणजे आपल्या ऋृषिमुनींनी ग्रह, नक्षत्रे यांची गती व दुसर्‍या विभागात त्याची फलीते राशीवर होणारा विचार फलीत विभागात तर्क अनुमान, निष्कर्ष, अंदाज अशा माध्यमातून वर्तविले जाते.

तसेच फलित हे ठराविक कालावधीनंतर बदल व सुधारणा होत गेली. कोणत्याही शास्त्राची निर्मिती ही मानव कल्याणाकरीता केली आहे, असे मला वाटते. त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्राचा सुद्धा मानवाला येणार्‍या सुख-दु:खाचा मागोवा घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो. हे शास्त्र मानवाला देववादी किंवा कर्तव्यशून्य न बनवता प्रयत्नवादी. बनवेल असो!

प्रस्तुत राशी भविष्यामध्ये आम्ही ह्या वर्षी आगामी म्हणजे या वर्षी प्रमुख ग्रहस्थितीचा अभ्यास करून फलीत दिली आहेत. त्यांचा उपयोग आपणास होईल व येणार्‍या वर्षाचा अंदाज येऊ शकेल. तसेच शुभ रंग, शुभ काळ, उपासना सुद्धा दिली आहे. त्याचा उपयोग आपणास येणार्‍या अडचणीच्या काळात आपली मानसिकता सक्षम होण्यास मदत होईल.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
कासारवाडी, पिंपरी-चिंचवड

संपर्क – 9922311104

मकर ही रास राशीचक्रातील दहावी रास असून, पृथ्वी तत्त्वाची, चर राशी, स्त्रीस्वभावी राशी आहे. या राशीचा स्वामी शनी हा आहे. ह्या राशीचे चिन्ह अर्धा भाग मगर व अर्धा भाग हरीण असे संयुक्त रूप आहे. ह्या राशीचे वैशिष्ट्य म्हणजे सतत कामात राहणे कष्ट, अथक परिश्रम करणे, प्रत्येक गोष्टीची गांभीर्य लक्षात घेवून कर्तव्य पार पाडणे.

उधळटपणा, चंचलता या राशीच्या व्यक्तीमध्ये आढळत नाही. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनाप्रमाणे करणे, नियमाचे पालन करणे, समान न्याय देणे, बोलणे-वागणे स्पष्ट असणे. व्यवहारीपणा असल्यामुळे संसारात व नोकरी-व्यवसायात यशस्वी होतात. महत्वाकांक्षी, अधिकाराची आवड, संयमीपणा, व्यवस्थित कामाची आखणी या व्यक्तींमध्ये असते.

मकर राशीमध्ये उत्तराषाढा, श्रवण व धनिष्ठा ही नक्षत्रे असतात. मकर रास उत्तराषाढा नक्षत्र यामध्ये जन्म झालेल्या व्यक्तीची वैशिष्टये म्हणजे तेजस्वी, अभिमानी, सर्वप्रिय कार्यसफल मिळवणारी, चांगल्या कार्यात पुढे घेऊन कार्य करणारी. पशुंची आवड असते.

या व्यक्तींचे शरीर स्थूल व मजबूत असते. तर मकर राशी श्रवण नक्षत्रातील व्यक्तीं सदाचार संपन्न, ईश्वरभक्त, विद्वान, कर्तृत्ववान, विद्याशास्त्राचा व धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करणाऱ्या असतात. लोकप्रसिद्धी मिळते. तर मकर रास धनिष्ठा नक्षत्राचे वैशिष्टय निर्लज्ज, धनाढ्य, पराक्रमीपणा, गर्विष्ठ, गायनप्रिय, साहसी धर्मावर प्रेम करणारे असते. तर अशा स्वभावगुण संपन्न असणार्‍या मकर राशीच्या व्यक्तींचे चालू वर्ष कसे राहील ते पाहू.

राशीच्या तृतीय स्थानी गुरुचे, आपल्याच राशीतून शनिचे भ्रमण व राहू-केतूचे भ्रमण अनुक्रमे दशम-चतुर्थ तसेच हर्षल, नेपच्यून, प्लुटो चतुर्थ, तृतीय व लग्नस्थानातून होत असून जानेवारी 2023 आपल्या धनस्थानी होणारा शनि बदल व एप्रिल 2023 नंतर होणारा गुरुबदल अशी प्रमुख ग्रहांची ग्रहस्थिती यावेळी आहे. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आपणास ग्रहांची ग्रहस्थिती जेवढे प्रयत्न कराल तेवढेच यश मिळेल अशी दर्शविते. या काळात करिअर प्रगतीमध्ये निष्काळजीपणा केल्यास तुम्ही संधी गमवू शकता. तुम्हाला अधिक कॅलरीचे भोजन करू नका हा सल्ला दिला जातो.

