Whatsapp chatbot : पुणे महापालिकेच्या व्हॉट्सॲप चाटबोट द्वारे नागरिकांना मिळणार 24×7 प्रशासनाचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेने नागरिकांच्या तक्रारींना वेळीच प्रतिसाद देता यावा म्हणून व्हॉट्स चाटबोट ची निर्मीती केली आहे. (Whatsapp chatbot) यामुळे नागरिकांच्या तक्रारीला प्रशासन आता 88888251001 या क्रमांकावर 24 तास प्रतिसाद देऊ शकणार आहे.

यामध्ये पुढील सेवा नागरिकांना या चाटबोटवर उपलब्ध आहेत

1)     देय व देय रक्कम – मिळकत कराची भरलेली आणि देय रक्कम

2)     कराची पावती काढा –थकबाकी नसल्यास मिळकत कराची पावती काढा

3)     एनओसी प्रमाणपत्र – थकबाकी नसल्यास एनओसी प्रमाणपत्र काढा

4)     ऑनलाईन पेमेंट – थकबाकी असल्यास मिळकत कराचा ऑनलाईन भरणा

5)     कर बिल- मिळकत कर बिल मिळवम्यासाठी लिंक

6)     वापरकर्ता नोंदणी – वापरकर्ता त्यांचे फोन नंबर आणि इमेल आयडी प्रोपर्टी आयडीशी लिंक करू शकता

7)     फोन नंबर द्वारे मिळकत कर भरा- नोंदमीकृत मोबाईल क्रमांकाद्वारे नागरिक मिळकत कर आयडी मिळवू शकतात

8)     कर कल्क्युलेटर अंदाजे मिळकत कर मोजणे करिता

9)     स्व-मुल्यांकन- नवीन मिळकत/ अतिरिक्त बांधकामासाठी नोंदणी करा

Devendra Fadnavis : रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार

वरील सेवा नागरिकांना चाटबोटद्वारे (Whatsapp chatbot) उपलब्ध केल्या असून भविष्यात इतरही सेवांचा यात समावेश केला जाणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.