PMPML : पीएमपीएमएलची ‘रामवाडी मेट्रो स्टेशन ते लोहगाव एअरपोर्ट’ मेट्रो फिडर बस सेवा बुधवार पासून सुरु

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र मेट्रोरेल कार्पोरेशन लि. पुणे यांचे मार्गिका रुबी हॉल मेट्रो स्टेशन ते रामवाडी मेट्रो स्टेशन ( PMPML )या मार्गिकेचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे शुभहस्ते ऑनलाईन पद्धतीने बुधवारी (दि.6) करण्यात आले. त्या अनुषंगाने पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांच्या सोईकरीता बुधवार पासुन मेट्रो फिडर बससेवा सुरू करण्यात आली .

या बससेवेचा शुभारंभ खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सुनील टिंगरे, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार जगदिश मुळीक व आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते मेट्रोच्या रामवाडी स्थानक येथे वातानुकूलित ई-बस ला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

Maharashtra : शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची संकेतस्थळांवर उपलब्ध; 13 मार्चपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

यावेळी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मेट्रोचे सिस्टम्स अ‍ॅन्ड ऑपरेशनचे संचालक विनोदकुमार अग्रवाल, मेट्रोचे जनता संपर्क अधिकारी हेमंत सोनवणे, मेट्रोचे वर्क्स संचालक अतुल गाडगीळ, मेट्रोचे जी.एम (एम.एम.आय) .कॅ. राजेंद्र सानेर – पाटील, मेट्रोचे संचालक स्टॅटिक प्लॅनिंग अनिल कोकाटे, मेट्रोचे कार्यकारी संचालक ऑपरेशन्स राजेश त्रिवेदी, मेट्रो चे डि.जी.एम मनोज डॅनियल, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) मा. सतिश गव्हाणे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे व पुणे स्टेशन चे डेपो मॅनेजर संजय कुसाळकर आदी उपस्थित होते.

पीएमपीएमएलकडून सुरु करण्यात येत असलेल्या या मेट्रो फीडर बससेवेमुळे प्रवाशी नागरिकांना मेट्रो स्टेशन्स पर्यंत पोहोचणे सोयीचे होणार आहे. तरी सदरच्या मेट्रो फीडर बससेवांचा लाभ प्रवाशी नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात येत आहे. प्रवासी संख्या व उत्पन्नात वाढ झाल्यास या मार्गांवर पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून आणखी बसेस वाढविण्यात येतील.

‘रामवाडी मेट्रो स्टेशन ते लोहगाव एअरपोर्ट’ मेट्रो फिडर सेवेचा मार्ग

1)       रामवाडी मेट्रो स्टेशन ते लोहगाव एअरपोर्ट ( मार्गे –साकोरे नगर) रामवाडी मेट्रो स्टेशन, हयात हॉटेल, वेकफिल्ड कंपनी, साकोरे नगर, नेक्सा शोरूम, विमाननगर लेन क्र. 22, विमाननगर लेन क्र. 21, सिंबायोसिस कॉलेज विमान नगर, क्रोमा मॉल लोहगाव, लोहगांव एअरपोर्ट. 25 मिनिटे अंतरानुसार 5 ते 10  रुपये तिकीट दर

 

2)       रामवाडी मेट्रो स्टेशन ते लोहगाव एअरपोर्ट ( मार्गे – संजय पार्क लेन नं-6)  लोहगाव एअरपोर्ट, क्रोमा मॉल लोहगांव, सिंबायोसिस कॉलेज विमाननगर, संजय पार्क लेन नं 6, मारुती सुझुकी शोरूम साकोरे नगर, चेक मेट हॉटेल, रामवाडी मेट्रो स्टेशन. 25 मिनिटे अंतरानुसार 5 ते 10 रुपये तिकीट ( PMPML ) दर.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.