Chakan News : बिकनीवर ऑडिशनच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज : मुंबईत फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याचं आमिष दाखवत आणि ऑडिशन घेण्याच्या निमित्ताने 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना (Chakan News) पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथून उघडकीस आली आहे. या प्रकरणात चाकणमधील उद्योगपती राजेंद्र गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने चाकण सह खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

संशयित राजेंद्र गायकवाड (रा. इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी एका फिल्मसाठी ऑडिशन घ्यायची आहे असे सांगून आळेफाटा येथील पिडीत मुलीला पुण्यातील मोठ्या हॉटेल रूममध्ये बोलावले. त्यावेळी पिडीत मुलीला आणि आई-वडिलांना काही डायलॉग म्हणण्यास सांगितले. काही वेळातच  तुम्हाला ती लाजत आहे, तुम्ही बाहेर बसा असे सांगून मुलीच्या आई – वडिलांना बाहेर पाठवले. यानंतर मुलीला स्वतः सोबत डान्स करून दाखवायचा आहे असे सांगत डान्स करताना पाठीवरुन आणि अंगावरून हात फिरवून हा ऑडिशनचा भाग असल्याचं सांगितले.

पुढे 8 नोव्हेंबरला मुलीच्या वडिलांना फोन करून कामानिमित्त आळेफाटा येथे येणार असल्याचं सांगितले. “तिथं येऊन मुलीचे ऑडिशन घेतो आणि तिच्यात काय सुधारणा झाली आहे (Chakan News) ते पाहू असं कारण सांगितलं. त्यानंतर मुलीच्या राहत्या घरात येऊन आई-वडिलांना बाहेर पाठवून पिडीत मुलीला “तुला करिअर करायचे असेल तर बिकनीवर ऑडिशन द्यावी लागेल असं सांगितले.

Pune News : वोविनाम चॅम्पियनशिप’ स्पर्धेत पीएमपीएमएल च्या हर्षल गरड यांना सुवर्ण

बिकनीवर ऑडिशन देत असताना मुलीच्या पाठीमागून येऊन मिठी मारली आणि ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा धमकी देऊन बळजबरीने जबरदस्ती करून शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर सर्वांना धमकी देऊन तिथून तो निघून गेला असल्याचे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे .

याप्रकरणी पिडीतेच्या आईच्या तक्रारीनंतर राजेंद्र दगडू गायकवाड यांचे विरुद्ध आळेफाटा पोलिसांनी बलात्कार आणि ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(Chakan News) याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक रागिणी कराळे तपास करत आहेत. दरम्यान गुन्हा दाखल होताच आरोपी उद्योजक गायकवाड फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.