Pisces : Annual Horoscope 2022-23 – वार्षिक राशी भविष्य – मीन : वडिलोर्जित मालमत्तेची कामे मार्गी लागतील

एमपीसी न्यूज : जाणून घेऊयात मीन (Pisces : Annual Horoscope 2022-23) राशीचे वार्षिक राशिभविष्य 2022-2023. मीन राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकीत केले आहे ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश यांनी!

सर्वांना दीपावली व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्योतिष शास्त्राचे सूक्ष्म निरीक्षण केले असता प्रामुख्याने दोन विभागात याचा विचार होऊ शकतो. पहिला म्हणजे आपल्या ऋृषिमुनींनी ग्रह, नक्षत्रे यांची गती व दुसर्‍या विभागात त्याची फलीते राशीवर होणारा विचार फलीत विभागात तर्क अनुमान, निष्कर्ष, अंदाज अशा माध्यमातून वर्तविले जाते.

तसेच फलित हे ठराविक कालावधीनंतर बदल व सुधारणा होत गेली. कोणत्याही शास्त्राची निर्मिती ही मानव कल्याणाकरीता केली आहे, असे मला वाटते. त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्राचा सुद्धा मानवाला येणार्‍या सुख-दु:खाचा मागोवा घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो. हे शास्त्र मानवाला देववादी किंवा कर्तव्यशून्य न बनवता प्रयत्नवादी. बनवेल असो!

प्रस्तुत राशी भविष्यामध्ये आम्ही ह्या वर्षी आगामी म्हणजे या वर्षी प्रमुख ग्रहस्थितीचा अभ्यास करून फलीत दिली आहेत. त्यांचा उपयोग आपणास होईल व येणार्‍या वर्षाचा अंदाज येऊ शकेल. तसेच शुभ रंग, शुभ काळ, उपासना सुद्धा दिली आहे. त्याचा उपयोग आपणास येणार्‍या अडचणीच्या काळात आपली मानसिकता सक्षम होण्यास मदत होईल.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
कासारवाडी, पिंपरी-चिंचवड

संपर्क – 9922311104

मीन रास ही राशीचक्रातील (Pisces : Annual Horoscope 2022-23) शेवटची रास असून जलतत्त्वाची, द्विस्वभावी स्त्री-राशी असून ह्या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीचे चिन्ह विरुद्ध दिशेला तोंड असणारे मासे आहेत. भावनाप्रधान व भावुकता आपल्या स्वभावात असल्यामुळे आशा-निराशा, यश-अपयश, विचारांची गती ही उलट-सुलट असते. मनाची चंचलता गोरगरिबाची दया, अनाथ लोकांना मदत करणारी दयाळू मायाळू सर्वांशी जुळवून घेण्याची क्षमता या राशीच्या व्यक्तींमध्ये असते. परमेश्‍वरी ओढ, जप, तप, पूजा-अर्चा ह्या गोष्टींकडे जास्त कल असतो. सर्व क्षेत्रातील व्यक्तींशी संबंध, सुसंस्कृत व निर्मळ असतात. स्वभावाने शांत व परोपकारी वृत्ती या व्यक्तींमध्ये असते.

मीन राशीत पूर्वाभाद्रपदा उत्तराभाद्रपदा, रेवती ही नक्षत्रे येतात. मीन रास पूर्वाभाद्रपदा नक्षत्रातील व्यक्तीं हुशार, धनी, धार्मिक, मधुर भाषा बोलणारी, सौम्य व सात्विक व्यवहार असणारी असते, तर मीन रास उत्तरा -भाद्रपदा नक्षत्र असणारी व्यक्ती न्यायप्रिय, मेहनती, महत्त्वाकांक्षी, ध्यान व योगात आवड असणारी, श्रद्धाळू, तर्कशुद्ध बोलणारी, योग्यता संपन्न, परोपकारी व श्रद्धावान असतात तर मीन रास स्वाती नक्षत्रामधील व्यक्ती उत्तम स्मरणशक्ती, उंचीने कमी, हुशार, निस्वार्थी, कायदे पंडित असतात. यांना पुष्कळ मित्र असतात. ही माणसे लोकप्रिय असतात. ईश्वरावर श्रद्धा ठेवून सत्कर्म करतात.

धर्मावर श्रद्धा व विश्‍वास असणाऱ्या मीन राशीच्या व्यक्तींचे चालू वर्ष कसे राहील ते पाहू –

राशीच्या लाभ स्थानातून शनिचे भ्रमण, तुमच्याच राशीतून (Pisces : Annual Horoscope 2022-23) गुरुचे भ्रमण, राहुचे धनस्थानातून व केतूचे अष्टमस्थानातून तसेच हर्षल, नेपच्यून, प्लूटो अनुक्रमे धनस्थानी, लग्नस्थानी व लाभ स्थानी भ्रमण करीत असून सध्याची ग्रह- गोचर स्थिती राहील. वर्षाच्या पूर्वार्धात तुम्हास जास्त काही अडचणी असणार नाहीत. कारण, ग्रहांची स्थिती अनुकूल असल्यामुळे तुम्हाला यशदायक पहिली तिमाही राहील. तुम्हाला मागील गुंतवणुकीचे लाभ मिळतील. त्याचबरोबर तुमच्या योजनाबद्ध कार्यशैलीस वाव मिळेल.

