Maval : शिरगाव पोलिसांचा हातभट्टीवर छापा, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज- मावळातील (Maval) पुसाणे गावच्या हद्दीत शिरगाव पोलिसांनी एका हातभट्टीवर छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी (दि.27) दुपारी केली.

TTC Bavdhan News : बावधन येथे 22 एकरात साकारतेय वन्यप्राणी उपचार केंद्र

 

याप्रकरणी पोलिसांनी सनी भारत राठोड (वय 21 रा.  पुसाणे मावळ ) याला सीआरपीसी अंतर्गत नोटीस बजावली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसाणे गावात नदीकाठी  बेकायदेशीर हातभट्टी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता तिथे गुळ मिश्रित पाणी व तयार हातभट्टी असा एकूण दोन लाख पंचावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा प्रोव्हीबीशनचा माल मिळून आला. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून शिरगाव पोलीस त्याचा पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.