AAP : पीएमपीएमलची आळंदी-चाकण बससेवा सुरु, आपच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने आळंदी-चाकण बससेवा सुरु केली आहे. यासाठी आम आदमी पार्टीने (AAP) सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला अखेरिस यश आले आहे.

Maval : शिरगाव पोलिसांचा हातभट्टीवर छापा, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक नागरिकांना कामासाठी आळंदी ते चाकण मार्गावरुन जाण्यासाठी बस बदलत जावे लागत होते. नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता.  दररोज वाहन न मिळाल्यामुळे अधिक पैसे खर्च करून खाजगी वाहनाने प्रवास लागत होता.

 

आम आदमी पार्टीचे (AAP)  उपाध्यक्ष दत्तात्रय काळजे, सहसचिव इम्रान खान यांनी पीएमपीएमएल प्रशासनाकडे बस सेवा सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला. अखेरीस त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आळंदी ते चाकण बस सेवा सुरु झाली.

 

आळंदी ते चाकण, केळगाव हनुमानवाडी मार्गे बससेवेचा आज शुभारंभ करण्यात आला. कामगार नेते अरुण धुंडरे यांनी बस चालक व वाहक यांचा सत्कार केला.

 

यावेळी आळंदीचे माजी नगराध्यक्ष बबनराव कु-हाडे, भोसरी डेपोचे मॅनेजर विजयकुमार मदगे, रायकर बापु, डॉ. संजय देशमुख, डॉ. नितीन गोसावी, पंढरीनाथ झरे, आपचे संतोष इंगळे, कमलेश रणावरे, स्मिता पवार, सीता केंद्रे, ब्रम्हानंद जाधव, सचिन पवार, वाजिद शेख, वैजनाथ शिरसाट, प्रकाश हागवणे, अजय सिंग, भिमराव जोधळे, राजेंद्र काळजे, स्मिता काळजे, विलास धुंडरे उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.