विवाह इच्छुकांचे विवाह एप्रिल 2023 च्या आतमध्ये प्रबळ योग आहेत. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात बदल-बदलीही दर्शविते. महत्त्वाची व्यवसायिक कामे कराल. भागिदारीतील बोलाचाली या जानेवारी 2023 च्या आत तडीस न्याव्यात. अथवा दिरंगाई किंवा अडचणी येण्याची शक्यता राहील. तर जून 2023 नंतर होणारा शनिबदल व एप्रिल 2023 नंतर होणारा गुरुबदल तुमच्या अनुक्रमे व्ययस्थानात शनि व गुरुचे भ्रमण राहणार असून, तुम्हाला तुमच्या खर्चात वाढ दिसेल.

परदेशी दौरे सारखे वाढतील. कुटुंबासाठी खर्च करावा लागेल. अधून मधून आरोग्याच्या तकारी उद्भवतील. परंतु, गुरुचे भ्रमण ठीक असल्यामुळे तुम्हास तणाव असला तरी त्यातून मार्ग निघेल. विशेष करून मे 2023 नंतर ते ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये जीवनात धावपळ, व्यवसायासंबंधी होणार्‍या गाठीभेटी कौटुंबीक जीवनात असणाऱ्या संकटातून मानसिक ताण व शारिरीक थकवा जाणवू शकतो. मे ते जुलै 2023 या कालखंडात मध्यस्थी अथवा धाडसी निर्णय घेताना सावधगिरीने पुढे जावे.

नोकरीमध्ये मे ते जुलै 2023 बदल – बदली किंवा नवीन नोकरी अशा घटना (Pisces : Annual Horoscope 2022-23) दर्शवितात. सप्टेंबर ते डिसेंबर 2023 नोकरीमध्ये मान सन्मान प्रसिद्धीसुद्धा प्राप्त होईल. ज्या व्यक्तीचे नोकरी – व्यवसाय, सामाजिक ट्रस्ट, शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत असणार्‍या व्यक्तींना जपून निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक क्षेत्रामध्ये एप्रिल ते ऑगस्ट या काळात अर्थिक नियोजन करून पुढे जावे लागेल.

विद्यार्थ्यांची विनाप्रयास प्रगती होईल. परदेशी शिक्षण घेणार्‍या विदयार्थ्यांंची सर्व कामे सुरळीत पार पडतील. राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना हे वर्ष अनुकूल दर्शविते. तुम्हाला पद-प्रतिष्ठेचे योगसुद्धा आहेत. महिला वर्गाला तुमच्या वैयक्तिक समस्या, कौटुंबिक गोष्टी या इतर कोणाला सांगू नका. नाहीतर मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. एकंदरीत नवीन वर्षामध्ये म्हणजे जानेवारी 2023 नंतर साडेसातीचा प्रारंभ होत असला, तरी देखील गुरुबळ असल्यामुळे, विशेष त्रास जाणवणार नाही.

फक्त अधूनमधून मानसिकता उदास राहील. त्याचे कारण निष्कारण चिंता असेल. यासाठी योग अथवा जप ध्यान धारणा महत्वाची राहील. एकंदरीत या वर्षी आव्हाने नक्कीच असतील, परंतु त्या आव्हानांची परिस्थिती जाणून घेतल्यास खूप काही साध्य करता येईल.

नोव्हेंबर आणि डिसेंबर 2022 मीन राशीला फायदेशीर व यशदायक जातील. या वर्षीच्या मध्यानचा काळ आरोग्याच्या बाबतील दक्ष रहावे लागेल, सांधेदुखी, खांदेदुखी, पायाची दुखणी, डोळ्याच्या तक्रारी अशा आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील. स्थावर मालमत्ता, प्रॉपर्टी यासंबधीचे निकाल तुमच्या बाजूने लागतील, सौंदर्य प्रसाधने, मार्केटिंग एजन्सी, संगीत इत्यादी क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना पद-प्रतिष्ठा व यशकारक राहील.

उपासना : आपण गणपती उपासना व लक्ष्मी-नारायणाची उपासना केल्यास उत्तम राहील. तसेच, दर गुरुवारी गोड पिवळा तांदूळ तयार करून देवाला अर्पण करून प्रसाद म्हणून वाटावा. पिंपळ्याच्या झाडाला जल अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. तुम्हास विशेष समस्येचा त्रास होत असेल तर, ब्राह्मण व विद्यार्थी यांना भोजन द्या. याचबरोबर विष्णुसहस्त्रनामाचा 11 वेळा पाठ करा.

शुभ रंग : गुलाबी, तांबूस, लव्हेंडर इ.

शुभ दिनांक : 3, 12, 21, 30 इ.

शुभकारक वयोवर्षे : 9, 18, 26, 36, 44, 45 इ.

शुभरत्न : पांढरा प्रवाळ, मोती केल्यास उत्तम राहील. पुष्कराज या रत्नांचा वापर केल्यास उत्तम राहील.

Aries – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मेष : करिअर व आर्थिक स्थिती सुधारणा

Taurus: Annual Horoscope 2022-23- वार्षिक राशी भविष्य – वृषभ : परदेशगमन व प्रवासाचा योग

Gemini – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मिथुन : अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल

Cancer- Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – कर्क – संघर्षातून यशप्राप्ती

Leo- Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य : सिंह – हळूहळू पण नक्कीच यशप्राप्ती

Virgo – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – कन्या: जीवनात चढ-उतार

Libra – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य : तूळ – कायदेशीर कामात यशदायक कालखंड

Scorpio : Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – वृश्चिक: अविस्मरणीय वर्ष

Sagittarius – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – धनु : पदवी व पुरस्कार प्राप्तीचे योग

Capricorn : Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य : मकर – नोकरी, व्यापार करणार्‍यांना प्रगतीकारक

Aquarius : Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – कुंभ : संयमाने होईल यशप्राप्ती

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.