एकूणच वर्षाच्या पूर्वार्धात आपण मेहनत व सातत्याच्या बळावर बर्‍याच संधी उपलब्ध करून त्यात यशस्वी होऊ शकता. कुटुंबामध्ये वातावरण शांत ठेवण्याचे प्रयत्न करा. स्वतःला तणावमुक्त ठेवण्याचे प्रयत्न करा. विवाह इच्छुकांचे विवाह एप्रिल 2023 आत होण्याची शक्यता जास्त आहे.

तथापि, वर्षाच्या (Capricorn : Annual Horoscope 2022-2023) पूर्वार्धात आपण आपल्या कार्यावर प्रभाव पाडण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. मात्र 2023 नंतर आपणास कमी श्रमात जास्त यश मिळेल. आपल्या हातून विशेष उल्लेखनीय कार्य पार पडतील. खूप दिवसांपासून रेंगाळलेली कामे तडीस न्याल. आरोग्य व कौटुंबीक बाबतीत आवश्यक उपाययोजना करून एक दीर्घकाळ नियोजन बनवाल.

जून 2023 ते ऑगस्ट 2023 या कालखंडात कुटुंबासमवेत परदेश प्रवास, प्रवास, तीर्थयात्रा, मित्रांसोबत मजा करण्याचा कालखंड दर्शवितो. सप्टेंबरनंतर तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा दबदबा वाढेल. नवीन लोकांच्या बाबतीत भागीदारी होऊ शकते. व्यवयासासंबंधी अनेक मोठे करार पार पडतील. खेळाडूंना हे वर्ष नवीन संधी प्राप्त करून देणारे राहील. अत्यंत यशदायक व स्वप्न साकार करणारा कालखंड राहील.

घरात शुभकार्य घडतील. जोडीदारीचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला समतोल सहन करावा लागेल. याच कालखंडात आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत तुमचा मुड नरम-गरम राहू शकतो. एकंदरीत वर्षाचा सारांश पाहिला तर जीवनात येणार्‍या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुमचा विशेष प्रयत्न राहील. अधिक चढ-उतारांची परिस्थिती असली तरीसुद्धा या वर्षी बरीच रखडलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनाकडे लक्ष देऊन काम केल्यास फलदायी ठरणार आहे.

ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2023 हे महिने उत्कृष्ट जातील. मकर राशीच्या महिलावर्गाला हे वर्ष लाभदायक व उत्कृष्ट राहील. राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्ती अनेक अपयशांवर मात करून यशस्वी होतील.

उपासना : आपण दर शनिवारी शनिचालीसाचे पाठ करावेत. त्याच बरोबर ‘विष्णु’ उपासना केल्यास उत्तम राहील. ‘हनुमान’ मंदिरामध्ये मोतीचूर लाडू दान द्यावेत. गाईला हिरवा चारा द्यावा. कावळ्यांना, माशांना घास (अन्न) द्यावा. जर तुम्हाला जास्त समस्या येत असेल तर कोणत्याही शनिवारी भैरवनाथ मंदिरात, उडीद डाळीचे पकोडे दान द्यावेत.

शुभरंग : गुलाबी, फिकट निळा, पांढरा व पोपटी कलर इ.

शुभदिनांक : 18, 21, 27 इ.

शुभकारक वयोवर्ष : 20, 24, 34, 42, 47, 56 इ.

शुभकारक रत्न : डायमंड, मोसोनाइट, पांढरा प्रवाळ त्याचबरोबर (Capricorn : Annual Horoscope 2022-2023) ओनेक्स हे रत्न वापरू शकता.

Aries – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मेष : करिअर व आर्थिक स्थिती सुधारणा

Taurus: Annual Horoscope 2022-23- वार्षिक राशी भविष्य – वृषभ : परदेशगमन व प्रवासाचा योग

Gemini – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मिथुन : अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल

Cancer- Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – कर्क – संघर्षातून यशप्राप्ती

Virgo – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – कन्या: जीवनात चढ-उतार

Leo- Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य : सिंह – हळूहळू पण नक्कीच यशप्राप्ती

Libra – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य : तूळ – कायदेशीर कामात यशदायक कालखंड

Scorpio : Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – वृश्चिक: अविस्मरणीय वर्ष

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.