Pune News : वोविनाम चॅम्पियनशिप’ स्पर्धेत पीएमपीएमएल च्या हर्षल गरड यांना सुवर्ण

एमपीसी न्यूज-  वोविनाम महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिपस्पर्धेत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सुरक्षा विभागात कार्यरत असलेल्या हर्षल तानाजी गरड यांनी (Pune News) ‘सुवर्ण पदकजिंकले आहे. साताऱ्यातील वाई येथे 23 ते 25 डिसेंबर या कालावधीत  वोविनाम महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिपस्पर्धा पार पडली.

या स्पर्धेत 275 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सुरक्षा विभागात कार्यरत असलेल्या हर्षल तानाजी गरड यांनी वोविनाम या खेळात 18 वर्ष ते 40 वर्ष या वयोगटात सहभाग नोंदवुन ‘फुल कॉन्टॅक्ट’ या प्रकारात ‘सुवर्ण पदक’ जिंकले. हर्षल गरड यांना सुवर्ण पदक व सन्मानचिन्ह देण्यात आले.

Pune News : गर्भवती राहिल्यानंतर प्रियकराचा लग्नास नकार; प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या

‘वोविनाम महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिप’ स्पर्धेत हर्षल तानाजी गरड यांना ‘सुवर्ण पदक’ मिळाल्या बद्दल पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (Pune News) ओम प्रकाश बकोरिया, सहव्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा पोतदार – पवार व कंपनी सेक्रेटरी निता भरमकर यांनी हर्षल गरड यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.